लोकसत्ता, विशेष प्रतिनिधी

वसई : इमारतीच्या आवारातील उद्यानात खेळताना वीजेच्या खांबाचा धक्का लागून ९ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. वसई पूर्वेच्या एव्हरशाईन येथील स्काय हाईटस सोसायटीत ही दुर्घटना घडली.

आणखी वाचा-खिशातील एक चिठ्ठी आणि गुगलवरून शोध, महामार्गावरील तरुणाच्या हत्येची उकल

वसई पूर्वेच्या एव्हरशाईन येथे स्काय हाईटस नावाची इमारत आहे. रात्री या इमारतीच्या आवारातील उद्यानात मुले खेळत होते. जोसेफ प्रभू (९) हा मुलगा खेळात खेळता उद्यानातील एका विद्युत खांबाला स्पर्श केला. त्याला वीजेचा झटका लागल्याने खाली पडला. त्याला उपचारासाठी जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या प्रकरणी आचोळे पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.