वसई : कचरा संकलनासाठी महापालिका कोटय़वधी रुपये खर्च करत आहे. मात्र या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी कुठलीही यंत्रणा नसल्याने कचऱ्यातून निघणारे प्लास्टिक बेकायदेशीरपणे परस्पर विकले जात असल्याचे उघड झाले आहे.

वसई, विरार शहरात दिवसाला ७५० मॅट्रिक टन कचरा जमा होतो. हा कचरा संकलित करण्यासाठी पालिकेने प्रभागनिहाय नऊ ठेकेदारांची नेमणूक केली आहे. सार्वजनिक ठिकाणे साफसफाईची कामे आणि शहरात जमा होणारा कचरा जमा करून संकलित करून कचराभूमीत टाकला जातो. या कामासाठी पालिकेने २० प्रभाग तयार केले आहेत. त्यासाठी  ३ हजार ३९७ मनुष्यबळाचा वापर केला जातो. त्यांच्या पगारावर मासिक १० कोटी रुपयांचा खर्च होतो. याशिवाय कचरा वाहून नेण्यासाठी ६७ कॉम्पॅक्टर, ११४ टीपर, ४८ डम्परवर आणि २० ट्रॅक्टर वापरले जातात. या वाहनांसाठी महिन्याला सव्वातीन कोटी रुपयांचे इंधन वापरले जाते. परंतु एवढा खर्च करूनही पालिकेला कचऱ्याच्या विल्हेवाट लावण्याचा प्रकल्प सुरू करता आला नाही. त्यामुळे शहरातून निघणाऱ्या कचऱ्यातील प्लास्टिकची बेकायदा विक्री होत असल्याचे समोर आले आहे.

Water scarcity, Badlapur, Ambernath,
बदलापूर, अंबरनाथमध्ये शुक्रवार, शनिवारी पाणीबाणी; तातडीच्या कामांसाठी बॅरेज जलशुद्धीकरण केंद्र १२ तास बंद
navi mumbai illegal nursery marathi news
नवी मुंबई: कारवाईनंतरही रोपवाटिका उभी, एनआरआय परिसरात डीपीएस शाळेजवळील भूखंडावर पुन्हा अतिक्रमण
धूळ नियंत्रण वाहनांमुळे नागरिकांबरोबरच झाडांचाही मोकळा श्वास
High rate of gold prices in the domestic market
सोन्याचा सार्वकालिक उच्चांक; मुंबईत तोळ्यामागे घाऊक भाव ७०,४७० रुपयांवर

ठेकेदार आणि कर्मचाऱ्यांचे संगनमत

कचराभूमीत जमा होणाऱ्या कचऱ्यात मोठय़ा प्रमाणावर प्लास्टिक जमा होते. ठेकेदार आणि कर्मचारी यांच्या मदतीने हे प्लास्टिक गोळा केले जाते आणि ते परस्पर भंगारात विक्री केले जाते. त्यातून लाखो रुपयांचा महसूल जमा होत असतो. पालिका कचरा संकलनासाठी कोटय़वधी रुपये खर्च करते तर कचऱ्यातून निघणाऱ्या प्लास्टिकमधूनदेखील पालिकेला उत्पन्न मिळायला हवे. मात्र पालिकेच्या दुर्लक्षामुळे ठेकेदार कचऱ्यातून फायदा मिळवत आहेत.

क्लिनअप मार्शलकडून बेकायदा वसुली सुरूच ; नवीन ठेकेदार नियुक्तीची प्रक्रिया थंडावली

वसई : क्लिनअप मार्शलकडून बेकायदा वसुली करणे तसेच उर्मट वर्तन करण्याचे प्रकार सुरूच आहे. तक्रारी करूनही पालिकेकडून काहीच करावाई केली जात नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. क्लिनअप मार्शलचा ठेका रद्द करून नवीन ठेकेदार नियुक्त करम्ण्याची प्रक्रिया थंडावल्याने क्लिनअप मार्शलकडून नागरिकांची लूट सुरूच आहे.

सार्वजनिक ठिकाणी कचरा फेकणे आणि शहर अस्वच्छ करणाऱ्यांविरोधात दंडाची आकारणी करण्यासाठी  महापालिकेने खासगी ठेकेदारांमार्फत क्लिनअप मार्शलची नियुक्ती केली आहे. मात्र हे क्लिनअप मार्शल नागरिकांनाकडून बेकायदा दंडवसुली करत असल्याच्या अनेक तक्रारी येत होत्या. मागील महिन्यात वालीव पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाहनचालकांना अडवून त्यांच्याकडून वसुली केली जात असल्याने तीन जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते.  हा प्रकार अद्यापही सुरू आहे.  याप्रकरणी पालिकेकडे तक्रारी केल्यावर केवळ कारवाईचे आश्वासन दिले जाते मात्र त्यांच्यावर कारवाई केली जात नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. क्लिनअप मार्शलने अनेक प्रकारे दंडात्मक कारवाई करणे अपेक्षित होते. मात्र त्या कारवाई करण्यासाठी ते अकार्यक्षम ठरले.  जुलै महिन्यातच ठेकेदारांचा ठेका रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. नवीन  नियुक्ती करण्याची प्रक्रिया सुरू केल्याचे पालिकेने जाहीर केले होते. परंतु अद्याप नवीन ठेकेदार नियुक्त केलेले नाहीत.