पाळीव प्राणी असलेले घर वेगळेच भासते. त्या घरात आणि घरच्या माणसांच्या मनात या ‘सोबत्यां’ची एक खास जागा असते. आपल्या घरातीलही अशा लडिवाळ सदस्यांचे घराशी असलेले ऋणानुबंध उलगडून दाखवणार आहेत, कलाक्षेत्रातील प्रसिद्ध 

हे तीन कुत्रे म्हणजे आमच्या घराचे अतिशय महत्त्वाचे तीन सदस्य आहेत. प्रत्येकाचं घराशी एक छान वेगळं नातं आहे. यांच्याशिवाय घर घरच वाटत नाही. घराच्या वेगवेगळ्या कोपऱ्यात जर हे तिघे नसतील, तर खरंच चुकल्यासारखं होतं.

children holidays, holidays, Parents worry,
सांदीत सापडलेले : सुट्टी!
couple confessed to murdering the girl as they could not take care of it
मुलीचा सांभाळ करता येत नसल्याने केली हत्या, दाम्पत्याची कबूली
dombivali, 17 year old bangladeshi girl,
आईला वेश्याव्यवसायातून वाचवण्यासाठी मुलीनं केलं बाळाचं अपहरण..
girlfriend who murder lover
कोल्हापूर : प्रियकराचा खून करून मृतदेह जाळणाऱ्या प्रेयसीसह आरोपींच्या हातात बेड्या; आजरा पोलिसांची दमदार कामगिरी

तशी प्राण्यांपासून मी चार हात लांबच राहणारी मुलगी. मांजर असू दे किंवा कुत्रा- ते दिसले रे दिसले की मीच धूम पळत सुटायचे. अशा माझ्याकडे कधीकाळी पाळीव प्राणी असतील, असा मी स्वप्नातही विचार केला नव्हता. पण आज पाहा, माझ्याकडे चक्क ३ कुत्रे आहेत. जेरी, किवी आणि अ‍ॅलीस हे आमचं लाडकं त्रिकूट. पण हा बदल घडवला तो आमच्या सिंच्युने. ती म्हणजे आमची मांजर. आता ती आमच्यात नाही.

साधारण ३-४ वर्षांपूर्वी एकदा सहज एक मांजरीचं इटुकलं पिल्लू आमच्या दारात आलं. कसं काय कुणास ठाऊक. मी त्याला जवळ घेतलं आणि या सिंच्युने (तिचं नाव) मला बदलूनच टाकलं. मांजरांपासून लांब पळणारी मी तिला मस्त सांभाळायला लागले. मला दोन भाऊ आहेत. त्या दोघांना कायम कुत्रा पाळायचा होता, पण मला कुत्र्यांची भीती वाटत असल्यामुळे त्या दोघांना कधीच ती संधी मिळाली नव्हती. सिंच्युला बघून एक दिवस माझ्या भावाने कुत्रा घरी आणला. त्याने याबद्दल कुणाला काहीच सांगितलं नव्हतं. मला तर सांगायचा प्रश्नच नव्हता, कारण मला कुत्र्याची भीती वाटते, हे त्याला माहिती होतं. त्या दिवशी मी बेडरूममध्ये गेले तर माझ्या पायाला काहीतरी मऊमऊ लागलं. पाहते तर काय, एक चिंटुकलं कु त्र्याचं पिल्लू म्हणजेच आमचा जेरी. आधी मी त्याला घाबरले पण १०च दिवसांत जेरीने मला लळा लावला. इतका की जेरी माझा सगळ्यात लाडका आहे. एक वर्षांने त्याला कंपनी म्हणून किवी आली. जेरी आणि किवी दोघेही ‘बिगल्स’आहेत. हे दोघं आमच्या घरात रुळल्यानंतर आमच्याकडे आली अ‍ॅलीस. ही लॅब आणि हस्की या मिश्र जातीची एक देखणी कुत्री आहे.

हे त्रिकूट म्हणजे आमच्या घराचा जीव की प्राण आहे. यातल्या प्रत्येकाचा स्वभाव, आवडीनिवडी सगळं काही वेगळं आहे. जेरीला आम्ही शहाणा म्हाताराच म्हणतो. याचं नाक जरा वरच असतं. म्हणजे अगदी गंभीरपणाचा आव आणून बसणार हा. घरात घडलेल्या प्रत्येक गोष्टीची खबर याला असायलाच हवी. माझ्या बेडरूमच्या बाहेरच्या पायपुसण्यावर बसायला जेरीला फार आवडतं. त्याला खोलीत बंदिस्त राहायला अजिबात आवडत नाही. पाहुणे आले की जेरीलासुद्धा आमच्यासोबत हॉलमध्येच ठाण मांडायचं असतं, कारण आम्ही काय बोलतोय, हे ऐकण्यात त्याला प्रचंड रस असतो. कधीकधी काही पाहुण्यांना कुत्र्यांची भीती वाटते, अशावेळी जेरीला जर खोलीत ठेवायला गेलो तर तो ओरडून घर डोक्यावर घेईल. किवी सगळ्यात शहाणी मुलगी आहे. ती खरंच फार शिस्तीची आहे, तिला एकदा सांगितलं की, अमुक ते करायचं नाही की ती करणार नाहीच. सांगितलेलं सगळं ऐकते आमची किवी. याउलट अ‍ॅलीस. बाई एकदम दंगेखोर. ती लहान होती आणि आमच्याकडे नव्यानेच आली होती, तेव्हा ती खेळताना खूपदा कुंडय़ा पाडायची. मग आम्ही तिला रागवायचो आणि पिंजऱ्यात बंद करायचो. नंतर नंतर अ‍ॅलीसला याची इतकी सवय झाली की, तिने कुंडी पाडली आणि आम्ही कुणी पाहिलं की अ‍ॅलीस स्वत:च अगदी बिचाऱ्यासारखी पिंजऱ्यात जायची. तिला कळायचं, आता आपल्याला ओरडा बसणार आहे. या तिघांनाही सोफ्यावर आणि बेडवर चढायला भयंकर आवडतं. पण आम्ही त्यांना ते करू देत नाही, त्यामुळे मग खटय़ाळ मुलांसारखे हे तिघेही आम्ही आसपास नसल्याची संधी साधून सोफ्यावर चढून बसतात. पण आम्ही खोलीत आलो रे आलो की, ओरडायच्या आधी चूपचाप खाली येतात. मी घरी आल्याबरोबर हे तिघेही ज्या प्रेमाने माझं स्वागत करतात, ते केवळ शब्दातीत आहे. मी आत आल्या आल्या, अ‍ॅलीस जिन्यावर चढते, आणि मला जणू सांगते, आता मी तुझ्या लेव्हलला आलेय. माझे लाड कर. किवी आणि जेरीचं असं काहीच नसतं. किवी स्वत: खूप प्रेम करते, त्याबदल्यात आपण काही करावं, अशी बिचारीची अजिबात अपेक्षा नसते आणि जेरी मात्र शहाणाच आहे. तो त्याच्याच नादात असतो. त्याची आणखी एक गंमत बॅडमिंटन खेळतानाची- रॅकेटवरचं ते फूल म्हणजे त्याला कोंबडीचं पिल्लूच वाटतं. त्यामुळे आम्ही खेळत असलो की जेरीची प्रचंड पळापळ सुरू असते. माझ्या भावाला पेढे खूप आवडतात. एकदा मी त्याला पेढे घेऊन आले. ते टेबलावर ठेवले होते. आमच्या जेरी महाशयांना याचा पत्ता लागला आणि एक एक करून साहेबांनी सगळे पेढे फस्त करून टाकले. त्यादिवशी जेरी दिवसभर माझ्याशी खूपच गोड वागत होता. माझे लाड करत होता, खेळत होता. मला कळेना हा एवढा प्रेमात का आलाय? नंतर संध्याकाळी पाहते तो काय, पठ्ठय़ाने पेढे संपवले होते आणि दिवसभराची सगळी लाडीगोडी त्या पेढय़ांसाठी होती.

आमच्या या त्रिकूटाला आपलं मराठमोळं जेवण भयंकर आवडतं बरं का! खिचडी, रव्याचे लाडू, थालीपीठ या गोष्टी म्हणजे त्यांचा जीव की प्राण. हे केलेलंसुद्धा त्यांना लग्गेच कळतं. त्यामुळे यांना नैवेद्य दाखवल्याशिवाय आमची गाडी पुढे सरकतच नाही.

घरातली आपली जशी एखादी लाडकी जागा असते, तशी या तिघांचीही आहे. माझ्या दादाची खोली त्यांची आवडती आहे. एकतर तोच त्यांचं सगळं करतो. दुसरं म्हणजे दादाच्या रूममध्ये यांना कसलीही दंगामस्ती करता येते. तो बिचारा अजिबात ओरडत नाही. घराच्या एखाद्या मोक्याच्या कोपऱ्यात, म्हणजे जिथून अख्खं घर दिसेल, अशा जागी असतो आमचा जेरी. याशिवाय दरवाजाच्या मागे आणि टेबलाखाली बसायलाही त्याला खूप आवडतं. किवीला खिडकी आवडते. तर अ‍ॅलीस मात्र अंगणात रमते. तिघांना अंगणात खेळायला आवडतं. पण त्यापलीकडे लगेच सुरू होणाऱ्या रस्त्यावर आमची ही शहाणी बाळं कधीच जात नाहीत. यांच्या झोपण्याच्या जागा आणि सवयीसुद्धा गमतीशीर आहेत. अ‍ॅलीसला नुसत्या फरशीवर झोपायला आवडतं. किवीचा बेड म्हणजे माझी बिन बॅग. झोपायच्या वेळी मॅडम त्यावर टुण्णकन उडी मारून बसणार. मग ती बिन बॅग आपल्या आकाराची करून मस्त ताणून देणार. तर जेरी मात्र आपल्यासारखाच पद्धतशीर उशी वगैरे घेऊन झोपतो. तो खरंच असं करतो. तो उशी आणणार ती ठेवणार आणि त्यावर डोकं टेकून झोपणार. पूर्वी माझ्याकडे एक सॉफ्ट टॉय होतं. ते जेरीला इतकं आवडायचं की तो दिवसभर त्याच्याशी खेळायचा. रात्रीसुद्धा त्या खेळण्याला कुशीत घेऊन नाहीतर त्यावर डोकं ठेवून झोपायचा.

हे तीन कुत्रे म्हणजे आमच्या घराचे अतिशय महत्त्वाचे तीन सदस्य आहेत. प्रत्येकाचं घराशी एक छान वेगळं नातं आहे. यांच्याशिवाय घर घरच वाटत नाही. घराच्या वेगवेगळ्या कोपऱ्यात जर हे तिघे नसतील, तर खरंच चुकल्यासारखं होतं. रोज संध्याकाळी घरी आल्यावर यांच्यासोबत घालवलेली ५ मिनिटं दिवसभराचा सगळा थकवा घालवतात. दिवसभरात आपल्याकडे आलेली सगळी नकारात्मकता हे तीन मुके जीव, त्यांच्या प्रेमाने दूर पळवतात. खरंच हे त्रिकूट म्हणजे आमच्या घराचा प्राण आहे.

(अभिनेत्री- खुलता कळी खुलेना)

शब्दांकन- स्वाती केतकर-पंडित

मयूरी देशमुख