वसई : अंधेरीतील १५ वर्षीय शाळकरी मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीने हत्या करून पळून जाण्यासाठी एक आठवडय़ापूर्वी आईचे पाच तोळय़ांचे दागिने चोरले होते, अशी माहिती समोर आली आहे. वालिव पोलिसांनी याप्रकरणी मुलीचा प्रियकर संतोष मकवाना आणि त्याचा मित्र विशाल अंभवणे या दोघांना गुजरातच्या पालनपूर येथून अटक केली आहे.

२६ ऑगस्ट रोजी अंधेरी येथे राहणाऱ्या १५ वर्षीय शाळकरी मुलीचा मृतदेह नायगाव येथील झुडपात मिळाला होता. त्याच दिवशी पोलिसांनी तिची ओळख पटवली होती. तिचा प्रियकर संतोष मकवाना याने ही हत्या केल्याचे निष्पन्न झाले होते. या मुलीची ओळख आरोपी संतोष मकवानाबरोबर समाजमाध्यमावर झाली होती. आरोपी मकवाना हा बेरोजगार होता. मुलीच्या कुटुंबीयांना त्यांचे प्रेमसंबंध मान्य नव्हते. त्यामुळे मुलीच्या आईने आणि बहिणीने संतोष याला दमदाटी केली होती, तसेच पोलीस ठाण्यात तक्रारही दिली होती. त्याचा राग आरोपीच्या मनात होता. त्याचा सूड घेण्यासाठी त्याने एक आठवडय़ापूर्वी प्रेयसीच्या हत्येची योजना बनवली होती. संतोषने या कटात त्याचा मित्र विशाल अंभवणे याला सोबत घेतले होते. हत्येच्या एक आठवडय़ाआधी या दोघांनी ही योजना बनवली होती. विशालने आपल्या घरातून आईचे पाच तोळे दागिने चोरले होते. त्याचे त्यांना दीड लाख रुपये मिळाले होते. २५ ऑगस्ट रोजी मकवाना याने त्याच्या प्रेयसीला विशालच्या जुहू येथील घरी बोलावले. दुपारी सव्वाबारा वाजता ती घरात आली. त्या वेळी मकवाना याने तिच्याशी शरीरसंबंध प्रस्थापित केले आणि त्यानंतर ती बेसावध असताना तिची दोघांनी मिळून चाकूचे वार करून हत्या केली.
पोलीस उपायु्क्त संजयकुमार पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलास बर्वे, पोलीस निरिक्षक राहुल पाटील (गुन्हे) आणि गुन्हे प्रकटीकरण शाखेचे साहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर फडतरे यांच्या पथकाने आरोपींना अटक केली.

Pune, Father, murder son, pune latest news,
पुणे : वडिलांनी दिली मुलाला मारण्यासाठी ७५ लाखांची सुपारी
Slum Improvement Board, contract,
मुंबई : झोपडपट्टी सुधार मंडळातील ‘कंत्राटा’साठी गोळीबार!
girl Bangladesh sexually assaulted,
डोंबिवलीतील पलावा गृहसंकुलात दोन भावांकडून बांगलादेशमधील अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार
fake documents for passport
पारपत्रासाठी बनावट कागदपत्र देणाऱ्या तरुणाविरोधात गुन्हा दाखल

..चुकून फोन सुरू झाला
या मुलीचा मृतदेह घरातील बॅगेत भरून ती बॅग नायगाव येथे आणून टाकली. पोलिसांना चकमा देण्यासाठी दोघांनी वसईतील एका दुकानातून कपडे विकत घेऊन स्कायवॉकवर बदलले आणि ओळख पटू नये यासाठी केस कापले. वसईतून विरार- विरारवरून वसई असे फिरत रात्री जोधपूर एक्स्प्रेसने गुजरातला रवाना झाले होते. पोलीस मागावर असल्याने दोघे जोधपूर, माऊंट आबू येथे गेले. त्यानंतर वैष्णवदेवी येथे जाऊन देवदर्शन करत होते. दरम्यान, अहमदाबाद येथे असताना आरोपीचा फोन चुकून एकदा सुरू झाला होता. पोलिसांनी त्यानुसार तपास करत आरोपींच्या नातेवाईंकांकडे सापळा लावला होता. गुजरातमधील पालनपूर येथील एका नातेवाईकाकडे ते आले असता स्थानिक पोलिसांच्या मदतीने आरोपींना अटक करण्यात आली.