अनेक कारणांमुळे लक्षवेधी ठरलेल्या महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांच्या प्रचाराची सोमवारी संध्याकाळी सांगता झाली. निवडणुकीचा कार्यक्रम घोषित होण्यापासून प्रत्यक्ष मतदान यातील कालावधी कमी करण्यात आल्यामुळे सर्वच राजकीय पक्षांना प्रचारासाठी अवघे १३ दिवस मिळाले होते. त्यामुळे जास्तीत जास्त मतदारसंघांतील जनतेपर्यंत पोहचण्यासाठी सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांनी जिवाचे रान केले. संपूर्ण महाराष्ट्रात राजकीय शिलेदारांनी एकूण ७१५ प्रचारसभा घेतल्या. त्यापैकी ४९९ प्रचारसभा या एकट्या मुंबईतच घेण्यात आल्या. याशिवाय मुंबईत १०,९५७ राजकीय कार्यक्रम, १४२९ चौक सभा, ८००० प्रचारफेऱ्या आणि ९८७ पथनाट्यांच्या माध्यमातून विधानसभा निवडणुकांचा प्रचार केला गेला. प्रत्येक राजकीय पक्षाच्या स्टार प्रचारकांनीही प्रचारसभांसाठी कंबर कसली होती. भाजपचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सर्वात जास्त म्हणजे १०४ प्रचारसभा घेतल्या.
राजकीय नेत्यांनी घेतलेल्या प्रचारसभांची पक्षनिहाय माहिती पुढीलप्रमाणे:

भाजप
नरेंद्र मोदी – २७
अमित शहा- १७
नितीन गडकरी- १०४
देवेंद्र फडणवीस- ४०
एकनाथ खडसे- ३४
विनोद तावडे- ६८
पंकजा मुंडे- ३५

काँग्रेस
पृथ्वीराज चव्हाण- ४०
सोनिया गांधी- ४
राहुल गांधी- ६
माणिकराव ठाकरे- ७०

राष्ट्रवादी काँग्रेस</strong>
शरद पवार- ५५
अजित पवार- ८०
सुनिल तटकरे- ४०
छगन भुजबळ- ४०
सुप्रिया सुळे- ४०

शिवसेना
उद्धव ठाकरे -५०
आदित्य ठाकरे- ३५

आरपीआय
रामदास आठवले- ४२