‘द इन्स्टिटय़ूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया’तर्फे चालविल्या जाणाऱ्या कंपनी सेक्रेटरी अभ्यासक्रमाचे स्वरूप, संस्थेतर्फे आयोजित केले जाणारे विविध प्रशिक्षणवर्ग आणि एकात्मिक अभ्यासक्रम याविषयी सविस्तर माहिती-

कॉर्पोरेट लॉ, प्रशासन आणि व्यवस्थापन या क्षेत्रांतील कौशल्यप्राप्त मनुष्यबळाच्या निर्मितीसाठी कंपनी सेक्रेटरी अभ्यासक्रम उपयुक्त ठरतो. कंपनी सेक्रेटरी नियामक प्राधिकरण, संचालक मंडळ, शेअरधारक आणि कंपनीचे इतर भागधारक यांच्यामधील महत्त्वाचा दुवा असतात. मंडळाचे कर्तव्य, जबाबदारी आणि अधिकार, विविध कायदे, नियम याविषयी माहिती देण्याचे काम कंपनी सेक्रेटरीला करावे लागते. याशिवाय कंपनीला कर, व्यवसाय आणि आíथक बाबींवर विविध कायदेशीर सल्ला देण्याचे काम करावे लागते.
 कंपनी सेक्रेटरी हा व्यवसाय विकसित आणि नियंत्रित करणारी द इन्स्टिटय़ूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया ही आपल्या देशातील एकमेव संस्था आहे. संसदेतील विधेयकानुसार ही संस्था स्थापित करण्यात आली असून ती केंद्रीय कॉर्पोरेट अफेअर्स मंत्रालयाच्या अंतर्गत काम करते. या संस्थेचे मुख्यालय दिल्ली येथे असून मुंबई, कोलकाता, चेन्नई येथे विभागीय कार्यालये आहेत. या संस्थेतर्फे कंपनी सेक्रेटरी अभ्यासक्रम चालवला जातो.
कॉर्पोरेट क्षेत्रातील व्यवस्थापन नियंत्रित करण्यासाठी कंपनी सेक्रेटरी महत्त्वाची भूमिका बजावतात. कंपनीच्या इतर शाखाप्रमुखांशी समन्वय, सहकार्य, संपर्क आणि सुसंवाद साधण्याचे काम कंपनी सेकेट्ररी करतात. या संस्थेत टपालाद्वारे प्रशिक्षण उपलब्ध आहे. वेब आधारित, व्हिडिओ आधारित आणि लाइव्ह व्हच्र्युअल क्लासरूमद्वारे ई-लìनगची सुविधा उपलब्ध करून दिली जाते.
    कंपनी सेक्रेटरी अभ्यासक्रमाचे टप्पे
*    बारावीनंतर कंपनी सेक्रेटरी होण्याचे तीन टप्पे आहेत- फाऊंडेशन अभ्यासक्रम विज्ञान, कला, वाणिज्य, फाइन आर्ट या विषयातील बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना करता येतो. या अभ्यासक्रमाला वर्षांतून दोनदा प्रवेश घेता येतो.

३१ मार्चला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची परीक्षा त्याच वर्षीच्या डिसेंबर महिन्यात होते. ३० सप्टेंबरला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची परीक्षा दुसऱ्या वर्षीच्या जून महिन्यात होते. या अभ्यासक्रमात बिझनेस एन्व्हायरॉन्मेंट आंत्रप्रिन्युरशिप, बिझनेस मॅनेजमेंट, इथिक्स अ‍ॅण्ड कम्युनिकेशन, बिझनेस इकोनॉमिक्स, फंडामेंटल्स ऑफ अकौंटिंग अ‍ॅण्ड ऑडिटिंग असे चार पेपर असतात.
*    एक्झिक्युटिव्ह अभ्यासक्रम कोणत्याही शाखेतील पदवीधराला करता येतो. मात्र तो फाइन आर्टस् पदवीधराला करता येत नाही. या अभ्यासक्रमात कंपनी लॉ, कॉस्ट अ‍ॅण्ड मॅनेजमेंट अकौंटिंग, इकॉनॉमिक्स अ‍ॅण्ड कमíशअल लॉज, टॅक्स लॉज अ‍ॅण्ड पॅ्रक्टिसेस, कंपनी अकाउंन्टस अ‍ॅण्ड ऑडिटिंग प्रॅक्टिसेस, कॅपिटल मार्केट्स अ‍ॅण्ड सिक्युरिटी लॉज, इंडस्ट्रिअल, लेबर अ‍ॅण्ड जनरल लॉ असे
सात विषय असतात.
*    प्रोफेशनल प्रोग्रॅम- हा अभ्यासक्रम एक्झिक्युटिव्ह अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या सर्व विद्यार्थ्यांना करता येतो. या अभ्यासक्रमात अ‍ॅडव्हान्स्ड कंपनी लॉज अ‍ॅण्ड पॅ्रक्टिस, सेक्रेटरियल ऑडिट, कम्प्लायन्स मॅनेजमेंट अ‍ॅण्ड डय़ू डिलिजन्स, कॉर्पोरेट रिस्ट्रक्चिरग, व्हॅल्यूएशन अ‍ॅण्ड इन्सॉल्व्हेन्सी, इन्र्फमेशन टेक्नॉलॉजी अ‍ॅण्ड सिस्टीम ऑडिट, फायनान्शिअल, ट्रेझरी अ‍ॅण्ड फोरेक्स मॅनेजमेंट, इथिक्स, गव्‍‌र्हनन्स अ‍ॅण्ड सस्टेनॅबिलिटी, अ‍ॅडव्हान्स्ड लॉज अ‍ॅण्ड प्रॅक्टिस, ड्रािफ्टग, अपिअरन्सेस अ‍ॅण्ड प्लीडिंग, बँकिंग लॉज अ‍ॅण्ड प्रॅक्टिस, कॅपिटल, कमोडिटी अ‍ॅण्ड मनी मार्केट्स, इन्शुरन्स लॉज अ‍ॅण्ड पॅ्रक्टिस, इंटलेक्चुअल प्रॉपर्टी लॉज अ‍ॅण्ड प्रॅक्टिस, इंटरनॅशनल बिझनेस लॉज अ‍ॅण्ड प्रॅक्टिसेस हे विषय शिकवले जातात.
*    पदवी अभ्यासक्रमानंतर हा अभ्यासक्रम करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी दोन टप्पे आहेत- एक्झिक्युटिव्ह आणि प्रोफेशनल प्रोग्रॅम. फी- फौंडेशन अभ्यासक्रम- ४,५०० रुपये. एक्झिक्युटिव्ह अभ्यासक्रम- वाणिज्य पदवीधर- ९,००० रुपये, इतर शाखेतील विद्यार्थी- १० हजार रुपये. कंपनी सेक्रेटरी फौंडेशन कोर्स उत्तीर्ण विद्यार्थी- ८,५०० रुपये. प्रोफेशनल प्रोग्रॅम- १२ हजार रुपये.
फौंडेशन प्रोग्रॅममधील बिझनेस कम्युनिकेशन हा विषय वगळता सर्व परीक्षा िहदी आणि इंग्रजी भाषेत देता येतात. तीनही प्रोग्रॅममध्ये पहिल्या प्रयत्नात उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. प्रत्येक विषयात किमान ४० टक्केआणि सरासरीने ५० टक्के गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांला उत्तीर्ण घोषित केले जाते.
विद्यार्थ्यांना पुढील प्रात्यक्षिक आणि प्रशिक्षण कार्यक्रम करावे लागतात. = सात दिवसांचा स्टुडंट इन्डक्शन प्रोग्रॅम = ७० तासांचा संगणक प्रशिक्षण कार्यक्रम- एक्झिक्युटिव्ह प्रोग्रॅम परीक्षेला बसण्यासाठी हे प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे.
= एक्झिक्युटिव्ह प्रोग्रॅम उत्तीर्ण झाल्यावर आणि १५ महिन्यांचे प्रशिक्षण सुरू होण्याआधी आठ दिवसांचा- एक्झिक्युटिव्ह डेव्हलपमेंट प्रोग्रॅम. = १५ महिन्यांच्या प्रशिक्षणात २५ तासांचे प्रोफेशनल डेव्हलपमेंट प्रोग्रॅम = एक्झिक्युटिव्ह प्रोग्रॅम किंवा प्रोफेशनल प्रोग्रॅम उत्तीर्ण झाल्यावर १५ महिन्यांचे प्रशिक्षण
= रजिस्ट्रार ऑफ कंपनीज, स्टॉक एक्स्चेंज/ फायनान्शियल अ‍ॅण्ड बँकिंग इन्स्टिटय़ूशन/ मॅनेजमेंट कन्सलटन्सी देणाऱ्या स्पेशलाइज्ड फर्ममध्ये १५ दिवसांचे प्रशिक्षण. = १५ दिवसांचे मॅनेजमेंट स्किल्स ओरिएंटेशन प्रोग्रॅम- १५ दिवसांचा प्रोफेशनल प्रोग्रॅम उत्तीर्ण झाल्यानंतर लायसन्शिएट आयसीएसआय म्हणून नोंदणी करता येते.
पत्ता- डायरेक्टोरेट ऑफ अ‍ॅकेडेमिक्स अ‍ॅण्ड प्रोफेशनल डेव्हलपमेंट, द इन्स्टिटय़ूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज, आयसीएसआय हाऊस, २२ इन्स्टिटय़ूशनल एरिया, लोधी रोड, न्यू दिल्ली- ११०००३. ई-मेल- info@ icsi.edu.in
इंटिग्रेटेड अभ्यासक्रम
द इन्स्टिटय़ूट ऑफ कंपनी सेक्रेटरी आणि सेंटर फॉर कॉर्पोरेट गव्‍‌र्हनन्स, रिसर्च अ‍ॅण्ड ट्रेनिंग या संस्थांनी तीन वर्षे कालावधीचा इंटिग्रेटेड अभ्यासक्रम सुरू केला आहे. हा इंटिग्रेटेड कंपनी सेक्रेटरी कोर्स पूर्णकालीन आहे. यामध्ये एक वर्षांच्या प्रशिक्षणाचा समावेश आहे. प्रवेशजागा- ५०. अर्हता- कोणत्याही शाखेतील ५० टक्के गुणांसह पदवी किंवा कंपनी सेक्रेटरी अभ्यासक्रमातील फौंडेशन कोर्स उत्तीर्ण. वयोमर्यादा- १ जुल २०१५ रोजी
२६ वर्षांपेक्षा अधिक नसावे. अभ्यासक्रमाच्या निवडीसाठी ऑनलाइन परीक्षा घेतली जाते. अंतिम निवड गटचर्चा आणि मुलाखतीनंतर केली जाते. CAT/ XAT/ NMAT/ SNAP/ MH-CET  यांसारख्या परीक्षांमध्ये उत्तम गुणांनी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना या परीक्षेतून सवलत मिळू शकते. मात्र तशी माहिती अर्जासोबत द्यावी लागेल.
पत्ता- प्लॉट नंबर १०१, सेक्टर १५, इन्स्टिटय़ूशनल एरिया, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई- ४००६१४.
ई-मेल- ccgrt@icsi.edu.in
वेबसाइट- www. icsi.edu.in/ ccgrt
नया है यह!
एमबीए-पीएचडी: हा डय़ुएल डिग्री अभ्यासक्रम अलाहाबादच्या इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ इन्र्फमेशन टेक्नालॉजीने सुरू केला आहे. अर्हता- ६० टक्के गुणांसह बीई किंवा बीटेक. या संस्थेला केंद्र सरकारने ‘इन्स्टिटय़ूशन ऑफ नॅशनल इम्र्पाटन्स’ असा दर्जा दिला आहे. पत्ता- देवघाट, झलवा, अलाहाबाद- २११०१२. वेबसाइट- http://www.iiit.ac.in