03 August 2020

News Flash

सोपा बन पिझ्झा

साहित्य : मोठे बन्स, ढोबळी मिरची, कांदा, हिरव्या मिरच्या, पनीर, मोझेरोला चीझ, मशरूम, हवे असल्यास चिकनचे मीठ घालून शिजवलेले तुकडे...

lp59lp58साहित्य : मोठे बन्स, ढोबळी मिरची, कांदा, हिरव्या मिरच्या, पनीर, मोझेरोला चीझ, मशरूम, हवे असल्यास चिकनचे मीठ घालून शिजवलेले तुकडे, टोमॅटो सॉस, साखर, मीठ, गावरान तूप.

कृती : ढोबळी मिरची, कांदा, मशरूम, पनीर, हिरव्या मिरच्या बेतशीर आकारात कापून घ्याव्या. पॅनमध्ये तूप घालून हे सर्व हलके परतून घ्यावे. साखर, मीठ चवीप्रमाणे वापरावे.

बनची वरची लालसर चकती कापून घ्यावी. उरलेल्या बनला आतला मऊ भाग काढून वाटीचा आकार द्यावा. वाटीला आतून टोमॅटो सॉस, तुपाचे बोट लावून घ्यावे. आता या वाटीत परतलेली भाजी भरावी वर मोझेरोला चीझ किसून घालावे. मध्ये एक सॉसचा ठिपका लावावा. बनला खालून तूप लावून निर्लेप तव्यावर ठेवावे. वरून झाकण लावावे. ओव्हन असल्यास फारच छान. आठ-दहा मिनिटांत घरभर तयार पिझ्झाचा सुगंध पसरतो.

डॉ. अ. रा. गोडसे – response.lokprabha@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 27, 2015 1:16 am

Web Title: recipes 18
टॅग Recipes
Next Stories
1 पौष्टिक लाडू
2 डेव्हिल्स स्पॅगेटी
3 सेसमे वेजी रोल
Just Now!
X