केकचा इतिहास खूप जुना आहे. पूर्वी जे केक खाल्ले जात होते ते आजच्यापेक्षा वेगळे होते. पूर्वी केक खूप गोड असायचे आणि साखरेऐवजी मधाचा उपयोग व्हायचा. असे सांगतात की, आज खाल्ला जातो तसा म्हणजे गोल केक विथ आयसिंग पहिल्यांदा युरोपमध्ये बेक झाला. युरोपात वेगवेगळ्या देशांमध्ये केकला वेगवेगळी नावे आहेत उदाहरणार्थ फ्रेंच भाषेमध्ये केकला गटेउ म्हणतात तर जर्मनीमध्ये केकला टोरटे म्हणतात.

केकची आकाराप्रमाणे वेगवेगळी नावे ठरली आहेत. जसे पाउंड केक, प्लम केक, मफिन्स केक, कफ केक वगैरे. केक वेगवेगळ्या गोष्टींच्या कॉम्बिनेशन्सने बनत असतो. जसे मैदा, सेल्फ रेसिंग फ्लोर, अंडी वगैरे. आपल्या देशात साधारणपणे वाढदिवस वगैरे साजरे करण्यासाठी केक बाहेरून विकत आणले जातात किंवा घरी बनवले जातात. पण हल्ली कुठल्याही प्रसंगाला लोक गोड पदार्थ म्हणून केकचा सर्रास आस्वाद घेत असतात हे मात्र खरं.

म्हणूनच केकच्या या वेगवेगळ्या रेसिपिज.

lkp13
पाउंड केक

हा केकचा एक पारंपरिक प्रकार. त्यात मैदा, साखर, अंडी आणि लोणी हे चार घटक आवश्यक असतात. मुख्य म्हणजे ते प्रत्येकी एक एक पाउंडच्या मापात घेण्याची प्रथा आहे. पण तसं केलं जातंच असं नाही. आपण आपल्या मापानुसार घेऊ शकतो.

साहित्य :

२ कप मैदा
३ टी स्पून बेकिंग पावडर
स्पून मीठ
१ कप बटर
२२५ ग्रॅम क्रीम चीझ
दीड कप साखर
४ अंडी
१ टी स्पून व्हॅनिला इसेन्स
१ टी स्पून अल्मोड इसेन्स
१ कप चेरी अर्धी कापून घेणे
पाव कप मैदा.

कृती :

ओव्हन प्री-हीट करून घ्या. (१६० अंश सेल्सियस) ८ इंच लांब पॅन घ्या. त्याला आतून बटरने ग्रीस करून घ्या. एका मोठय़ा बोलमध्ये बटर, चीझ आणि साखर चांगली बीट करून घ्या. नंतर त्यात एक एक करून अंडी घालून बीट करा. (एका वेळेस एकच अंडे टाका) अंडी बीट करता करता दोन्ही इसेन्स टाका. नंतर मैद्याचे मिक्स्चर टाका व बीट करा. (जास्त बीट करू नय) मैदा मिसळण्यापर्यंतच बीट करा. पाव कप मैद्यामध्ये चेरी घालून ते केक मिक्स्चरमध्ये टाका. केक मिक्स्चर ग्रीस केलेल्या पॅनमध्ये ओता आणि बेक करायला टाका. साधारण ८० मिनिटे बेक करा. त्यात टूथपिक घालून बघा, टूथपिकला पीठ चिकटले नाही की केक झाला असे समजावे.

lkp12कप केक

नेहमीचा केक लहान कपमध्ये बेक करणे म्हणजे ‘कप केक’. कप केकला तुम्ही तुम्हाला पाहिजे तसा डेकोरेट करू शकता.

साहित्य :

१७५ ग्रॅम बटर (रूम टेम्परेचर)
१७५ ग्रॅम पाउडर शुगर
३ अंडी (रूम टेम्परेचर)
१ किंवा दीड टी स्पून व्हॅनिला इसेन्स
१७५ ग्रॅम सेल्फ रेसिंग फ्लोअर
अर्धा टी स्पून बेकिंग पाउडर
१ टी स्पून दूध (जर जरूर असेल तर)

कृती :

बटर आणि साखर ४-५ मिनिटे बेक करून घ्या. त्यात व्हॅनिला इसेन्स घाला, त्यात एक एक करून अंडी घालून बीट करा नंतर शेवटी सेल्फ रेसिंग फ्लोअर आणि बेकिंग पाउडर घाला आणि स्पेटुलाने मिक्स करा. १८० अंश सेल्सिअस प्री-हीट करून घ्या. १६ ते १८ मिनिटे बेक करा. पेपर कपमध्ये घालून बेक करा. पेपर कप नसतील तर घरातील छोटय़ा वाटय़ांमध्ये एक मोठा चमचा केक मिक्स्चर घालून (आधी ग्रीस करून) बेक करा.

lkp14प्लम केक

आपल्या देशामध्ये रिचफ्रुट केक किंवा प्लम केकला ख्रिसमस केक असेसुद्धा म्हणतात. प्लम केकशिवाय ख्रिसमस साजरा झाला असे आपल्या देशात वाटत नाही, इतके त्याला महत्त्व आहे.

साहित्य :

३ कप खजूर
२ कप मनुका
२ कप मुरवलेल्या चेरी
२ कप सुकामेवा
कप संत्रे आणि लिंबाची साल
१ कप टूटीफ्रुटी (ऐच्छिक)
कप ब्रॅण्डी किंवा रम

कृती :

सर्व सुकामेवा बारीक करा आणि ब्रॅण्डी किंवा रममध्ये रात्रभर भिजत घाला. संत्र्याची व लिंबाची साल पण भिजत घाला. २ कप मैदा, ३ कप दळलेली साखर (त्यातली एक कप कॅरेमल करण्यासाठी वापरावी) २५० ग्रॅम बटर, २ टी स्पून बेकिंग पाउडर, ६ अंडी, व्हॅनिला इसेन्स २ टीस्पून, चिमुटभर मीठ, ३ टीस्पून गरम मसाला पावडर, (वेलची, लवंग, दालचिनी, जायफळ, सुंठ), २ टीस्पून ऑरेंज ज्यूस. साखर कॅरमलाइज करा. एका पॅनमध्ये १ कप साखर आणि एक टे.स्पून पाणी घेऊन साखरेचा पाक करा. तो सतत हलवत राहा. पहिल्यांदा साखर विरघळेल, त्याचा सिरप तयार होईल. त्यानंतर ती आणखी गरम होईल, तसा तिचा रंग गडद होईल आणि घट्ट  होईल, मग अर्धा कप पाणी ओतून साखर घट्ट होण्याची प्रक्रिया थांबवा. सतत हलवून गार होऊ द्या.  ओव्हन १८० अंश सेल्सिअस प्री-हीट करून घ्या. मैदा आणि बेकिंग पाउडर मिक्स करून घ्या. पावडर केलेला गरम मसाला आणि भिजवलेला सुकामेवा मैद्यामध्ये घाला आणि ते सगळे मिश्रण बाजूला ठेवा. बटर आणि साखर चांगली बीट करून घ्या. एक एक अंडे फोडून बटर आणि साखरेच्या मिश्रणात घाला आणि  बीट करा. आता मैदा व कॅरेमल, साखर एका नंतर एक अंडय़ामध्ये टाका आणि स्पेटय़ुलाने हलवा. (बीट करू नका) शेवटी व्हॅनिला इसेन्स, ऑरेंज ज्यूस व १ टे.स्पून ब्रॅण्डी मिक्स करा, चमच्याने हलवा. १० इंच बेकिंग टीनमध्ये केकचे मिक्श्चर ओता. ४५ मिनिटे बेक करा. ४५ मिनिटानंतरही केक तयार झाला नसेल तर हिट कमी करून म्हणजे १६० अंश सेल्सियसवर परत १५ ते २० मिनिटे बेक करा. गार झाल्यावर त्याचे काप करून सव्‍‌र्ह करा.

नोंद :

केक बेक झाल्यावर लगेच त्यावर १ टी स्पून ब्रॅण्डी स्प्रिंकल करा. त्यामुळे केकला आणखी चांगली चव येते.

lkp15चीज केक

चीज केकचा इतिहास : ग्रीक किंवा रोमनांच्याही आधीच्या काळापासून हा केक आवडता पदार्थ म्हणून प्रसिद्ध होता. इस. १३९० मध्ये लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकात याच्या आधुनिक रूपाचे वर्णन आढळते. १८७२ मध्ये क्रीम चीज हे आधुनिक रूपात आणि व्यावसायिक पद्धतीने अमेरिकेत वापरात आणले गेले. आधुनिक चीज केक हा बेक न केलेल्या स्वरूपात आणि चीज आणि कुकीज किंवा डायजेस्टिव्ह बिस्किटांचा चुरा यांचा थर म्हणून वापर करून आणि त्याच्या बनविण्याच्या मूळ इंग्रजी पद्धतीत (ड्राय फ्रुट्स/ स्पाइसेस घालणे व ओव्हनमध्ये बेक करणे वगैरे) बदल करून अमेरिकन पद्धतीने बनविण्यात आला.

हा केक एकापेक्षा अधिक थरांनी बनलेला असतो. यातील सर्वात जाड थर हा ताजे, मुलायम चीज, साखर आणि अंडी यांच्या मिश्रणापासून तयार केला जातो. तर याचा सगळ्यात खालचा थर हा बहुतेक वेळेस कुकीज किंवा डायजेस्टिव्ह बिस्किटांचा चुरा वापरून तो पेस्ट्री, स्पोंज केक प्रमाणे बेक करतात किंवा बेक न करता रेफ्रिजरेट करतात. चीज केक गोड करण्यासाठी त्यात बहुतेक वेळेस साखरच घालतात किंवा फळांचे तुकडे /फ्रुट सॉस किंवा फेटलेली मलाई/चॉकलेट सिरप, नट्स आदींनी त्याला टॉिपंग करतात.

साहित्य व कृती :

२०० ग्रॅम क्रीम चीज,
१/३ कप साखर,
२०० ग्रॅम व्हीप क्रीम,
१ टी स्पून व्हॅनिला इसेन्स हे सर्व बीट करून घ्या.
२ पॅकेटस् कुठल्याही बिस्कीटचा चुरा. हा चुरा १०० ग्रॅम बटरमध्ये मिक्स करून पॅनला तळाला थापून १/२ तास फ्रीज मध्ये ठेवणे, त्यावर फेटलेले चीजचा थर पसरा आणि ७-८ तास फ्रीजमध्ये सेट करून ठेवा. स्प्रिंग फोम पॅनमध्ये हा केक बनवला जातो.

टिप्स : कुठल्याही फळाचा रस, क्रश किंवा चॉकलेटचे तुकडे घालूनही सजवू शकता.

lkp16मफिन्स

मफिन हा अमेरिकन शब्द आहे. मफिन म्हणजे लहान आकारात बेक होणारा एक प्रकारचा ब्रेड. खूप वेगवेगळ्या प्रकारची मफिन बनवता येतात. मफिन खासकरून सकाळच्या ब्रेकफास्टच्या वेळी आणि दुपारच्या चहाच्या वेळेस खाण्याची प्रथा आहे.

साहित्य

३०० ग्रॅम ब्राऊन शुगर
१०० ग्रॅम चोको चिप्स
२७० ग्रॅम मैदा
१ टी स्पून बेकिंग पाउडर
१ टी स्पून बेकिंग सोडा
४० ग्रॅम कोको पाउडर
३ ते ४ पिकलेली केळी
२ अंडी हाताने बीट करून
१०० ग्रॅम बटर (वितळवून घेणे)
१ टी स्पून व्हॅनिला इसेन्स
२ टी स्पून क्रीम (कुठलेही).

कृती :

आधी सर्व कोरडे साहित्य मिक्स करून घेणे. नंतर ओले साहित्य मिक्स करून कोरडे मिक्स करणे. १६०अंश सेल्सियसला ओव्हन प्री-हिट करून घेणे व पेपरकपमध्ये थोडे मफिन मिक्स्चर घालून २५ ते ३० मिनिटे बेक करणे. थंड झाल्यावर आईसिंग शुगर स्प्रिंकल करणे.
सीमा नाईक – response.lokprabha@expressindia.com