उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवार यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. ज्यामध्ये त्यांनी अजित पवार यांनी घेतलेल्या राजकीय भूमिकेवर परखड शब्दांत भाष्य केलं. त्यांच्या या व्हिडीओनंतर राजकीय वर्तुळातून अनेक संमिश्र प्रतिक्रियाही आल्या. यावर आता स्वतः युगेंद्र पवार यांनी स्पष्टीकरण देत वडील श्रीनिवास पवार यांची बाजू सावरली आहे. बापूंच्या विधानाचा वेगळा अर्थ काढला गेला, अजित पवार यांना बापू कधीच असं बोलणार नाहीत, असं युगेंद्र पवार पवार म्हणाले.