कोल्हापुरातील छत्रपती घराण्याच्या श्री तुळजाभवानी मंदिरात रविवारी सायंकाळी शाही दसरा पार पडला. श्रीमंत शाहू महाराज यांच्या हस्ते विधिवत पूजा आणि आरती करण्यात आली. त्यानंतर त्यांच्या हस्ते शमीचे पूजन केल्यानंतर प्रातिनिधीक स्वरूपात सोने वाटपाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी खासदार संभाजीराजे, युवराज मालोजीराजे यांच्यासह निवडक लोकांची उपस्थिती होती.