शहराच्या मध्यवर्ती ठिकणी रिअल इस्टेटच्या किमती गगनाला भिडत असल्याने आणि महानगरातील भागांतील गर्दी वाढते असल्याने, प्रमुख महानगरांच्या परिघावरील उदयोन्मुख ठिकाणांची, प्रामुख्याने पहिल्या घराची खरेदी करण्यास वा त्यामध्ये गुंतवणूक करण्यास उत्सुक असलेल्यांमध्ये- लोकप्रियता वाढत आहे. ही ठिकाणे काही वेळा पायाभूत सुविधा आणि शहरातील उद्योग केंद्रापासूनचे अंतर या बाबतीत आव्हानात्मक समजली जात असली तरी या ठिकाणांमध्ये असलेले सुप्त फायदे आणि वाढीची क्षमता पाहत फारसे प्रभावी ठरत नाहीत. मोकळ्या जागेतील नियोजित विकास, स्वस्त दरातील मोठी घरे आणि अल्प काळामध्ये भांडवलवृद्धीसाठी प्रचंड क्षमता यामुळे ही ठिकाणे ग्राहकांसाठी आकर्षक ठरत आहेत. उदा., दहा वर्षांपूर्वी दूरदृष्टी ठेवलेले आणि गोरेगाव येथे गुंतवणूक केलेल्या लोकांना आता त्या परिसरात मालमत्तांच्या दरातील तिप्पट वाढीचा लाभ मिळत आहे. शेअर बाजाराप्रमाणे, रिअल इस्टेटमध्ये योग्य वेळी, किमती कमी असताना व क्षमता उच्च असताना, गुंतवणूक करणे, अत्यंत महत्त्वाचे आहे. दरवाढीचे जास्तीत जास्त लाभ मिळवण्यासाठी, ठिकाणाच्या मूलभूत घटकांचे काळजीपूर्वक मूल्यमापन करायला हवे आणि रिअल इस्टेटची खरेदी वेळेत करायला हवी.

महाराष्ट्रामध्ये, औद्योगिक शहर बोईसर हे मुंबईचे एक झपाटय़ाने वाढते उपनगर आहे. पश्चिम रेल्वेवर विरारच्या उत्तरेला वसलेले बोईसर हा नव्याने स्थापन झालेल्या पालघर जिल्ह्याचा भाग आहे. दोन वर्षांपूर्वी नवा जिल्हा म्हणून निर्मिती झाल्यापासून, पालघरच्या मोक्याच्या ठिकाणामुळे या जिल्ह्यचा वेगाने विकास होत आहे. नव्याने स्थापन केलेल्या या  महाराष्ट्रातील काही सर्वात मोठी मासेमारी बंदरेही आहेत, जसे की सातपाटी, डहाणू, अर्नाळा, वसई व दातिवडे. हा जिल्हा मुंबईपासून, तसेच गुजरातमधील अहमदाबाद व सुरत अशा शहरांपासून नजीक आहे. योग्य शहरीकरण झालेल्या या जिल्ह्यत साक्षरतेचे प्रमाण अधिक आहे आणि त्यामुळे दर्जेदार मनुष्यबळ उपलब्ध असल्याने उद्योगांना आकृष्ट करीत आहे. महाराष्ट्राच्या भरभराटीच्या कोकण पट्टय़ाचा भाग म्हणून, या जिल्ह्यने कधीही दुष्काळाचा सामना केला नाही. येथे नागरिकांच्या फायद्यच्या दृष्टीने येथे गुणवत्तापूर्ण पायाभूत सुविधा आहेत.

बोइसरचे मोक्याचे ठिकाण, भारताची आर्थिक राजधानी मुंबई आणि औद्योगिक दक्षिण गुजरात यांच्यामध्ये दुवा साधते. गेल्या काही वर्षांमध्ये, बोईसर आर्थिक उपक्रमांचे केंद्र बनले असून यामुळे मोठय़ा प्रमाणात रोजगारनिर्मिती झाली आहे व त्यामुळे या परिसरातील घरांसाठीची मागणी लक्षणीय वाढली आहे.

यामध्ये राज्यातील सर्वात मोठी एमआयडीसी (महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ) आहेच, शिवाय तारापूर येथे बीएआरसीही (भाभा अ‍ॅटोमिक रिसर्च सेंटर) आहे. एमआयडीसीमध्ये अंदाजे १५०० युनिट असून त्यामध्ये टाटा स्टील, जेएसडब्लू स्टील व रेमेंड अशा जागतिक कंपन्यांचा समावेश आहे.

कनेक्टिव्हिटीच्या बाबतीतही बोईसर सरस आहे. गेल्या काही वर्षांत, चर्चगेट व डहाणू या दरम्यानच्या लोकल ट्रेनच्या सेवेमुळे मुंबईसोबतची कनेक्टिव्हिटी कमालीची सुधारली आहे आणि सध्या काम सुरू असलेल्या चारपदरी रेल्वेमार्गामुळे ही सेवा आणखी सुधारणार आहे. प्रस्तावित डीएमआयसी (दिल्ली-मुंबई इंडस्ट्रिअल कॉरिडॉर) बोईसरमधून जाणार आहे. यामुळे या ठिकाणाचे व्यावसायिक महत्त्व वाढणार आहे. अगोदरच, या शहराच्या भरभराटीचे एक निर्देशक म्हणजे, बिग बजारसारख्या हायपरमार्केटचे अस्तित्व आणि अलीकडेच सुरू झालेले डी-मार्ट. विविध ब्रॅण्डच्या अनेक दुचाकी व चारचाकीच्या शोरूमही बोईसरमध्ये भविष्यात होऊ  घातलेल्या विकासाचे प्रतीक आहेत. विविध संशोधन अहवालांच्या मते, बोईसरमधील मालमत्तांचे दर एमएमआर परिसरातील झपाटय़ाने वाढत्या दरांपैकी एक आहेत.

वास्तविक, या ठिकाणामध्ये मोठी क्षमता असल्याने, गेल्या काही वर्षांत, आघाडीच्या विकासकांचे लक्ष बोईसरमध्ये आकृष्ट झाल्याने येथे विविध प्रकारचे रिअल इस्टेट प्रकल्प उभारण्यात आले आहेत. २०१४ मध्ये, महिंद्रा लाइफस्पेसेसने महाराष्ट्रातील आपल्या पहिल्या, परवडणाऱ्या दरातील गृह प्रकल्पासाठी बोईसर या ठिकाणाची निवड केली. तेव्हापासून, ६०० कुटुंबांनी हॅपिनेस्ट-बोईसर येथे घरे बुक केली आहेत आणि या प्रकल्पाने तिसरी फेज दाखल केल्याची घोषणा केली आहे.

पालघर-बोईसर-डहाणू परिसरात कार्यरत असलेल्या व्यक्तींसाठी बोईसर हे राहण्यासाठी आदर्श ठिकाण आहे. कनेक्टिव्हिटी सुधारत असल्याने, बोईसर येथून मालाड/गोरेगाव/बोरिवली आणि अंधेरी (नवे सेंट्रल बिझनेस डिस्ट्रिक्ट) येथे प्रवास करणे सोयीचे होत आहे. या सर्व घटकांमुळे, परवडणाऱ्या दरामध्ये दर्जेदार घरामध्ये गुंतवणूक करण्याची इच्छा असलेल्यांसाठी हे शहर आदर्श ठरत आहे.

थोडक्यात सांगायचे तर, आपल्या शहरांतले झळझळणारे दिवे आपले लक्ष वेधून घेत राहतील कदाचित, पण निरोगी व संतुलित जीवन, स्वच्छ हवा, रुंद मोकळ्या जागा आणि अधिक शांततापूर्ण जीवन यांकडेही दुर्लक्ष करून चालणार नाही. शहराच्या कक्षांलगत विकसित होत असलेल्या ठिकाणांचे महत्त्व वाढत आहे आणि पुढेही ते वाढत जाणार आहे.  श्रीराम महादेवन, लेखक हॅपिनेस महिंद्रा लाइफ