सुहास बिऱ्हाडे

वसई : राज्य शासनाने रस्ते अपघात विमा योजना ‘महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजने’मध्ये विलीन केली आहे. मात्र यामुळे अपघात विमा योजनेला असलेले शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव वगळले गेले आहे. योजनेच्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीमध्ये अपघात विमा योजनेचा उल्लेख असला तरी बाळासाहेबांचे नाव ‘गायब’ झाल्याबद्दल ठाकरे गटाच्या नेत्यांनी टीका केली आहे.

shekhar charegaonkar fraud marathi news
राज्य सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष शेखर चरेगावकर यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला, गुंतवणूकदारांची फसवणूक
lok sabha 2024, Vijay Wadettiwar Alleged BJP Entry, Dharmarao Baba Aatram , Chandrasekhar Bawankule , gadchiroli lok sabha seat, election 2024, Dharmarao Baba Aatram alleges Vijay Wadettiwar, congress, bjp, ajit pawar ncp, gadchiroli news, marathi news
“विजय वडेट्टीवार यांना मंत्रिपदाच्या काळातही भाजपात येण्याची घाई झाली होती…” धर्मरावबाबा आत्राम यांचा गौप्यस्फोट; म्हणाले, “त्या बैठकीत मी…”
Prime Minister Modi criticism in Kanhan meeting that India is anti development
‘इंडिया’ विकासविरोधी! कन्हानच्या सभेत पंतप्रधान मोदी यांचे टीकास्त्र
Government failure to take action against misleading companies Supreme Court verdict on Patanjali case
दिशाभूल करणाऱ्या कंपन्यांवर कारवाईबाबत सरकार अपयशी; पतंजली प्रकरणावरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशोरे

रस्ते अपघातांमध्ये जखमींना आर्थिक मदत देण्यासाठी २०२० मध्ये तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने ‘स्व. बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजने’ची घोषणा केली होती. याअंतर्गत जखमींना ३० हजारांपर्यंत विविध ७४ उपचारांचा खर्च मोफत केला जाणार होता. मात्र तीन वर्षांपासून विविध कारणांमुळे ही योजना लागू झाली नव्हती. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारने बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात योजना अधिक प्रभावीपणे राबविण्याची घोषणा केली. मात्र २८ जुलै रोजी काढण्यात आलेल्या अध्यादेशाद्वारे योजना स्वतंत्रपणे न राबविता ‘महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजने’अंतर्गतच अंमलबजावणी होणार असल्याचे सरकारने स्पष्ट केले. सुधारित योजनेनुसार अपघातातील उपचारांची संख्या ७४ वरून १८४ करण्यात आली तर १ लाखापर्यंतचा खर्च मोफत करण्यात आला आहे.

रविवारी शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने जाहिरातीत महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना व आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या जाहिरातीमध्येच रस्ते अपघात योजनेचा तपशीलही देण्यात आला असला तरी बाळासाहेब ठाकरे यांचे नाव मात्र नाही. यावरून शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. महायुती शासनाचे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दलचे प्रेम बेगडी असल्याचे यामुळे स्पष्ट होते, अशी टीका ठाकरे गटाचे प्रवक्ते खासदार अरविंद सावंत यांनी केली. याबाबत आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्याशी सलग दोन दिवस संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही. मात्र त्यांच्या खासगी सचिवांनी ‘एकाच जाहिरातीत सर्व मजकूर समाविष्ट करता येत नसल्याने बाळासाहेब ठाकरे योजनेचे नाव जाहिरातीत टाकले नाही,’ असे उत्तर दिले. बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने स्वतंत्र जाहिरात काढणार असल्याची सारवासारवही त्यांनी केली. तर बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात योजना समाविष्ट करण्यात आल्याची माहिती महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली. आपण नुकताच पदभार घेतला असल्याने आधीच्या नावाबाबत काही माहिती नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

मुळात जी योजना स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने होती त्या योजनेचे स्वतंत्र अस्तित्व न टिकवता ती दुसऱ्या योजनेते समाविष्ट केली आणि ते करतानाही बाळासाहेबांचे नाव काढून टाकले हे संतापजनक आहे.- अरविंद सावंत, प्रवक्ते, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)