खावे नेटके
gudi padva 2019 gudi of diet | आहाराची चैत्रगुढी – response.lokprabha@expressindia.com
सण, ऋतू आणि आहार यांची सांगड आपल्याकडे घातलेली आहे. पण तो केवळ एका दिवसापुरता उपचार न ठरता त्यातील मर्म समजून आहारात त्याचा वापर केल्यास नक्कीच फायदा होऊ शकतो.

नवे वर्ष सुरू होताना नवे संकल्प केले जातात. गुढीपाडवा म्हणजे हिंदू नववर्षांचा पहिला दिवस. चैत्र महिन्याचा पहिला दिवस. आपल्या सणांमध्येदेखील आहार आणि ऋतू यांचे महत्त्व खूप आहे. चत्र महिन्याच्या सुरुवातीपासून बाजारात निवडक फळे आणि भाज्या यांचे प्रमाण अधिक असते. आजच्या लेखात या चत्रपालवीचा विचार करू या आणि सण आणि उत्सवामध्ये देखील आहाराचा समावेश विचारपूर्वक कसा करावा हेदेखील जाणून घेऊ या. सणांमध्ये असणारे आहार आणि ऋतूंचा समन्वय हा बहुतांश वेळा केवळ त्या दिवसापुरताच निगडित असल्यासारखे आपल्याकडे त्याकडे पाहिले जाते. पण त्या त्या सणाच्या अनुषंगाने वापरल्या गेलेल्या या गोष्टी त्या संपूर्ण ऋतूशी जोडलेल्या असतात. त्यांचा वापर त्या ऋतूमध्ये अन्य वेळी होणेदेखील तितकेच गरजेचे आहे.

meteor showers, sky, meteor,
उद्यापासून आकाशात उल्कावर्षावाचा विविधरंगी नजारा, सुमारे १२ हजार वर्षांनी…
ladu prasad
Ram Navami 2024 : १,११,१११ किलोचे लाडू अयोध्येला पाठवणार, राम नवमीसाठी देशभर भाविकांमध्ये उत्साह!
Welcome New Year with Padwa Yatra in Akola
अकोला : पाडवा यात्रेतून नववर्षाचे चैतन्यमय स्वागत; मतदानाबाबत जनजागृती, पारंपरिक वेशभूषेत तरूणाई
Loksatta vasturang On the occasion of Gudi Padwa home purchase investment
गुढीपाडवा आणि गृहखरेदी

कडुनिंब

गुढीपाडव्याच्या दिवशी कडुिनबाची पाने किंवा त्याची चटणी किंवा कडुिनब आणि गूळ एकत्र करून खाण्याची प्रथा आहे. कडुिनब हे रक्तशुद्धी करणाचे काम करते. भारतीय वैद्यकशास्त्रामध्ये आणि आयुर्वेदामध्ये कडुिनब हे अनेक औषधी वनस्पतींपकी एक मानले जाते. १२ ही महिने सातत्याने उपलब्ध असणाऱ्या कडुिनबाच्या वृक्षाचा प्रत्येक भाग आरोग्यासाठी उत्तम आहे. कडुनिंबाची पाने खाल्ल्याने रोगप्रतिकार शक्ती वाढते. हल्ली आपण या काळात उन्हाळ्याची काहिली कमी करण्यासाठी शीतपेयं, आइसक्रीम यांचा वापर करतो. त्यामुळे सर्दीपडसे, खोकला किंवा इतर आजार होण्याची शक्यता असते. अशा वेळी कडुिनबाची पाने खाल्ल्याने रोगप्रतिकार शक्ती वाढते.

कडुिनबामध्ये १०० हून जास्त विकारांचे निवारण करण्याचे गुणधर्म आहेत. कडुिनबाचे उकळलेले पाणी सेवन केल्यास त्वचेचे विकार कमी होतात. ज्यांना चेहऱ्यावर मुरुमे किंवा त्यांचे डाग आहेत त्यांनी कडुिनबाचे सेवन नियमितपणे करावे. मधुमेह असणाऱ्यांनी कडुिनबाची पाने किंवा त्याच्या पानांचा रस प्याल्यास शरीरातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहण्यास मदत होते.

खेळाडू आणि नियमित व्यायाम करणाऱ्यांनी कडुिनबाची चटणी किमान आठवडय़ातून दोन वेळा घ्यावी. पूर्वी कडुिनबाच्या फांदीने दात स्वच्छ केले जायचे. अलीकडे कडुिनबाचा अंश आपल्या दंतमंजन आणि टूथपेस्टमध्ये आलाय हा भाग वेगळा. परंतु मुद्दा असा आहे की, दातांचे आरोग्य राखण्यासदेखील कडुिनब गुणकारी आहे. कडुिनबाचे पाणी प्याल्याने शरीरातील तापमानदेखील उत्तम राखले जाते. मार्च-एप्रिल महिन्यात घाम जास्त प्रमाणात येतो, त्यामुळे शरीरातील आद्र्रता कमी होते. त्यामुळे या महिन्यात भरपूर पाण्याचे सेवन करावे. आणि उन्हासोबतच या महिन्यांमध्ये वातावरणातील धुळीचे प्रमाण वाढते. सध्या वातावरण प्रदूषित आहेच, मग सोबत आरोग्याचे भान राखणेदेखील महत्त्वाचे ठरते. अनेकदा उन्हाळ्यात पोटाचे विकार किंवा घशाचे विकार बळावतात. अशा वेळी कडुिनब खाल्ल्यास हे विकार दूर राहू शकतात.

कडुिनबाचे तेल केसांना लावल्याने केस वाढतातच आणि त्यांना छान तलमपणादेखील येतो. आणि केसांचे पांढरे होणे कमी होते. गरोदर स्त्रियांनी कडुिनबाच्या रसाचे सेवन केल्यास शरीरातील लोह आणि इतर धातूंचे प्रमाण नियंत्रित राहते आणि यादरम्यान होणारे विकार टाळण्यास मदत होते.

श्रीफळ अर्थात नारळ

आपण गुढी उभारताना नेहमी श्रीफळ मांडतो. नारळ आरोग्यासाठी उत्तम आहेच आणि तो विविध पद्धतीने आहारात समावेश केल्यास त्याचे फायदेदेखील अनेक आहेत. अलीकडे आपण खोबरे किंवा नारळाचे दूध यांचे महत्त्व वारंवार वाचत असतो. विगन आहारशैलीमध्ये दुधाऐवजी नारळाचे दूध वापरण्याचा सल्ला दिला जातो. नारळाचे दूध शरीराला शीतलता देते आणि पचनक्रिया सोपी करते. उन्हाळ्यात नारळपाणी प्यायल्याने शरीरातील आद्र्रता टिकून राहते. ज्यांना अतिउच्च रक्तदाब आहे त्यांच्यासाठी नारळपाणी पिणे हितावह आहे. खोबऱ्यात असणारे उपयुक्त स्निग्ध पदार्थाचे अंश शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करतात तसेच शरीराला योग्य ऊर्जा पुरवतात. तसेच हृदयविकार होण्यापासून प्रतिबंध होतो. नारळाच्या तेलाच्या गुळण्या केल्यास दातांचे आरोग्यदेखील उत्तम राहते.

आंब्याची पाने

फळांच्या या राजाचे स्वागत सगळेच जण जल्लोषात करतात; परंतु आंब्याची पानेदेखील आहारात गुणकारी आहेत. ज्यांना मधुमेह आहे त्यांनी आंब्याची पाने वाळवून त्याची पावडर करून खाणे साखर नियंत्रणात आणण्यास मदत करते. उच्च रक्तदाब, व्हेरिकोज व्हेन्स असणाऱ्यांना आंब्याच्या पानांचा रस खाल्ल्यामुळे फायदा होतो. या पानांमध्ये असणाऱ्या जीवनसत्त्वांमुळे डोळ्यांचे विकार कमी होतात. मलावरोध असणाऱ्यांना आंब्याची पाने रात्रभर भिजवून सकाळी त्याचे पाणी पिणे फायदेशीर ठरते. आंब्याच्या पानांचा रस मधासोबत घेतल्यास घशाचे विकार दूर होऊ शकतात. अस्थमा असणाऱ्यांना आंब्याच्या पानांचे सेवन लाभदायक आहे.

बत्तासा

आता तुम्हाला वाटेल बत्ताशांचं काय? परंतु उन्हाळ्यात बत्ताशांच्या रूपातील साखरेचा अंश पोटात गेल्यास शरीरातील जीवनसत्त्वे आणि खनिजे योग्य प्रमाणात शोषून घेण्यास मदतच होते; परंतु हा नियम सरसकट सगळ्यांनाच लागू होत नाही. त्यामुळे मधुमेह किंवा अतिरिक्त साखरेचा त्रास होणाऱ्यांनी बत्तासे खाण्याचा मोह टाळावा.

हे झाले गुढीमध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या आहारविषयक पदार्थाबद्दल! परंतु गुढीपाडवा ज्या महिन्यात साजरा केला जातो त्या महिन्याचेदेखील आहाराच्या दृष्टीने महत्त्व आहेच. चत्र महिन्यात बाजारात काही फळांची रेलचेल हमखास दिसून येते. डािळब, द्राक्षे, पेरू, लाल किंवा पांढरे काजूचे फळ, करवंदे, बोरे, कैऱ्या अनेक ठिकाणी दिसू लागतात. या फळांमध्ये आद्र्रता जास्त असते. ही फळे खाल्ल्यास अतिरिक्त भुकेवर संयम राहतो.

उन्हाळ्यात भूक मंदावते परंतु तहान खूप लागते, अशा वेळी आहारात ताजे पदार्थ खावेत; परंतु हलके जेवण करावे. जेवणाव्यतिरिक्त दिवसा प्यायल्या जाणाऱ्या द्रवांमध्ये ताक, सोलकढी, िलबूपाणी, नारळपाणी, कैरीचे पन्हे, कोकम सरबत यांचा समावेश करावा.

हलका आहार म्हणजे नेमके काय करायचे?

  • जेवणात मसालेदार पदार्थाचा वापर कटाक्षाने टाळावा.
  • ज्वारी, तांदूळ या धान्यांचा समावेश करावा.
  • खूप मिरची किंवा तिखटाचा समावेश करू नये.
  • दही, तूप यांचा आहारात समावेश करावा.
  • भाज्यांमध्ये पांढरा कांदा, दुधी भोपळा, दोडका, कोिथबीर यांचा समावेश जास्त प्रमाणात करावा.
  • पाणी पिताना घरी जिरे किंवा धने किंवा सब्जा घालून ते पाणी वापरावे.
  • चहा किंवा कॉफी वारंवार पिणे टाळावे.

आपला आहार कसा असावा?

  • ऋतुमानावर खाणे : ज्या ऋतूमध्ये ज्या भाज्या, फळे, धान्ये उपलब्ध असतील त्यांचे सेवन करणे.
  • आपापल्या खाद्यसंस्कृतीनुसार खाणे : गुढीपाडव्याच्याच दिवशी उगादी हा सण कर्नाटकात साजरा केला जातो. तेथे प्रसाद म्हणून तयार केल्या जाणाऱ्या पदार्थात खोबरे, गाजर, कोिशबीर, दही, फळभाज्या, तांदूळ यांचा मुख्यत्वे समावेश केला जातो.
  • आनुवांशिक पद्धतीने खाणे : म्हणजेच पारंपरिक पद्धतीने आहार करणे. पिढय़ान्पिढय़ा आहारात असलेले अनेक पदार्थ आपण अचानक थांबवतो. अन्नामुळे होणारे अनेक विकार हे या अचानक बदललेल्या चुकीच्या आहार पद्धतींमुळे होतात.
  • स्थानिक पदार्थ खाणे : स्थानिक पातळीवर तयार होणारे पदार्थ शक्यतो खावेत. ताज्या पदार्थाचा आहारात समावेश करावा. पॅकबंद, डबाबंद पदार्थ टाळावेत. स्थानिक पातळीवरील पदार्थामुळे जास्तीतजास्त पोषणमात्रा असलेले पदार्थ आपण खाऊ शकतो.

गुढीपाडवा म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर दिमाखात उभारलेली गुढी येते. आहारतज्ज्ञ म्हणून माझ्या मनात गुढीचा एक वेगळाच अर्थ आहे. बघा पटतंय का. गुढीची काठी ज्या पाटावर दिमाखात रोवली जाते तो पाट म्हणजे आपल्या आहाराच्या पद्धतीची मुळे आहेत असे समजावे. त्या भोवताली गुढी उभारली जाते ती वेळूची काठी हे सामर्थ्यांचे प्रतीक आहे. आपल्या मुळांशी कायम जोडलेले राहावे आणि त्यांचा मान राखावा. बत्तासे म्हणजे माधुर्य. स्वभावात माधुर्य कायम असावे, मात्र आहारात चवीपुरतेच गोड पदार्थ असावेत. अशा गोड पदार्थाची निवड करावी जे शरीराला पोषक आहेत. कडुिनबाची माहिती वर लिहिलेली आहेच. त्यासोबतच आहारात कडुिनबाचे सेवन नियमित करावे. आंब्याच्या पानांबद्दलदेखील आपण वाचलं आहेच. उन्हाळ्यात आंबा खाताना या गुणकारी पानांना विसरून चालणार नाही. गुढीवरील पुष्पहाराकडे मी वेगेवेगळ्या व्यायाम पद्धतींनी सजवलेली गुढी म्हणून पाहते. उत्तम आरोग्यासाठी नियमित व्यायाम हितावह आहे, मग तो वेगवेगळ्या प्रकारचादेखील असू शकतो. चालणे, धावणे, पोहणे, सायकल चालविणे, वजन घेऊन व्यायाम करणे, नृत्याची आवड जोपासणे. त्यामुळे तुम्हाला ताजेतवाने वाटतेच आणि सोबत शरीराची उत्तम काळजी घेतली जाते. ते कधी सुस्त होत नाही. जरीची साडी हे वैभवाचे प्रतीक मानले जाते. आपल्याकडे खाण्यापिण्याच्या पद्धतीत वैविध्य आहे. अनेक पदार्थ विविध पद्धतींनी तयार करण्यासाठी पाककला आणि पाकशास्त्र आहे. यांचा आणि आहारशास्त्राचा मेळ हे वैभव आपण जपले आणि आहार नियमन केले तर आपण नेहमीच निरोगी आणि तंदुरुस्त असू. तांब्याचा कलश म्हणजे आनंदाचे, स्वास्थ्याचे प्रतीक मानले जाते. मन आनंदी असेल तर आरोग्य उत्तमच राहते. वरील पद्धतीने आपण आहार घेत असू तर आनंदी मन आनंदी विचारांना खतपाणी देईल इतकं नक्कीच!

नवीन वर्षांच्या गुढीमधील सुपारी म्हणजे संकल्प करणे. चला तर मग या वर्षी ही चतन्याची, आनंदाची चत्रगुढी योग्य आहारासोबत उभारू या. स्वतला नवचतन्य देऊ या. गुढीपाडव्याच्या आहारसमृद्ध शुभेच्छा!