आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बाजूने लागला. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह भाजपा नेत्यांनी शिंदेंचं अभिनंदन केलं. मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रतिक्रिया आली नव्हती. काल (११ जानेवारी) पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत अजित पवारांना या संदर्भात प्रश्न विचारण्यात आला. त्यावर अजित पवार पत्रकारांवरच चिडले आणि आपल्याला फुकटचे सल्ले देऊ नका, अशा शब्दांत त्यांनी ठणकावलं.