कार्यशाळा

या स्पर्धेचे वेगळेपण म्हणजे विभागीय अंतिम फेरीच्या वेळी निष्णात वक्त्यांकडून ‘बोलणे’ या कलेबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. त्याशिवाय महाअंतिम फेरीत पोहोचलेल्या राज्यातील आठ उत्कृष्ट वक्त्यांसाठी १४ फेब्रुवारी रोजी, म्हणजेच महाअंतिम फेरीच्या आदल्या दिवशी एकदिवसीय कार्यशाळा घेण्यात येणार आहे.
या कार्यशाळेत कॉर्पोरेट वक्तृत्व, राजकीय वक्तृत्व, संभाषण कला, व्हॉइस मॉडय़ुलेशन्स आदी विषयांबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या कार्यशाळेनंतर स्पर्धकांना महाअंतिम फेरीसाठीचे विषय दिले जातील.