सायबर भामट्यांनी लंपास केलेली सव्वा तीन लाखांची पूर्ण रक्कम काशिमिरा पोलिसांनी तक्रारदाराला परत मिळवून दिली आहे. तक्रार प्राप्त होताच काशिमिरा पोलिसांनी तात्काळ कारवाई करून खाती गोठवली आणि सायबर भामट्यांना त्यावर डल्ला मारता आला नाही. मिरा रोड येथे राहणारे तक्रारदार दर्शन व्यास यांना आर्थिक अडचण होती. त्यासाठी त्यांनी कर्ज घेण्यासाठी गुगलवरून ‘क्रेडीट इन्स्टॉलमेंट लोन’ नावाचे ॲप डाऊनलोड केले होते. मात्र हे लोन ॲप बनावट होते.

हेही वाचा >>> वसईतील प्रसिध्द सलीम कॅसेटवाला हत्या प्रकरण; फरार आरोपी क्लेमेन लोबोला ३६ वर्षांनी अटक

first case registered for violation of code of conduct in mira road
मिरा रोड येथे आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी पहिला गुन्हा दाखल
vasai crime news, wife s murder accused marathi news
वसई: पत्नीच्या हत्येचा आरोपी पॅरोलवरून फरार, वालीव पोलिसांनी ५ वर्षानंतर केली अटक
Vasai, Fake Doctor, Wrong Surgery, Leads to Death, woman, Social Activist, marathi news, maharashtra,
वसई : बोगस डॉक्टरने घेतला महिलेचा बळी; चुकीच्या शस्त्रक्रियेमुळे महिला ४ वर्षे अंथरूणात
Sexual abuse of young woman by pretending treatment case filed against self-proclaimed doctor in Nalasopara
उपचाराच्या नावाखाली तरुणीवर लैंगिक अत्याचार, नालासोपार्‍यात स्वयंघोषित वैद्याविरोधात गुन्हा दाखल

दर्शन व्यास यांनी या लोन ॲपच्या सायबर भामट्याने कर्ज घेण्यासाठी विविध शुल्कापोटी वेगवेगळी कारणे सांगून  ३ लाख २९ हजार रुपये भरण्यास सांगितले होते. ही रक्कम वेगवेगळ्या खात्यात जमा झाली होती. मात्र एवढे करूनही व्यास यांना कर्ज मिळाले नाही तसेच त्यांनी शुल्कापोटी भरलेली सव्वातीन लाखांची रक्कमही मिळाली नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच व्यास यांनी काशिमिरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी या फसवणुकीप्रकरणी कलम ४२०, ३४ सह माहिती तंत्रत्रान अधिनियमाच्या कलम ६६ (सी) आणि ६६ (डी) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

हेही वाचा >>> विजय वल्लभ रुग्णालय आग; दुर्घटनेचा अहवाल ३ वर्षांनी उघडकीस, पालिकेचे अनेक अधिकारी दोषी

तक्रारदार व्यास यांनी भरलेली रक्कम वेगवेगळ्या बॅंक खात्यात जमा करण्यात आली होती. मात्र वेळीच तक्रार आल्यानंतर काशिमिरा पोलिसांनी तात्काळ संबंधित बॅंकेशी संपर्क साधून रक्कम गोठवली होती. नंतर पोलिसांनी न्यायालयात पत्रव्यवहार करून फसवणूकीची रक्कम तक्रारदाराला परत मिळवून दिली. काशिमिरा पोलिसांनी तात्काळ कारवाई केल्याने सायबर भामट्यांना रक्कम काढून घेण्यापूर्वीच गोठविण्यात आली. सायबर गुन्ह्यात फसवणूक झालेली रक्कम शंभर टक्के परत मिळवून देण्याची ही दुर्मीळ घटना आहे.

काय काळजी घ्यावी?

सायबर भामटे सक्रीय झाले असून नागरिकांनी अनोळख्या व्यक्तींशी व्यवहार करताना सावध रहावे, असे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे. ऑनलाईन फसवणूक झाल्यास तात्काळ १९३० या हेल्पनाई क्रमांकावर किवा शासनाच्या सायबर गुन्ह्याच्या संकेतस्थळावर तक्रार करावी, असे आवाहन काशिमिरा पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांनी केले आहे.