वसई : नालासोपाऱ्यामधील तुळींज पोलीस ठाण्यातच एका तरुणाने पोलिसाला मारहाण केल्याची घटना घडली आहे. या मारहाणीत पोलिसाचा दात तुटला आहे. तुळींज पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे. प्रवीण रानडे (३३) हे पोलीस शिपाई वसई वाहतूक शाखेत कार्यरत आहेत. सोमवारी दुपारी दिडच्या सुमारास ते नालासोपारा पूर्वेच्या उड्डणापूलाजवळ कर्तव्यावर होते. त्यावेळी शैलैश वाघेला (३६) याने रिक्षातून रानडे यांचे मोबाईल मधून चित्रिकरण करण्यास सुरवात केली. त्याला रानडे यांनी आक्षेप घेत कारण विचारले. मात्र वाघेला याने रानडे यांनी दमदाटी केली करत शिविगाळ केली. त्यामुळे वाघेला याला शांततेची समज देण्यासाठी तुळींज पोलीस ठाण्यात आणले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा : मिरा-भाईंदरमध्ये भीषण पाणीटंचाई; दोन दिवसांपासून पाणीपुरवठा बंद, नागरिकांचे हाल

यावेळी रानडे हे ठाणे अंमलदाराकडे हकिगत सांगत असताना पुन्हा वाघेला याने रानडे यांना शिविगाळ केली श्रीमुखात लगावून दिली. काही कळण्याच्या आतच वाघेला वर्दी खेचून खेचून ठोसा मारला. या प्रकारात रानडे यांच्या उजव्या बाजूचा दात तुटला. अचानक हा प्रकार घडल्याने खळबळ उडाली. पोलीस ठाण्यातील इतर पोलीस मदतीला आले आणि रानडे यांची सुटका करत आरोपीला ताब्यात घेतले. याप्रकरणी तुळींज पोलिसांनी सरकारी कामात अडथळा आणि मारहाण केल्याप्रकरणी आरोपी शैलेश वाघेला याच्याविरोधात कलम ३५३, ३३२, ५०४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलीस ठाण्यातच पोलिसांवर हात उचलण्याच्या घटना घडू लागल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In vasai police beaten up at tulinj police station teeth broken by a youth css
Show comments