पॅरामेडिकल अभ्यासक्रम उपलब्ध असलेल्या शैक्षणिक संस्थांची आणि त्यांच्या प्रवेशप्रक्रियेची सविस्तर ओळख-

बारावी विज्ञान शाखेत प्रवेश घेतलेल्या अनेक विद्यार्थ्यांना वैद्यक क्षेत्राकडे वळायचे असते. मात्र, या प्रवेशासाठी असलेली गुणांची चुरस, अभ्यासक्रमाचे भरमसाठ शुल्क अशा विविध कारणांमुळे अनेक विद्यार्थ्यांचे हे स्वप्न पूर्ण होऊ शकत नाही. मग अनेक विद्यार्थी बीडीएस, बीएएमएस, बीएचएमएस या विद्याशाखांचा पर्याय स्वीकारतात. काही विद्यार्थी ऑक्युपेशनल थेरपी, फिजिओथेरपी या अभ्यासक्रमांना प्रवेश घेतात. डॉक्टरांची जशी गरज असते तशीच याही तज्ज्ञांची गरज असतेच. त्यामुळे  या अभ्यासक्रमांना प्रवेश घेतल्यावर विद्यार्थ्यांनी झोकून देत या विद्याशाखांचा अभ्यास करायला हवा. त्यातूनच त्यांना या शाखांचे परिपूर्ण ज्ञान त्यांना मिळू शकते आणि त्याचा उपयोग उत्तम करिअर घडवण्यासाठी होऊ शकतो.
डॉक्टर हे वैद्यक व्यवस्थेचा कणा आहेत. मात्र, आज वैद्यकीय समस्या गुंतागुंतीच्या होत असल्याने त्यांचे निराकरण  योग्य पद्धतीने करण्यासाठी पूरक विद्याशाखांतील तज्ज्ञांची गरज डॉक्टरांना भासते. डॉक्टरी उपचारांची अचूकता वाढविण्यासाठी हे तज्ज्ञ उपयुक्त ठरतात. म्हणूनच पॅरामेडिकल शाखांमधील अभ्यासक्रमांचा विचार विद्यार्थ्यांनी करायला हवा. या शाखांमधील उत्तम ज्ञान मिळवल्यास त्यांना करिअरच्या अनेक उत्तम संधी मिळू शकतात.
सध्या कॉर्पोरेट पद्धतीची रुग्णालये अनेक ठिकाणी सुरू होत आहेत. अशा रुग्णालयांमध्ये विविध प्रकारच्या डॉक्टरांसोबत पॅरामेडिकल तज्ज्ञांच्या सेवाही उपलब्ध असतात.  पॅरामेडिकल  अभ्यासक्रम पुढील विषयांमध्ये करता येऊ शकतात-
= इकोकाíडओग्राफ = काíडअ‍ॅक केअर = पफ्र्युजन
= रिनल डायलेसिस = रेडिओलॉजी = अ‍ॅनेस्थॅशिया टेक्नॉलॉजी = रिनल डायलेसिस टेक्नॉलॉजी = मेडिकल इमॅजिन टेक्नॉलॉजी = ऑपरेशन थिएटर टेक्नॉलॉजी
= इमर्जन्सी मेडिसिन = मेडिकल रेडिओलॉजिकल टेक्नॉलॉजी = मेडिकल लेबॉरेटरी टेक्नॉलॉजी = रेस्पिरेटरी थेरपी
= फिजिशियन असिस्टंट = न्युरो इलेक्ट्रो फिजिऑलॉजी
= इमर्जन्सी मेडिकल टेक्नॉलॉजी = डायबेटिक सायन्स आदी.
हे अभ्यासक्रम काही शासकीय आणि खासगी महाविद्यालयांमध्ये सुरू करण्यात आले आहेत. या अभ्यासक्रमांचे प्रवेश देताना बहुतांश महाविद्यालयांमध्ये बारावी विज्ञान परीक्षेत जीवशास्त्र, रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्रात मिळालेल्या गुणांवर थेट प्रवेश दिला जातो. यातील काही अभ्यासक्रम तीन वर्षांचे तर काही चार वर्षांचे आहेत.
महत्त्वाच्या संस्था आणि अभ्यासक्रम
*    ऑल इंडिया इन्स्टिटय़ूट ऑफ मेडिकल सायन्स : या संस्थेत बीएस्सी (ऑनर्स) इन मेडिकल टेक्नॉलॉजी इन रेडियोग्राफी आणि बीएस्सी (ऑनर्स) इन ऑप्टोमेट्री हे अभ्यासक्रम करता येतात.
    या अभ्यासक्रमाला अखिल भारतीय प्रवेश परीक्षेद्वारे प्रवेश दिला जातो. यात दीड तासांचा एक बहुपर्यायी, वस्तुनिष्ठ पद्धतीचा पेपर घेतला जातो. या पेपरमध्ये जीवशास्त्र, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र आणि गणित या चार विषयांचे प्रत्येकी ३० गुणांचे प्रश्न असतात. विद्यार्थी जीवशास्त्र किंवा गणित यापकी एक पर्याय निवडू शकतात.
    पत्ता- असिस्टंट कंट्रोलर (एक्झामिनेशन) सेक्शन, ऑल इंडिया इन्स्टिटय़ूट ऑफ मेडिकल सायन्स, अन्सारी नगर,
न्यू दिल्ली- ११०६०८.
    वेबसाइट- http://www.aiimsexams.org
*    जवाहरलाल इन्स्टिटय़ूट ऑफ पोस्ट ग्रॅज्युएट मेडिकल एज्युकेशन अ‍ॅण्ड रिसर्च : या संस्थेत बीएस्सी इन मेडिकल लेबॉरेटरी टेक्नॉलॉजी, बीएस्सी इन मेडिकल रेडिओथेरपी टेक्नॉलॉजी, बीएस्सी इन ऑपरेशन थिएटर टेक्नॉलॉजी, बीएस्सी इन पफ्र्युजन टेक्नॉलॉजी, बीएस्सी इन डायलेसिस टेक्नॉलॉजी, बीएस्सी इन न्यूक्लिअर मेडिसिन टेक्नॉलॉजी, बीएस्सी इन न्यूरो टेक्नॉलॉजी, बीएस्सी इन काíडअ‍ॅॅक लेबॉरेटरी टेक्नॉलॉजी करता येतात. या अभ्यासक्रमाला प्रवेश परीक्षेद्वारे प्रवेश दिला जातो. पत्ता- जवाहरलाल इन्स्टिटय़ूट ऑफ पोस्ट ग्रॅज्युएट मेडिकल एज्युकेशन अ‍ॅण्ड रिसर्च, धन्वंतरी नगर, गोरीमेदू, पुदुचेरी- ६०५००६.
    वेबसाइट-  jipmer.edu.in
    ईमेल-deam@jipmer.edu.in
*    आम्र्ड फोर्स मेडिकल कॉलेज : या महाविद्यालयात बॅचरल ऑफ पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी हा अभ्यासक्रम पुढील विषयांमध्ये करता येतो- लेबॉरेटरी टेक्निशिअन, रेडिओग्राफिक टेक्निशिअन, रेडिओथेरपी टेक्निशिअन, काíडओ टेक्निशिअन, न्यूरो टेक्निशिअन, ब्लड ट्रान्सफ्युजन टेक्निशिअन, ऑप्टिमेट्री टेक्निशिअन, ऑपरेशन थिएटर टेक्निशिअन, एन्डोस्कोपी टेक्निशिअन, कम्युनिटी मेडिसिन, हेल्थ इन्स्पेक्टर, इर्मजन्सी मेडिकल सव्हिस्रेस.
पत्ता- आम्र्ड फोर्स मेडिकल कॉलेज, पुणे- ४११०४०.
    वेबसाइट- afmc.nic.in
*    ग्रँट मेडिकल सायन्स आणि जे जे ग्रुप ऑफ हॉस्पिटल्स: या महाविद्यालयात बॅचलर ऑफ पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी हा अभ्यासक्रम पुढील विषयांमध्ये करता येतो- न्यूरॉलॉजी टेक्निशिअन, लॅबॉरेटरी टेक्निशिअन, रेडिओग्राफिक टेक्निशिअन, रेडिओथेरपी टेक्निशिअन, काíडऑलॉजी टेक्निशिअन, ब्लड ट्रान्सफ्युजन टेक्निशिअन, सायटो टेक्निशिअन, ऑपरेशन थिएटर टेक्निशिअन, हिस्टोपॅथॉलॉजी टेक्निशिअन, क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट, एन्डोस्कोपी टेक्निशिअन, कम्युनिटी मेडिसिन/ पब्लिक हेल्थ, फोरेन्सिक सायन्स, परफ्युनिस्ट. पत्ता- जे. जे. मार्ग, नागपाडा, मुंबई सेंट्रल, मुंबई- ४००००८.
    वेबसाइट- http://www.gmcjjch.org
*    महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक : या विद्यापीठाने पुढील अभ्यासक्रम सुरू केले आहेत- डिप्लोमा इन मेडिकल स्टोअर मॅनेजमेंट, डिप्लोमा इन रेडिओग्राफिक टेक्निक, डिप्लोमा इन हायजिन इन्स्पेक्टर, डिप्लोमा इन न्युक्लिअर मेडिसिन टेक्निक्स, डिप्लोमा इन फिजिओथेरपी असिस्टंट, ऑडिओमेट्री अ‍ॅण्ड स्पीच थेरपी, सायकॅट्रिक नìसग, स्पेशल डिसिज (स्किन) असिस्टंट.
    वेबसाइट-  http://www.muhs.ac.in
    ईमेल- ugacademic@muhs.ac.in
*    अली यावर जंग नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ हिअिरग हँडिकॅप्ड : या संस्थेत पुढील अभ्यासक्रम करता येतात-  बॅचलर ऑफ ऑडिऑलॉजी अ‍ॅण्ड स्पीच लँग्वेज पॅथॉलॉजी, बॅचलर ऑफ एज्युकेशन इन हिअरिंग इम्प्लािन्टग, डिप्लोमा इन एज्युकेशन- स्पेशल  एज्युकेशन- डीफ, हार्ड ऑफ हìडग, डिप्लोमा इन हिअिरग लँग्वेज अ‍ॅण्ड स्पीच, डिप्लोमा इन साइन लँग्वेज इंटरप्रिटर कोर्स.
    पत्ता- अली यावर जंग नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ
हिअिरग हँडिकॅप्ड, वांद्रे रिक्लेमेशन, वांद्रे (पश्चिम),
    मुंबई- ४०००५०.
ई-मेल- nihhac@yahoo.com
वेबसाइट- ayjnihh.nic.in.

Dates of 299 exams of Mumbai University summer session announced Mumbai
मुंबई विद्यापीठाच्या उन्हाळी सत्रातील २९९ परीक्षांच्या तारखा जाहीर; दोन लाखांहून अधिक विद्यार्थी परीक्षार्थी
Indian Man who earns Rs 5 crore daily his parents wanted him to pursue PhD Google CEO Sundar Pichai Daily Salary Morning Habits
भारतीय तरुणाला दिवसाचा पगार ५ कोटी, नावाचा जगभर डंका; आई वडिलांची इच्छा होती PhD करावी पण त्यानं..
article about upsc exam preparation guidance upsc exam preparation tips in marathi
UPSC ची तयारी : पूर्वपरीक्षेच्या अभ्यासाचे नियोजन
Rat tail in student food akola
अकोला : विद्यार्थ्यांच्या पोषण आहारात उंदराचे शेपूट! दहा विद्यार्थ्यांना विषबाधा

नया है यह!
पीएच.डी इन नॅनो सायन्स अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी-
हा अभ्यासक्रम इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी या संस्थेने सुरूकेला आहे. ही संस्था केंद्र सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत आहे. अर्हता- कोणत्याही विज्ञान शाखेतील पदव्युत्तर पदवी किंवा एमई. शिवाय उमेदवारांनी ॅअळए मध्ये उत्तम गुण मिळायला हवेत. पत्ता- हॅबिटॅट सेंटर, फेज टेन, सेक्टर ६४,
मोहाली- १६००६२. वेबसाइट- http://www.iisrmohali.ac.in

सुरेश वांदिले – ekank@hotmail.com