जाहिरात, चित्रपट, दूरचित्रवाणी यांसारख्या मनोरंजन क्षेत्राशी संबंधित क्षेत्रांतील अभ्यासक्रमांची सविस्तर माहिती..
चित्रपट, रेडिओ, दूरचित्रवाणी, जाहिरात या क्षेत्रांत करिअर करण्यासाठी दीर्घ मुदतीचे पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम निश्चितच उपयुक्त ठरतात. मात्र, हे दीर्घ मुदतीचे अभ्यासक्रम करणे ज्या विद्यार्थ्यांना शक्य होत नाही आणि ज्यांना या क्षेत्रात करिअर करण्याची आवड, इच्छा आणि कल आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी काही संस्थांनी अल्पमुदतीचे अभ्यासक्रम सुरू केले आहेत. हे अभ्यासक्रम प्रमाणपत्र अथवा पदविका स्तरावरील असतात.
या अभ्यासक्रमांद्वारे प्रामुख्याने छंद स्वरूपात जोपासल्या गेलेल्या विषयांचे प्रशिक्षण मिळू शकते. या प्रशिक्षणानंतर जे कौशल्य प्राप्त होते त्याचा प्रभावी व सर्जनशील वापर करता आला तर करिअरच्या विपुल संधी मिळू शकतात. हे क्षेत्र अतिशय स्पर्धात्मक असल्याने परिश्रम करण्याची तयारी ठेवावी लागते. स्वत:ला सतत अपडेट ठेवावे लागते. हे अभ्यासक्रम चालविणाऱ्या संस्थांची तसेच काही अल्प मुदतीच्या अभ्यासक्रमांची माहिती देत आहोत-

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

स्कूल ऑफ ब्रॉडकास्टिंग अ‍ॅण्ड कम्युनिकेशन :
* सर्टिफिकेट कोर्स इन डॉक्युमेंटरी फिल्म मेकिंग.
* स्क्रिप्ट रायटिंग अ‍ॅण्ड डायरेक्शन फॉर फिल्म अ‍ॅण्ड टेलिव्हिजन.
संपर्क- स्कूल ऑफ ब्रॉडकॉस्टिंग अ‍ॅण्ड कम्युनिकेशन, अंधाक्षी बिल्डिंग ३७, अंधेरी रिक्रिएशन क्लबच्या पाठीमागे, अंधेरी (पश्चिम), मुंबई- ४०००५८.
संकेतस्थळ- http://www.sbc.ac.in ईमेल- info@ sbc.ac.in
एएएफटी स्कूल ऑफ सिनेमा :
संस्थेने ३ महिने कालावधीचे पुढील अभ्यासक्रम सुरू
केले आहेत- ल्लप्रॉडक्शन डायरेक्शन अ‍ॅण्ड टीव्ही जर्नालिझम ल्लव्हिडीओ एडिटिंग अ‍ॅण्ड साऊंड रेकॉìडग, कॅमेरा अ‍ॅण्ड लायटिंग टेक्निक्स ल्लस्क्रीनप्ले रायटिंग ल्लसाऊंड रेकॉìडग अ‍ॅण्ड रेडिओ प्रॉडक्शन.
संपर्क- मारवाह स्टुडिओ कॉम्प्लेक्स, एफसी- १४/१५, फिल्म सिटी, सेक्टर- १६ ए, नॉयडा, उत्तर प्रदेश.
संकेतस्थळ- http://www.aaft.com ईमेल- help@aaft.com

मराठीतील सर्व way to success बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Media and entertainment industry
First published on: 05-06-2016 at 04:50 IST