काही वर्षांपूर्वी घरामध्ये एक टीव्ही, एक फोन पुरेसा असायचा; परंतु अलीकडे मात्र घरात सर्वाकडे मोबाइल असतात. टीव्ही संचदेखील कमीत कमी दोन किंवा खोल्यांच्या संख्येनुसार वाढत आहेत. परिणामी, या हरतऱ्हेच्या इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांमधून उत्सर्जति होणारी किरणे घराच्या आतील हवा प्रदूषित करायला कारणीभूत ठरतात. हळूहळू पसरत जाणारे हे इलेक्ट्रॉनिक्स प्रदूषण मानवी आरोग्यावरदेखील घातक परिणाम करूलागले आहे.

सध्याच्या काळात वायुप्रदूषणाची समस्या आपणा सर्वाना अधिक तीव्रतेने भेडसावत आहे. अर्थात, हे वायुप्रदूषण फक्त घराबाहेरच नाही तर घराच्या आतदेखील तितक्याच तीव्रतेने जाणवत आहे. आता तुमच्या मनात शंका येईल की, घराच्या आत कसे काय बरे ई-प्रदूषण होईल? तर आपण दैनंदिन जीवनात तऱ्हेतऱ्हेच्या इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांचा वापर करीत असतो. जसे- मोबाइल, लॅपटॉप, संगणक, लेसर टीव्ही आदी. पूर्वी या उपकरणांची संख्या घरापुरती मर्यादित होती. पण सध्या हेच प्रमाण घरातील माणसांच्या संख्येनुसार वाढत आहे.

न्यायालयीन प्रक्रियेच्या दुरुपयोगासाठी जनहित याचिका नको; याचिकाकर्त्यांना ५० हजार रुपयांचा दंड
heatwave heat, people of mumbai, summer season, Citizens, vomiting, dizziness, diarrhea
उष्णतेमुळे मुंबईकरांचे आरोग्य बिघडले; नागरिक उलटी, चक्कर व अतिसाराने हैराण
forever particles marathi news, forever particles latest marathi news
विश्लेषण : जगभर पिण्याच्या पाण्यात आढळतात घातक `फॉरएव्हर पार्टिकल्सʼ… त्यांचे उच्चाटन अवघड का असते?
Saving
बचत फक्त मोठ्यांनी नाही, लहानांनीही करावी! मुलांना अर्थसाक्षर बनवण्यासाठी ‘या’ गोष्टी ठरतील फायदेशीर

काही वर्षांपूर्वी घरामध्ये एक टीव्ही, एक फोन पुरेसा असायचा; परंतु अलीकडे मात्र घरात सर्वाकडे मोबाइल असतात. टीव्ही संचदेखील कमीत कमी दोन किंवा खोल्यांच्या संख्येनुसार वाढत आहेत. परिणामी, या हरतऱ्हेच्या इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांमधून उत्सर्जति होणारी किरणे घराच्या आतील हवा प्रदूषित करायला कारणीभूत ठरतात. हळूहळू पसरत जाणारे हे इलेक्ट्रॉनिक्स प्रदूषण मानवी आरोग्यावरदेखील घातक परिणाम करूलागले आहे.

अलीकडेच, या संदर्भात बीबीसी (ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन) मार्फत एक अहवाल जाहीर करण्यात आला. या अहवालानुसार ई-प्रदूषण हे मानवी आरोग्यासाठी गंभीर समस्या ठरू लागले आहे. इतकेच नाही तर पर्यावरणावरदेखील याचा परिणाम होऊ लागला आहे. या अहवालातील पाहणीनुसार, विकसनशील देशांमधील सुमारे २३ टक्केमृत्यू हे ई-प्रदूषणाशी संबंधित होते, तर जगभरातील दोनशे दशलक्षांपेक्षा अधिक लोकांना विषारी ई-कचऱ्याचा धोका जाणवू लागला आहे. तेव्हा प्रदूषणाच्या या संभाव्य धोक्याकडे अधिक जागरूकतेने बघण्याची गरज निर्माण झाली आहे.

आपण जी काही इलेक्ट्रॉनिक उपकरणे वापरतो, मग तो टीव्ही असो वा रेडिओ अथवा वायफाय, यामधून अनेक प्रकारच्या लहरी बाहेर पडून सभोवतालच्या हवेत मिसळत असतात. आणि हीच हवा श्वासामार्फत आपल्या शरीरात जात असते. त्याचबरोबर कित्येकदा या ई-उपकरणांना नष्ट करण्यासाठी विशिष्ठ स्वरूपाची प्रक्रिया केली जाते. त्या वेळी घातक स्वरूपाचे घटक बाहेर पडून हवेत मिसळले जातात. जेव्हा ही प्रदूषित हवा आपल्या शरीरात जाते. ती हवा आपली त्वचा, पोट, श्वसनमार्ग व इतर अवयवासंबंधी विकारांना आमंत्रण देत असते. यात प्रतिकारशक्तीचा कमकुवतपणा, रक्ताचे विकार, मूत्रिपड, फुप्फुसे आदींशी संबंधित विकार या स्वरूपाच्या तऱ्हेतऱ्हेच्या व्याधींचा समावेश असल्याचे या पाहणीत आढळून आले ंआहे.

त्यामुळेच थोडेसे जागरूक राहून आपण योग्य ती खबरदारी घेतली तर ई-प्रदूषणापासून होणाऱ्या धोक्याची पातळी वेळीच आटोक्यात ठेवणे शक्य होईल.

आपल्याकडे अधिकाधिक इलेक्ट्रॉनिक्स उत्पादने आहेत, म्हणजे आपण अधिक आधुनिक झालो अशी आपली मानसिकता होत चालली आहे. परंतु  ई-कचऱ्याचा आपल्यावर होणारा दुष्परिणाम याचाही विचार करणे गरजेचे आहे.

हे लक्षात घ्या

* तुमच्या घरातील टीव्हीसारख्या इलेक्ट्रॉनिक साधनांची संख्या कमी करा. खरोखरीच घरात तीन-तीन टीव्हींची गरज आहे का, याचा विचार करा. तुम्ही एका वेळी किती टीव्ही पाहू शकता? याचा डोळसपणे विचार करा.

*  ई-कचरा तसाच फेकून देण्यापेक्षा तो रिसायकिलग करणाऱ्या व्यक्तीं किंवा कंपन्यांकडे द्यावा. अनेक शहरांमध्ये अशा प्रकारची कामे करणारे गट कार्यरत आहेत. याचा एक फायदा असा होईल की, हा कचरा नुसताच जमिनीवर पडून राहणार नाही. कित्येकदा असे होते की, असा कचरा जमिनीवर साचून राहिल्यामुळे त्यातील जड धातू सभोवतालच्या अथवा पावसाच्या पाण्यात मिसळतात व ते पाणी प्रदूषित करतात.

*  तुमचा सेलफोन आणि वायफाय रात्रीच्या वेळी बंद ठेवा. कारण त्यामधून बाहेर पडणाऱ्या रेडिएशनचा आपल्या मेंदूवर परिणाम होण्याची शक्यता अधिक असते. आणि आपण झोपेत असताना हे रेडिएशन अधिक तीव्रतेने परिणाम करण्याची शक्यता असते.

*  घरासाठी इलेक्ट्रॉनिक स्वरूपाची उत्पादने खरेदी करताना ती तुमच्या घरातील हवेच्या दर्जावर परिणाम करणार नाहीत ना, याची खात्री करून मगच त्यांची खरेदी करावी.

*  एक चांगला एअरप्युरिफायर घरातील वायूचे प्रदूषक काढून टाकण्यात अत्यंत परिणामकारक ठरतो. अशा एअरप्युरिफायरची निवड करा- ज्यात उच्च कार्यक्षमतेचा पार्टिक्युलेट एअर फिल्टरेशन(एचईपीए) फिल्टर आहे. जो हवेतील सूक्ष्म प्रदूषित घटक पकडून हवेचा दर्जा सुधारण्यास मदत करेल.

डॉ. अभय कुमार
शब्दांकन- सुचित्रा प्रभुणे