lp55lp58१/२ जुडी कोथिंबीर (बारीक चिरलेली), २ ते ३ मिडीयम बटाटे, २ चमचे लोणी, ३-४ वाटी मलईचे दूध, १/२ चमचा मीरपूड, मीठ चवीनुसार.

बटाटे मायक्रोमध्ये मिडीयम व ५ ते ७ मिनिटे उकडवून घ्यावे. काचेच्या बाऊलमध्ये बटाटे सोलून कुसकरावे. त्यात एक वाटी दूध टाकून मायक्रो हाय व ३ मिनिटे ठेवावे. हे सर्व कणिकेच्या पिठात सारखे एकत्रित करून घ्यावे. त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर, लोणी, दूध, मिरपूड व मीठ टाकून नीट मिक्स करून घ्यावे. मायक्रो हाय व २ ते ५ मिनिटे ठेवावे. मधून मधून मायक्रो पॉझ करून मिसळून घेत राहावे. यामुळे पोटॅटो थिक सूप तयार होऊन त्यात गुठळ्या राहाणार नाहीत.

lp56कॉर्न पालक भाजी

१ जुडी पालक (स्वच्छ धुवून देठ काढलेले), २ वाटी अमेरिकन कॉर्न, ५-६ हिरवी मिरची, १ १/२ चमचा बारीक कापलेला लसूण, १ चमचा जिरे, २ चमचे लोणी, मीठ चवीनुसार. काचेच्या बाऊलमध्ये पालकची पाने पाणी टाकून मायक्रो हाय व २ मिनिटे शिजवून घ्यावी. लगेच बाहेर काढून पाणी टाकून द्यावे व थंड पाणी व बर्फ त्यावर टाकावा हे केल्याने पालकचा हिरवेपणा तसाच राहातो.

दुसऱ्या काचेच्या भांडय़ात लोणी, लसूण, बारीक केलेली हिरवी मिरची, अमेरिकन कॉर्न, जिरे व मीठ टाकून मायक्रो मिडीयमवर ३ मिनिटे ठेवावे. त्यानंतर त्यात शिजवलेला पालक टाकून नीट मिसळून घ्यावा व मायक्रो मिडीयमवर २ मिनिटे ठेवावे. गरम गरम चपातीबरोबर सव्‍‌र्ह करावे.

lp60भरलेली वांगी

१०-१२ मिडीयम वांगी, १/२ वाटी ओले खोबरे, १/२ वाटी शेंगदाणे, १/२ वाटी सोडे (सुकलेली कोलंबी), १ चमचा जाडे तिखट, १ चमचा जिरे, मीठ चवीनुसार, २ चमचे लोणी. वांग्याचे देठ काढून चिरा पाडून घ्याव्यात. मिक्सरमध्ये ओले खोबरे, थोडेसे भाजलेले शेंगदाणे, सोडे(कोलंबी), तिखट जिरे, मीठ घालून चटणी बनवून घ्यावी. ही चटणी फ्रायपॅनमध्ये लोण्यावर पतरवून घ्यावी. थंड झाल्यावर ही चटणी वांग्यामध्ये भरावी. भरलेली वांगी एका काचेच्या पसरट भांडय़ात ठेवून मायक्रो मिडीयमवर ३ ते ४ मिनिटे शिजवावी. वांगी थोडी कडक राहिल्यास वेळ थोडी वाढवावी.

lp59ब्रेड – बटर पुडिंग

४-५ ब्रेड स्लाइस, १ वाटी मिल्क, १ वाटी क्रीम, २ अंडी, १/४ वाटी साखर, १ चमचा व्हेनिला इसेन्स , २-३ चमचे बेदाणे, १ चमचा ब्राऊन शुगर, २ चमचे बटर.

मिल्क, क्रीम, अंडी, साखर, व्हेनिला इसेन्स एकत्रित करून घ्यावे मग एका बारीक गाळणीने गाळून घ्यावे. काचेच्या पसरट भांडय़ात बेदाणे टाकावे. त्यावर ब्रेड स्लाइस नीट लावाव्यात त्यावर तयार केलेले मिश्रण हळुवार ओतावे. त्यावर ब्राऊन शुगर स्पिंकल करावी व लोण्याचे तुकडे टाकावे. मायक्रोमध्ये हाय व ५-७ मिनिटे ठेवावे. थंड करून सव्‍‌र्ह करावे हे थोडे गरमपण सव्‍‌र्ह करतात.

lp61सफरचंद व अननस क्रमनल

१ वाटी गव्हाचे पीठ, १/२ वाटी लोणी, १/४ वाटी साखर, १/४ चमचा दालचिनी पावडर, ३-४ सफरचंद, १/२ अननस, १ चमचा लिंबू रस.

एका भांडय़ात लोणी, गव्हाचे पीठ, साखर, दालचिनी पावडर टाकून ब्रेड क्रमससारखे मिक्स करून घ्यावे.

पसरट काचेच्या भांडय़ात सफरचंद व अननसाचे बारीक तुकडे करून जाड थरासारखे थापावेत. हे मायक्रो मिडीयमवर ३ मिनिटे ठेवावे. बाहेर काढून त्यावर लिंबाचा रस व १ चमचा साखर स्पिंकल करावी. त्यावर तयार केलेले क्रमनल मिक्स नीट पसरवून घ्यावे.

मायक्रोमधे हायवर  ६ ते ८ मिनिटे ठेवावे. हे क्रमनल साधारणत: आईस्क्रीमबरोबर सव्‍‌र्ह करतात.

lp57बोर्नव्हीटा आईस्क्रीम

२ वाटी दूध, ३-४ चमचे बोर्नव्हीटा (हॉरलेक्स वापरले तरी चालेल), २-३ स्कूप आईस्क्रीम व्हेनिला, काचेच्या भांडय़ात १ वाटी दूध घेऊन त्यात बोर्नव्हीटा टाकून मायक्रो हाय व ३० सेकंद ठेवावा. आईस्क्रीम व उरलेले दूध मायक्रोमध्ये हायवर १ मिनिटे ठेवावे. नंतर सर्व एकत्र मिक्स करून सव्‍‌र्ह करावे. हे पेय थोडे गरम असले तरी बोर्नव्हीटा व व्हेनिला आईस्क्रीमची वेगळी चव येते.

lp62रताळ्याचा हलवा

२ चमचे तूप, ३-४ मिडीयम रताळी (सोलून किसलेली), १ वाटी साखर, १ वाटी मावा, १/२ चमचा वेलची पावडर, १/२ वाटी क्रीम.
काचेच्या भांडय़ात किसलेली रताळी व तूप टाकून मायक्रो मिडीयमवर ५ मिनिटे ठेवावे. मध्ये मध्ये थोडेसे ढवळत राहावे. बाहेर काढून त्यात साखर, मावा कुसकरलेला, वेलची पावडर व क्रीम टाकून मायक्रो हायवर ३-४ मिनिटे ठेवावे. रताळी थोडी जून असतील तर थोडी वेळ वाढवावी.
विवेक ताम्हाणे – response.lokprabha@expressindia.com