scorecardresearch

Premium

फिट-नट : तृप्ती तोरडमल

पायांच्या व्यायामावरही ती भर देते. पायाचे व्यायाम केल्याने शरीरातील मोठे अवयव कार्यरत होतात.

तृप्ती तोरडमल
तृप्ती तोरडमल

प्रियंका वाघुले

हिंदी मालिका ते मराठी चित्रपट असा मोठा पल्ला गाठताना फिटनेस सगळ्यात महत्त्वाचा हे सूत्र कलाकार म्हणून तृप्तीने चांगलंच मनाशी घोटवलं आहे. ‘सविता दामोदर परांजपे’ या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या मनावर आपल्या अ‍ॅक्टिंगचा प्रभाव टाकणारी अभिनेत्री म्हणून आज तृप्ती तोरडमलचा चेहरा लोकांना चांगलाच परिचयाचा झाला आहे. दिग्गज कलावंत म्हणून ओळखल्या गेलेल्या मधुकर तोरडमल यांची ही कन्या ही आपल्या फिटनेसबद्दल अतिशय जागृत राहण्याचा प्रयत्न करत असल्याचं सांगते.

नियमित व्यायाम करत असताना आपल्या व्यायामात कोणत्या गोष्टी असायला हव्यात आणि कोणत्या व्यायाम प्रकारावर आपण आपला वेळ खर्च करावा, याचे तिचे स्वत:चे नियोजन असल्याचे ती सांगते. जिममध्ये व्यायाम करताना आपल्या व्यायामात कार्डिओ अजिबात करत नसल्याचे ती सांगते. कार्डिओ न करण्याचे मुख्य कारण म्हणजे कार्डिओ केल्याने आपले वजन कमी होण्यास मदत होते. तर फिटनेस म्हणजे फक्त आपले वजन कमी असणे नव्हे, तर आपण एकंदरीतरीत्या फिट असणे होय. त्यामुळे वजन कमी करण्यावर भर न देता इतर व्यायाम प्रकारांवर ती जास्त भर देते. तसेच पूर्णपणे बारीक असण्याऐवजी लयबद्ध शरीरयष्टी स्त्रियांना अधिक सुंदर दिसते, असं तृप्तीला वाटतं. त्यामुळे फक्त बारीक होणं महत्त्वाचं नसून इतर गोष्टीही महत्त्वाच्या असतात, असं ती म्हणते.

जिममध्ये व्यायाम करत असताना  कार्डिओ टाळून इतर व्यायाम प्रकारांमध्ये आपल्या पायांच्या म्हणजेच लेग्झ एक्ससाइजला ती जास्त प्राधान्य देते. आठवडय़ातून दोनदा लेग एक्ससाइज करत असल्याचं तिने सांगितलं. त्यानंतर स्क्वॉट्स, देडलिफ्ट, लेग प्रेस, लेग एक्सटेन्शन, लेग कर्रल हे प्रकार लेग एक्ससाइजमध्ये करत असल्याचे ती सांगते.

पायांच्या व्यायामावरही ती भर देते. पायाचे व्यायाम केल्याने शरीरातील मोठे अवयव कार्यरत होतात. त्यामुळे जास्त एनर्जी खर्च होते आणि मेटॅबॉलिजम जास्त प्रमाणात कार्यरत होते. यामध्ये मेंटल स्ट्रेंथ असणे देखील आवश्यक असते, असं तिने सांगितलं.

आपल्या आहारात काय असावं आणि काय असू नये याचं उत्तम ज्ञान आपला फिटनेस सांभाळताना असणं गरजेचं असतं, असं तृप्ती म्हणते. आपण काय खातो, कसे खातो आणि मुळात कधी खातो हे त्या त्या अन्नपदार्थानुसार ठरवायला हवं. प्रोटिन, काबरेहायड्रेट या गोष्टी आपल्या आहारात येण्याचं प्रमाण किती व कसं असावं याचं नियोजन प्रत्येकाने करणं गरजेचं असतं. आपल्या आहारात या गोष्टींना अतिशय महत्त्व देत असल्याचं तृप्तीने सांगितलं. त्यामुळे आवश्यकतेनुसार तिच्या आहारात काही अन्नपदार्थाचा समावेश झाला आहे तर काही पदार्थ बादही झाले आहेत. उदाहरणादाखल आपल्या शरीराला मानवणाऱ्या आहार पद्धतीनुसार रात्रीच्या जेवणात चपाती खाण्याचं टाळत असल्याचं तिने सांगितलं. व्यायाम आणि योग्य आहार याचा समतोल हेच फिटनेसचं सूत्र असल्याचं ती मानते.

viva@expressindia.com

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व व्हिवा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Article about fit actress trupti tordamal

First published on: 08-02-2019 at 01:25 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×