दिवाळीत ऑनलाइन खरेदी करताना सावधान

दिवाळी हा भारतीयांचा सर्वात मोठा सण. या सणात मोठ्या प्रमाणावर खरेदी केली जाते. सध्या स्मार्ट डिजिटल युगात ऑनलाईन खरेदीकडे लोकांचा कल असतो.

fraud
सायबर फसवणूक (फोटो: IE)

सायबर भामटे सक्रीय; पोलिसांच्या सावधगिरीच्या सुचना

वसई: दिवाळी सणाच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणावार ऑनलाईन खरेदी होत असल्याने सायबर भामटे देखील सक्रीय झाले आहे. ऑनलाईन खरेदी करणार्या नागरिकांची विविध प्रकारे फसवणूक केली जात आहे. यासाठी पोलिसांनी नागरिकांना सावधगिरीच्या सुचना दिल्या आहेत.

दिवाळी हा भारतीयांचा सर्वात मोठा सण. या सणात मोठ्या प्रमाणावर खरेदी केली जाते. सध्या स्मार्ट डिजिटल युगात ऑनलाईन खरेदीकडे लोकांचा कल असतो. घरबसल्या लोकं ऑर्डर करून खरेदी करत असतात. ऑनलाईन पैसे भरण्याच्या अनेक सुविधा उपलब्ध झाल्याने ऑनलाईन खरेदी वाढली आहे. त्यामुळे सायबर भामटे या काळात सक्रीय झाले आहेत. ते ऑनलाईन शॉंपिग करणार्यांची फसणवूक करत असतात. अशा अनेक घटना वाढल्या असल्याने पोलिसांनी नागिरकांसाठी सावधगिरीच्या सूचना देत खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.  क्रेडीट कार्डने ऑनलाईन खरेदी करा परंतु गिफ्ट कार्ड मनी ट्रान्सफर्र किंवा क्रिप्टोकरन्सीद्वारे -पेमेंट स्विकारणाऱ्या ऑनलाईन विक्रेत्यांकडून काळजीपूर्वक व्यवहार करा ते बनावट असु शकतात, असे पोलिसांनी सांगितले आहे. कोणत्याही नविन वेबसाईटवरून खरेदी करण्यापूर्वी त्याबद्दल संपूर्ण माहीती गोळा करा, डेबिट कार्डासह ऑनलाईन शॉपींग टाळा असे आवाहन पोलिसांनी केले आहे. जर तुमच्या कार्डमध्ये छेडछाड (क्र्लोंनग) झाली असेल तर पैसे थेट तुमच्या बँक खात्यातून घेतले जातात. त्यामुळे तुम्हाला मोठी हानी होण्याचा धोका संभवतो, याकडे पोलिसांनी लक्ष वेधले आहे.

ऑनलाईन शाँपिग करीत असताना नेहमी सुरक्षीत संकेतस्थळाचा वापर करावा, पासवर्ड ठरविक वेळेने बदलत रहाणे. एसएमएस, व्हॉट्सअ‍ॅप माध्यमाद्वारे आलेल्या लिंकवर क्लिक करून ऑनलाईन खरेदी करणे टाळणे, तसेच थेट बँक खात्याऐवजी क्रेडीट कार्ड अथवा वॉलेटचा वापर करावा असे मिरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या सायबर कक्षाने प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व वसई विरार बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Be careful when shopping online on diwali cyber hackers active akp

Next Story
१३१ दिवसांत दीड लाख लसीकरण
ताज्या बातम्या