18 September 2019

News Flash

स्प्रिंग ओनियन रिंगस्

प्लास्टिकच्या कागदाला तेल लावावे व गोल वडा थापावा.

73-lp-foodसाहित्य : मिश्र डाळींचे पीठ, हिरवी कांदा पात बारीक चिरलेली, लाल मिरची पावडर, आले- लसूण पेस्ट, पनीर, हळद, आमचूर पावडर, पावभाजी मसाला, किंचित साखर, मीठ, तेल.

कृती : मिश्र डाळींच्या पिठात वरील सर्व साहित्य घालून तेल घालून, पनीर कुस्करून घालावे व गोळा मळून अर्धा तास झाकून ठेवावा. नंतर प्लास्टिकच्या कागदाला तेल लावावे व गोल वडा थापावा. मग मधला भाग पाठीमागे सरकत न्यावा व िरगचा आकार द्यावा. कढईत लेत तापत ठेवावे व पुऱ्या तळतो त्याप्रमाणे या रिंगस् तळाव्यात. खुसखुशीत होतात.

डाएटविषयी जागरूक असणाऱ्यांनी या रिंग न तळता थालीपीठाप्रमाणे थोडे तेल घालून भाजल्यासही छान लागतील.

टीप : मिश्र डाळींच्या वापरामुळे हा प्रोटिनयुक्त पदार्थ हेल्दी तर आहेच, पण चटपटाही आहे. येथे हिरवी कांदा पात वापरली आहे; जी वात, कफ व पित्त – त्रिदाषहारक आहे. उन्हाळ्यात जरूर वापर करावा, शरीराला थंडावा मिळण्यासाठी. या पुदिन्याच्या हिरव्या चटणीबरोबर अथवा टोमॅटो केचपबरोबर खाव्यात.

74-lp-foodमलई आचारी आलू

साहित्य : बेबी पोटॅटो १०/१२, अथवा नेहमीचेच बटाटे, २/३ कांदे, २ टोमॅटो, ७/८ काजू, आचार मसाला, तूप अथवा तेल, जिरे, मीठ, साखर, मलई,

१ छोटा बाऊल, ४ लाल सुक्या मिरच्या, कोथिंबीर कढीपत्ता.

कृती : प्रथम नेहमीचे बटाटे उकडून मोठय़ा फोडी करून घ्याव्यात व तळून काढाव्यात अथवा प्रथम बेबी पोटॅटो साले काढून वाफवून घ्यावेत. एका

पॅनमध्ये तूप घालून काजू तळावेत. ते बाजूला ठेवावेत. त्यातच बेबी पोटॅटो तळून घ्यावेत. लालसर रंगापर्यंत तळावे. बाजूला ठेवावेत. नंतर तुपात जिरे व लाल मिरच्यांची फोडणी करावी. त्यात कांदा व टोमॅटो परतावा. आचार मसाला घालून परतावा. थोडे पाणी, मलई, मीठ, साखर घालून उकळी आणावी. रस दाट झाल्यावर त्यांत तळलेले बटाटे घाला व गॅस बंद करावा. एका खोलगट बाऊलमध्ये भाजी ठेवावी. कोथिंबीर व तळलेले काजू घालून सजवावी.

टीप –  आचार मसाल्यामुळे व लाल मिरच्यांमुळे ही भाजी चविष्ट तर लागतेच, पण दिसतेही छान. आपण इतरही भाज्या, फ्लॉवरचे तुकडे. छोटे कांदे, पनीरचे तुकडे घालूनही ही भाजी करू शकता. या भाजीबरोबर नान अथवा प्लेन पराठा खावा.

स्टार आईस्क्रीमएका बाऊलमध्ये पीच फळाचे तुकडे घालावे. त्यावर आवडीचा आईस्क्रीम स्कूप घालावा. ऑरेंज जॅम २ चमचे घालावा. गुलकंद २ चमचे घालावा.आवडीचे आईस्क्रीम परत घालावे. शेवटी ड्रायफ्रुटचे तुकडे घालावे.
वैशाली खाडिलकर – response.lokprabha@expressindia.com

First Published on April 15, 2016 1:05 am

Web Title: food recipes 28