अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि पुणे महानगरच्यावतीने पुण्यात ‘सीएए’ समर्थनार्थ ‘भारत सुरक्षा यात्रे’चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ३०० फूट लांबीचा राष्ट्रध्वज घेऊन विद्यार्थी या यात्रेत सहभागी झाले होते. गणेशखिंड येथील मॉडर्न कॉलेज ते शिवाजीनगर येथील मॉडर्न कॉलेज या मार्गावर ही यात्रा काढण्यात आली होती.