अ‍ॅड. श्रीनिवास घैसास

मी टागोर आदर्शनगर गृहनिर्माणसंस्थेचा सदस्य आहे. संलग्नित सूचनेनुसार दिनांक १६/६/२०१८ च्यानुसार, प्रत्येक सभासदाने सभेला उपस्थित राहणे आवश्यक आहे. अन्यथा सभासदात भाग न घेतल्यास सदस्याला १०००/- रुपयांचा दंड आकारला जाईल. गृहनिर्माणसोसायटी असा नियम करू शकते का? काही अपरिहार्य कारणांमुळे उपस्थित राहणे नेहमी शक्य नसते. अशा नियमांवर उपाय काय आहे?         

BJP experiment, south Mumbai,
मते वाढविण्याचा भाजपचा प्रयोग
Loksatta kutuhal Endowment of Suryaji Pisala Artificial intelligence
कुतूहल: सूर्याजी पिसाळांचा बंदोबस्त
When can my baby drink cow’s milk
सहा महिने की बारा महिने, बाळाला गायीचे दूध केव्हा देऊ शकता? WHO चे नवे मार्गदर्शक तत्व काय सांगतात? जाणून घ्या
Wardha Lok Sabha, Amar Kale,
वर्धा : “कुणी घर देता कां घर…”, अमर काळे यांची शोधाशोध; कार्यालयासाठी…

– माधव घैसास

एखाद्या सभासदाला संस्थेच्या सभेला उपस्थित राहता आले नाही तर त्यासाठी संस्था दंड आकारू शकत नाही. जो सदस्य नियमाप्रमाणे सतत पाच वर्षांच्या कालावधीत किमान एकाही सभेला उपस्थित राहिला नसेल तर तो सदस्य आपोआप अक्रियाशील सदस्य म्हणून गणला जाईल. अशा अक्रियाशील सभासदाला कार्यकारी मंडळासाठी उमेदवारी अर्ज दाखल करता येत नाही. कारण ती त्याची अपात्रता ठरते. मात्र गैरहजेरीसाठी दंड आकारणे योग्य वाटत नाही. म्हणूनच आपण याविरुद्ध दाद मागावी, असे आम्हाला वाटते.

* फ्लॅटचे नॉमिनेशन ज्याच्या नावे करावयाचे त्या व्यक्तीची नॉमिनेशन फॉर्मवर सहीची आवश्यकता असते का?

– सुनीला मराठे, अंधेरी

*  नाही. फ्लॅटचे नॉमिनेशन ज्याच्या नावे करावयाचे त्या व्यक्तीची नॉमिनेशन फॉर्मवर सहीची आवश्यकता नसते. नॉमिनेशन फॉर्म हा सदस्यानेच भरून द्यायचा असतो.

* मृत्युपत्र केल्यानंतर त्यातील एक साक्षीदार सध्या हयात नसेल (मृत्यू पावलेला) तर ते मृत्युपत्र अवैध ठरते का?           

नाही. मृत्युपत्रावर साक्षीदार म्हणून सही केलेली व्यक्ती हयात नसली तरीही मृत्युपत्र अवैध ठरत नाही. मृत्युपत्रावर साक्षीदार म्हणून सही करणाऱ्याला इंग्रजीमध्ये ‘६्र३ल्ली२२’ असे म्हणतात. त्याला शुअरटी म्हणत नाही. आपण पत्रात असा उल्लेख केला आहे म्हणून हा खुलासा केला आहे.

* आमचा फ्लॅट दोघांच्या नावावर आहे. पहिले नाव पतीचे आहे. पतींनी त्यांच्यानंतर त्यांच्या अर्ध्या शेअरचे नॉमिनेशन माझ्या नावे केलेले आहे, तसेच शेअर सर्टिफिकेटवर पहिले नाव पतीचे आहे. अशा परिस्थितीत फ्लॅट माझ्या नावे होण्यासाठी कोणती कागदपत्रे सोसायटीला द्यावी लागतील. त्यासाठी मृत्युपत्राची आवश्यकता असेल का?

– सुनीला मराठे, अंधेरी 

*  आपल्याला जर आपल्या दोघांच्या नावावर असलेली सदनिका आपल्या एकटीच्या नावे आपले पती हयात असताना करून घ्यायची असेल तर सदर सदनिकेच्या अर्ध्या भागाचे खरेदीखत अथवा बक्षीसपत्र करून घेऊन ते नोंद करून घ्यावे लागेल. तरच सदर सदनिका आपल्या नावे होऊ शकेल. नॉमिनेशन केल्यामुळे आपल्या पतीच्या पश्चात सदर सदनिकेच्या अर्ध्या भागाला आपले नाव लागू शकेल. परंतु त्यासाठी त्यांच्या अन्य वारसांची म्हणजेच आपल्या मुलाबाळांची देखील संमती / हक्कसोडपत्र आपणाला करून घ्यावे लागेल. त्यांच्या वारसात जर काही वाद उद्भवला तर आपणाला वारस दाखला आणावा लागेल. आपल्या पतींना त्यांच्या हयातीत आपले नाव लागण्यासाठी मृत्युपत्र करण्याची आवश्यकता नाही. आपल्या मिस्टरांनी योग्य पद्धतीने मृत्युपत्र केले आणि त्याला कुणीही हरकत घेतली नाही तर त्यांच्या पश्चात सदर सदनिका पूर्णपणे आपल्या नावावर होईल. मात्र मृत्युपत्राला देखील कुणी हरकत घेतली तर आपणाला न्यायालयाकडून हुकूमनामा (प्रोबेट) घ्यावा लागेल.

* आम्हा दोघांच्या मृत्यूनंतर आमच्या दोन मुलांच्या नावे नॉमिनेशन केले असेल तर त्यांना सोसायटीला वारस म्हणून कोणती कागपत्रे द्यावी लागतील. तसेच फ्लॅट त्यांच्या नावे होण्यासाठी मृत्युपत्राची आवश्यकता असेल का?

– सुनीला मराठे, अंधेरी

आपण आपल्या दोन्ही मुलांना जर सदर सदनिकेसाठी नॉमिनी म्हणून नेमले असेल तर आपल्या पश्चात नामांकनाच्या जोरावर उपविधीमध्ये नमूद करण्यात आलेले अर्ज आणि हमीपत्र इत्यादी तांत्रिक बाबींची पूर्तता केल्यास त्यांना वारस असल्याचे कोणतीही कागदपत्रे देण्याची आवश्यकता नाही. मात्र सदर सदनिकेचा मालकीहक्क त्यांना शाबित करायचा असेल तेव्हा आमच्या आई-वडिलांना आमच्याव्यतिरिक्त कुणीही वारस नाही याची सोसायटीला खात्री पटवून द्यावी लागेल अथवा ते शक्य न झाल्यास आपणाला वारस प्रमाणपत्र बनवावे लागेल. आपण दोघांनीही सर्व कायदेशीर तरतुदींचे पालन करून जर मृत्युपत्र बनवले तर ते केव्हाही चांगलेच ठरेल. मात्र मृत्युपत्राची अंमलबजावणी ही मृत्युपत्र बनवणाऱ्या व्यक्तीच्या पश्चातच होते हे आपण लक्षात ठेवणे गरजेचे आहे.

* आमच्या सोसायटीतील एक सभासद मरण पावल्यावर त्यांच्या एका दुरस्थ भाच्याने सभासदाचे मृत्युपत्र आणि सभासदाच्या पत्नीचे आणि मुलाचे प्रतिज्ञापत्र कोर्टातर्फे प्रोबेट करून सोसायटीला सादर केले आणि अर्ज केला की सदनिका माझ्या नावावर करण्यात यावी. सदनिका भाच्याच्या नावावर करण्यात यावी याला मरण पावलेल्या सभासदाची पत्नी, त्याचा मुलगा यांचीही संमती आहे. सर्व कागदपत्रे तपासून आणि खात्री करून सोसायटी सदनिका भाच्याच्या नावावर करण्यास तयार आहे आणि तसे भाच्याला कळविण्यात आले आहे. सदनिका हस्तांतरित करण्यासाठी सोसायटीने नियमाप्रमाणे भाच्याकडे हस्तांतरित शुल्क (transfer fee)ची मागणी केली आहे. हस्तांतरित शुल्क भरण्यास भाच्याने स्पष्ट नकार दिला आहे. त्याचे म्हणणे असे की सदनिका मी विकत घेतलेली नाही, ती मला मृत्युपत्राद्वारे वारसाहक्काने मिळाली आहे. त्यामुळे वारसदार म्हणून मी नियमाप्रमाणे जे काही शुल्क असेल तेच द्यायला तयार आहे. मला हस्तांतर शुल्क लावू नये. मी नियमाप्रमाणे हस्तांतर शुल्क भरणार नाही. कारण मृत्युपत्राद्वारे सोसायटी भाच्याला वारसदार मानायला तयार नाही. परंतु त्याच्या नावावर  सदनिका करून द्यायला तयार आहे. त्यासाठी भाच्यास हस्तांतर शुल्क भरणे गरजेचे आहे. आणि भाचा त्याला तयार नाही. आपण यावर योग्य मार्गदर्शन करावे.

– ज्ञानेश्वर बागुल

* आमच्या मते, आपण प्रश्नांत दिलेली सर्व माहिती खरी असेल तर आपणाला हस्तांतरण शुल्क लागू होणार नाही. याचे कारण, या ठिकाणी कोणताही खरेदी-विक्री व्यवहार झालेला नाही आणि न्यायालयाने हुकूमनामा देऊन (प्रोबेट) वारसाहक्क निश्चित केला आहे, त्यामुळे हे हस्तांतरण वारसाहक्काने झालेले हस्तांतरण आहे. एकदा संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना ही वस्तुस्थिती समजावून सांगण्याचा प्रयत्न करावा, तरीही संस्थेने न ऐकल्यास आपण उपनिबंधकाकडे दाद मागावी.

ghaisas2009@gmail.com