मुंबईच्या इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेच्या इंडस्ट्रियल ट्रेिनग सेंटरमधील डिझाइन विषयक विविध अभ्यासक्रमांची आणि त्यांच्या प्रवेशप्रक्रियेची माहिती..

मुंबईच्या इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी संस्थेच्या इंडस्ट्रिअल डिझाइन सेंटरमध्ये डिझाइन संबंधित विविध नाविन्यपूर्ण अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. अत्यंत आगळ्यावेगळ्या आणि सर्जनशील अशा या अभ्यासक्रमांची ओळख करून घेऊयात..

  • मास्टर ऑफ डिझाइन इन मोबिलिटी आणि व्हेइकल डिझाइन : आपण जेव्हा अद्ययावत आणि सर्जनशील निर्मिती असलेली वाहने बघतो तेव्हा सर्वप्रथम या वाहनांच्या डिझायनरना त्यांच्या सर्जनशीलतेसाठी आणि प्रतिभेसाठी सलाम ठोकावासा वाटतो. आज वाहन डिझायनिंग क्षेत्रात करिअरच्या उत्तमोत्तम संधी उपलब्ध होत आहेत. आयडीसीने ‘मास्टर ऑफ डिझाइन इन मोबिलिटी आणि व्हेइकल डिझाइन’ हा जागतिक दर्जाचा पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम सुरू केला आहे. या अभ्यासक्रमात व्यक्तिगत वाहनांच्या डिझाइनपासून सार्वजनिक वाहनांच्या डिझाइनपर्यंतचे शिक्षण-प्रशिक्षण दिले जाते. या अभ्यासक्रमाला दरवर्षी ५० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो.

अर्हता- कला शाखा, विज्ञान शाखा किंवा कॉम्प्युटर अ‍ॅप्लिकेशन या शाखांमधील पदव्युत्तर पदवी घेतली असल्यास ते या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी पात्र ठरतात. दहावीनंतरचा पाच वष्रे कालावधीचा जी. डी. आर्ट अभ्यासक्रम पूर्ण केलेले आणि या विषयातील एक वर्षांचा कार्यानुभव असलेले विद्यार्थीसुद्धा या अभ्यासक्रमास प्रवेश मिळण्यास पात्र ठरू शकतात. चार वष्रे कालावधीचा बॅचलर ऑफ फाइन आर्ट्स हा अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना तसेच नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ डिझाइनमधील पदवीधारकांना आणि कोणत्याही शाखेतील अभियांत्रिकी पदवीधरांनाही या अभ्यासक्रमास प्रवेश मिळू शकतो. विद्यार्थ्यांना पदवी परीक्षेमध्ये किमान ५५ टक्के गुण मिळणे आवश्यक आहे. अनुसूचित जाती-जमाती संवर्गातील उमेदवारांना ५० टक्के गुण मिळणे आवश्यक आहे.

प्रवेशपरीक्षा- सीईईडी अर्थात कॉमन एन्ट्रन्स एक्झामिनेशन फॉर डिझाइन.

या अभ्यासक्रमाच्या निवडीसाठी सीड म्हणजेच सीईईडी- कॉमन एन्ट्रन्स एक्झामिनेशन फॉर डिझाइन ही परीक्षा द्यावी लागते. या परीक्षेमध्ये विशिष्ट गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांना क्रिएटिव्ह इंटरअ‍ॅक्टिव्ह सेशन आणि मुलाखत हे दोन टप्पे पार पाडावे लागतात आणि त्यानंतर अंतिम निवड केली जाते. सर्जनशील काम सादर करण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते. ‘सीड’ परीक्षा दरवर्षी साधारणत: डिसेंबर महिन्यात घेतली जाते. या परीक्षेसाठी कोणतीही वयोमर्यादा नाही. शिवाय ही परीक्षा कितीही वेळा देता येते.

या परीक्षेचे दोन भाग असतात : पहिल्या भागात वस्तुनिष्ठ पद्धतीचे प्रश्न असतात. दुसऱ्या भागात डिझाइन आणि हस्त-चित्रकलेवर आधारित प्रश्न विचारले जातात. पहिल्या भागात उत्तीर्ण झाल्यानंतरच दुसरा भाग तपासला जातो. गुणवत्ता यादी तयार करण्यासाठी दुसऱ्या भागातील गुण ग्राहय़ धरले जातात. या परीक्षेची महाराष्ट्रातील केंद्रे आहेत- मुंबई, पुणे आणि नागपूर.

  • मास्टर ऑफ डिझाइन : इंडस्ट्रियल डिझाइन सेंटरमध्ये मास्टर ऑफ डिझाइन इन इंडस्ट्रियल डिझाइन, व्हिज्युअल कम्युनिकेशन, अ‍ॅनिमेशन डिझाइन आणि डिझाइन या विषयांच्या विविधांगी बाजूंवर संशोधन करण्याची सुविधा आणि संधी उपलब्ध करून दिली जाते. पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी स्वतंत्र चाळणी परीक्षा घेतली जाते. दरवर्षी मे महिन्यात पहिल्या आठवडय़ात ही परीक्षा घेतली जाते.
  • इंडस्ट्रियल डिझाइन : अर्हता- इंटिरिअर डिझाइन किंवा अभियांत्रिकी किंवा आíकटेक्चर किंवा डिझाइन या विषयातील पदवी परीक्षेत ५५ टक्के गुण किंवा बारावीनंतरचा चार वष्रे कालावधीचा व्यावसायिक डिझाइन पदविका अभ्यासक्रम, कम्युनिकेशन डिझाइन/ अ‍ॅनिमेशन डिझाइन, इंटिरिअर डिझाइन किंवा अभियांत्रिकी किंवा आíकटेक्चर किंवा डिझाइन किंवा बारावीनंतरचा चार वष्रे कालावधीचा बॅचलर ऑफ फाइन आर्ट्स अभ्यासक्रम किंवा दहावीनंतर एक वर्ष कालावधीचा फाऊंडेशन अभ्यासक्रम केल्यानंतर चार वष्रे कालावधीचा जीडी आर्ट डिप्लोमा आणि एक वर्षांचा कार्यानुभव प्राप्त केलेले विद्यार्थी.
  • इंटिरिअर डिझाइन : अर्हता- कला किंवा विज्ञान किंवा कॉम्प्युटर अ‍ॅप्लिकेशन या विषयातील पदव्युत्तर पदवी किंवा इंटिरिअर डिझाइन किंवा अभियांत्रिकी किंवा आíकटेक्चर किंवा डिझाइन या विषयातील पदवी परीक्षेत ५५ टक्के गुण किंवा बारावीनंतरचा चार वष्रे कालावधीचा व्यावसायिक डिझाइन पदविका अभ्यासक्रम किंवा बारावीनंतरचा चार वष्रे कालावधीचा बॅचलर ऑफ फाइन आर्ट्स अभ्यासक्रम किंवा दहावीनंतर एक वर्ष कालावधीचा फाऊंडेशन अभ्यासक्रम केल्यानंतर चार वष्रे कालावधीचा जीडी आर्ट डिप्लोमा आणि एक वर्षांचा कार्यानुभव प्राप्त केलेले विद्यार्थी.
  • बी.डिझाइन- एम.डिझाइन : २०१५ च्या शैक्षणिक वर्षांपासून या संस्थेने चार वष्रे कालावधीचा बॅचलर ऑफ डिझाइन आणि पाच वष्रे कालावधीचा बी.डिझाइन- एम.डिझाइन हा डय़ुएल डिग्री अभ्यासक्रम सुरू केला आहे. डय़ुएल डिग्री करण्याचा पर्याय विद्यार्थ्यांना तिसऱ्या वर्षांच्या शेवटी उपलब्ध करून दिला जातो. हे दोन्ही अभ्यासक्रम विशिष्ट प्रकारच्या गुणांकांवर आधारित असल्याने ते लवचिक स्वरूपाचे आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या गतीने हे अभ्यासक्रम पूर्ण करता येऊ शकतात. अभ्यासक्रमाचे माध्यम इंग्रजी आहे. या अभ्यासक्रमांना चाळणी परीक्षेद्वारे प्रवेश दिला जातो. संपर्क- हेड, इंडस्ट्रिअल डिझाइन सेंटर, इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी,

मुंबई- ४०००७६. ईमेल- office.idc@iitb.ac.in

संकेतस्थळ- www.idc.iitb.ac

पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा कोर्स इन ओ अ‍ॅण्ड एम ऑफ ट्रान्समिशन अ‍ॅण्ड डिस्ट्रीब्युशन सिस्टीम

सेंट्रल बोर्ड ऑफ इरिगेशन पॉवर या संस्थेत पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा कोर्स इन ऑपरेशन्स अ‍ॅण्ड मेन्टेनन्स ऑफ ट्रान्समिशन अ‍ॅण्ड डिस्ट्रीब्युशन सिस्टीम हा अभ्यासक्रम उपलब्ध आहे. कालावधी- २६ आठवडे.

अर्हता- इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रिकल अ‍ॅण्ड इलेक्ट्रॉनिक्स या विषयातील अभियांत्रिकी पदविका. या अभ्यासक्रमाच्या निवडीसाठी दहावी, बारावी, पदवी आणि गेट (ॅअळए- ग्रॅज्युएट अ‍ॅप्टिटय़ूड टेस्ट फॉर इंजिनीअर्स) या गुणांचा विचार केला जातो.

संपर्क- मालछा मार्ग, चाणक्यपुरी, न्यू दिल्ली- ११००२१. संकेतस्थळ- www.cbip.org ईमेल- cbip@cbip.org

 

नरोत्तम सेखसारिया शिष्यवृत्ती

देशातील आणि परदेशातील नामवंत विद्यापीठांमध्ये सामाजिक शास्त्रे, उपयोजित शास्त्रे, विज्ञान, विधी, स्थापत्यकला, व्यवस्थापन या विषयांमध्ये पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना या योजनेअंतर्गत शिष्यवृत्ती मिळू शकते. पदवीप्राप्त उमेदवार किंवा पदवी परीक्षेच्या अंतिम वर्षांला असलेले उमेदवार या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करू शकतात.

वयोमर्यादा- ३० वष्रे.

अर्ज ऑनलाइन करावा लागतो. या योजनेंतर्गत २० लाख रुपयांपर्यंत व्याजमुक्त कर्जाऊ शिष्यवृत्ती मिळू शकते.

पत्ता- नरोत्तम शेखसारिया फांऊडेशन, पहिला मजला, निर्मल बििल्डग, नरिमन पॉइंट, मुंबई- ४०००२१.

संकेतस्थळ- pg.nsfoundation.co.in