गायत्री हसबनीस- viva@expressindia.com

एकेकाळी थंडी सुरू झाली की ज्याच्या त्याच्या अंगावर नानारंगी, नानाढंगी स्वेटर्स चढलेले दिसायचे. आबालवृद्धांसाठी स्वेटर ही आवश्यक खरेदी असायची. आता मात्र स्वेटर्सची जागा ही जॅकेट्सनी घेतलेली आहे. लहान मुलांपासून मोठय़ांपर्यंत सगळ्यांनाच ही जॅके ट्स खुणावत असतात. तरुणाईसाठी तर ते फॅ शन स्टेटमेंट असल्याने ऑनलाइन बाजारात जॅकेट्सची गर्दीच दाटली आहे. नवीन वर्षांच्या पहिल्या गुलाबी थंडीच्या आठवडय़ात या जॅकेट्सनी भरलेल्या बाजारावर टाक लेली नजर..

Man Pays Only 1167 Rupees For pair of Cartier earrings Those are eighteen Carot rose gold Glitch On Website
११ लाखांपेक्षा जास्त किंमतीचं सोनं मिळालं फक्त हजार रुपयांत; वेबसाईटची ‘ही’ एक चूक अन् व्यक्ती मालामाल
LSG beat MI by 4 Wickets
IPL 2024: लखनऊने अखेरीस मिळवला विजय, मुंबई इंडियन्सचं प्लेऑफसाठीचं गणित अवघड
Lamborghini On Fire video goes viral
Lamborghini Car Fire Video: तेलंगानात गुंडांनी पेटवली ४ कोटींची लॅम्बोर्गिनी स्पोर्ट कार; पाहून मालकानं…
salman khan answered why he refuses to leave 1bhk home of bandra
हजारो कोटींचा मालक, तरीही सलमान खान १ BHK घरात का राहतो? भाईजानचं गॅलेक्सी अपार्टमेंटशी आहे खास नातं

यंदा जॅकेट्समध्ये नवीन काय?, हा प्रश्न तुम्हाला भेडसावत असेल तर मेटल बटन्स, फर आऊटलेअरिंगपासून लेदर, सिंथेटिक फॅ ब्रिकपर्यंत वेगवेगळ्या ढंगातील हटके जॅकेट्स स्वस्त आणि मस्त दरात मिळतील. यंदा रंगाचा मंत्र हा लाल आणि न्यूड असाच राहणार आहे. यावेळी एक्स्ट्रा लॉन्ग जॅकेट्स हे सर्वात जास्त ट्रेण्डसेटर आहेत. मुलांसाठी व मुलींसाठी ‘रोडस्टर’ या ब्रॅण्डकडून धमाकेदार जॅकेट्स आले आहेत. रॉयल डार्क शेड्समधील जॅकेट्स मुलांसाठी ऑलिव्ह ग्रीन तर मुलींसाठी रेड आणि नेव्ही ब्लूमध्ये आले आहेत. मुलांसाठी कॉफी ब्राऊन हा रंग फिरस्त्यांप्रमाणे अगदी युनिक वाटेल. या रंगातील कॉफी ब्राऊन सॉलिड जॅकेट १,५९९ रुपये एवढय़ा किमतीत मिळेल. काहींना वेगळं ट्राय करायला आवडत असेल तर ब्लॅक चेक्स जॅकेटही १,१९९ रुपये एवढय़ा किमतीत आहे. डेनिम जॅकेट १,२४९ रुपये, बॉम्बर जॅकेट १,४९९ रुपये, क्विल्टेड जॅकेट १,५१९ रुपये आणि टेलर जॅकेट ९९९, १,४९९, १,५९९ रुपये अशा किमतीत उपलब्ध आहेत. तर मुलींसाठी नेव्ही ब्लू जॅकेट १,७९९ रुपये आणि वुमन ब्लॅक सॉईल्ड हूडेड जॅकेट १,६४९ रुपये आणि खादी सॉईल्ड पॅडेड २,१५९ रुपये एवढय़ा किमतीचे आहेत. क्रीम कलर्ड जॅकेट १, ३९९ रुपये आणि ब्लू सॉईल्ड जॅकेट १,८१९ रुपये एवढय़ा किमतीत मिळेल. मुलांसाठी मरून जॅकेट्स १, ४९९ रुपये आणि २,२७९ रुपये अशा किमतीत उपलब्ध आहेत. याशिवाय यात तुम्हाला रिव्हर्सेबल जॅकेटसुद्धा मिळेल.

‘प्युमा’ या ब्रॅण्डकडून मुलींसाठी सिंपल जॅकेट्स विविध दरात मिळतील. मुलींसाठी ब्लॅक बॉम्बर जॅकेट ७,९९९ रुपये एवढय़ा किमतीत आहे. ‘प्युमा’चे खास मुलींसाठी कॉटन जॅकेट आले आहेत, याची किंमत ३,२९९ रुपये एवढी आहे. यावर झीपर आणि पॉकेट्स आहेत. वुमन हूडी जॅकेट ३,४९९ रुपये आणि फुल स्लिव्हज स्पोर्ट्स जॅकेट २,७४९ रुपये एवढय़ा किमतीत मिळेल. मुलींसाठी स्वेटशर्ट १,४९९ रुपये एवढय़ा किमतीत उपलब्ध आहे. मुलांसाठी ट्रॅक जॅकेट (टी सेव्हन) २,९९९ रुपये एवढय़ा किमतीत आहे.

फ्रन्ट झिपर जॅकेट ३,८९९ रुपये एवढय़ा किमतीत मिळेल. नेक सॉईल्ड जॅकेट ३,९९९ रुपये एवढय़ा किमतीत मिळेल. तर ब्ल्यू पफर जॅकेट २, ३९५ रुपये एवढय़ा किमतीत मिळेल. २,८५१ रुपयात पॅडेड (एक्स एस) जॅकेटसुद्धा मिळेल. अजियो. कॉमवर जॅकेट्सचा सेल उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यामुळे स्पील्ट पॅडेड जॅकेट्सह फीट जॅके ट, हूडी स्वस्त दरात मिळतील. यांची किंमत १,६७९ रुपये, २,९९९ रुपये एवढी आहे.

‘आदिदास’ या ब्रॅण्डकडून तुम्हाला कॅज्यूअल आणि कम्फर्टेबल असे इझी वेअरेबल जॅकेट्स मिळतील. मुलींसाठी टाईट जॅकेटसह स्ट्रेचबल लेगिंग्स १,९९९ रुपये एवढय़ा किमतीत मिळेल. तर स्ट्राईप लॉन्ग स्लिव्हड जॅकेट २,४९९ रुपये एवढय़ा किमतीत मिळेल. ऑफ व्हाइट आणि लिव्ह डिझाइन जॅकेट ४,०४९ रुपये एवढय़ा किमतीत आहे. हे जॅकेट्स मिन्त्रावर उपलब्ध आहेत. ‘आदिदास’ची खासियत म्हणजे थ्री स्ट्राइप जॅकेट्स. त्यामुळे मुलां-मुलींसाठी असे जॅकेट्स उपलब्ध आहेत. मुलांसाठी थ्री स्ट्राइप जॅकेट २,९९९ रुपये एवढय़ा किमतीत आहे. तर झीप हूडी २,४८२ रुपये एवढय़ा किमतीत आहे. ट्रॅक जॅके ट ३,६७९ रुपये एवढय़ा किमतीत ‘कुव्स’वर उपलब्ध आहे.

‘नाईकी’चे जॅकेट्स ५ टक्के सूट या सवलतीपासून सेलपर्यंतच्या लाभासह उपलब्ध करून देण्यात आले आहेत. ‘रिबॉक’ला ‘आदिदास’ आणि ‘नाईकी’ या दोन ब्रॅण्ड्सनी विंटर कलेक्शनमध्ये ई बाजारात मागे ठेवून पुढची बाजी मारली आहे. त्यामुळे हा बदल ग्राहकांसाठी वेगळा ठरेल. त्यामुळे आदिदासप्रमाणे आता नाईकी हा टॉप ब्रॅण्ड विंटर कलेक्शनसाठी ग्राहकांकरिता योग्य ठरला आहे. नाईकी या ब्रॅण्डकडून मुलांसाठी स्पेशल पण कॅज्यूअल जॅकेट्स उपलब्ध आहेत. पॉलिस्टर ट्रॅक जॅकेटप्रमाणे ट्रॅक पॅन्ट्स जॅकेट्सच्या गर्दीत ५४४ रुपये एवढय़ा किमतीत उपलब्ध झाले आहेत. यात तर ट्रॅक टॉपही उतरला आहे ज्याची किंमत १,९९६ रुपये एवढी आहे. त्यामुळे नाईकी हा ब्रॅण्ड लाभदायी ठरेल. झीप फ्रं ट स्वेटशर्ट २,३९६ रुपये एवढय़ा किंमतीत आहे. प्रिडेंड स्लिव्हलेस हूडी २,५५९ रुपये एवढय़ा किमतीत मिळेल. फुल स्लिव्हज सेल्फ डिझाइन जॅकेट २,९९५ रुपये एवढय़ा किमतीत आहे. रिब्ड हेम्स जॅकेट ब्लू कलरमध्ये ३,८५६ रुपये एवढय़ा किमतीत मिळेल. पॉलिस्टर ट्रॅकसूट १,४७९ रुपये एवढय़ा किमतीत मिळेल. तर पॉलिस्टर टेरी जॅकेटसुद्धा १,१४५ रुपये एवढय़ा किमतीत आहे. स्पोर्ट्सवेअर टी-शर्ट १,६१७ रुपये एवढय़ा किमतीत मिळेल. याशिवाय झीप हूडी आणि क्निट ट्रेनिंग जॅकेट २,५९५ रुपयांपासून २,९९५ रुपये एवढय़ा किमतीत मिळेल.

‘शिइन’ हा नवा कोरा ब्रॅण्ड मुलींच्या पसंतीस उतरला आहे. युथ आयकॉन वाटेल या अर्थाने खरेदी करण्यासाठी या ब्रॅण्डकडून कलरफुल जॅकेट्स आले आहेत. रेड डार्क कलरमधे लेटर प्रिंट कट जॅकेट १,६६८ रुपये एवढय़ा किमतीत आहे. त्यानंतर झीप अप ड्रोिस्ट्रग जॅकेट १,४६६ रुपये एवढय़ा किमतीत आहे. डबल ब्रेस्टेड चेक्स कॉट २, ५९२ रुपये एवढय़ा किमतीत मिळेल. या जॅकेट्समध्ये पॅच स्लिव्ह १,३८३ रुपये आणि वॉटरफॉल कॉलर पॉकेट फ्रन्ट व्रॅप जॅकेट १,०५४ रुपये एवढय़ा किमतीत सहज उपलब्ध आहेत. डेनिम जॅकेट १,९०६ आणि १,९३१ या दरात मिळतील. फ्लोरल एम्ब्रॉयडरी बॉम्बर जॅकेट खूप हटके वाटेलच आणि याची किंमत आहे १,३६८ रुपये. प्रमुख आकर्षण म्हणजे फ्लपी फर जॅकेट जे तुम्हाला २,१५८ रुपये एवढय़ा किमतीत मिळेल. एक्स एस पूल ओव्हर १,००७ रुपये एवढय़ा किमतीत मिळेल. कॉन्ट्रास्ट ट्रीप झीपर क्रॉप जॅकेट १,७१४ रुपये एवढय़ा किमतीत आहे. टेडी जॅकेट २,५१९ रुपये एवढय़ा किमतीत मिळेल. वेलवेट बॉम्बर २,१३४ रुपये आणि लेदर जॅकेट २,८०७ रुपये एवढय़ा किमतीत मिळेल.