तेजश्री गायकवाड

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गेली अनेक वर्ष मुलींची अंतर्वस्त्रं हा टॅबू  होता. ब्राची पट्टी दिसणे, अंतर्वस्त्राचे आकार बाहेरच्या बाजूने दिसणे, ब्राचे कलर दिसणे म्हणजे तुमची फॅशनचुकली आहे असं मानलं जातं. पण आता ब्रा आणि तिची बाहेर दिसणारी पट्टी हीच फॅशनझाली आहे.

एखाद्याने अमूक एका पध्दतीने घातलेले कपडे आपल्याला पाहताक्षणीच आवडतात. त्यात एकतर आपल्याला हवे तसे बदल करून किंवा त्याचपध्दतीचे वेगळ्या रंगाचे कपडे परिधान करून आपण आपलं फॅशन स्टेटमेंट ठरवतो. मात्र मी करेन ती फॅशन इतरांना फॉलो करायला लागेल, हा आत्मविश्वास असणारी मंडळीही कमी नाहीत. अनेकदा अशा हरहुन्नरी, धाडसी फॅशनप्रेमींमुळे एरव्ही निषिध्द मानली जाणारी फॅशनही जेव्हा सर्वसामान्य होऊन जाते तेव्हा फॅशनचा बाजार नेहमीपेक्षा वेगळा भासतो. सध्या अशा ‘आऊट ऑफ द बॉक्स’फॅशन टेंड्समुळे सर्जनशीलतेचे नवनवे अविष्कार या बाजारात पहायला मिळतायेत ज्यात स्त्रियांची अंतर्वस्त्रेही आत लपून राहिलेली नाहीत..

मेन्स फॅशनपेक्षा वुमेन्स फॅशनमध्ये नेहमीच खूप विविधता आपल्याला पाहायला मिळते. अनेकदा फॅशनट्रेंड्समागे काही एक ठाम भूमिका असते. गेल्या काही वर्षांपासून फॅशनइंडस्ट्री अनेक धाडसी निर्णय घेऊ  लागली आहे. अंतर्वस्त्रांचे बदलते स्वरूप हे याच निर्णयांपैकी एक. अनेक वर्षांपासून मुलींची अंतर्वस्त्रे ही बाहेर दिसू नयेत, हाच रुढ संकेत होता, आजही काही प्रमाणात तो आहे. गेली अनेक वर्ष मुलींची अंतर्वस्त्रं हा टॅबू  होता. ब्राची पट्टी दिसणे, अंतर्वस्त्राचे आकार बाहेरच्या बाजूने दिसणे, ब्राचे कलर दिसणे म्हणजे तुमची फॅशनचुकली आहे असं मानलं जातं. पण आता ब्रा आणि तिची बाहेर दिसणारी पट्टी हीच फॅशनझाली आहे. याबद्दल बोलताना अंतवस्त्र्राची फॅशन ट्रेंडमध्ये आली आहे त्यामागचं कारण म्हणजे कम्फर्ट आणि सेन्शुअ‍ॅलिटी दोन्हींचा मेळ साधणारे कपडे घालण्याकडे एकूणच तरूणाईचा कल वाढतो आहे, असं नवीन फॅशन डिझायनर घडवणाऱ्या ‘पर्ल अकॅडमी’च्या प्राध्यापक डॉ. वैभवी रानवडे सांगतात. ‘ब्राच्या डिझाईनमध्ये नवनवीन प्रयोग होताना दिसतायेत. मेन्स फॅशनमध्ये लोअर गारमेंट घालून त्यांच्या अंतर्वस्त्राचा ब्रँड दाखवणं हा अनेक वर्षांपासूनचा ट्रेंड आहे. तसाच आता मुलींनी रंगीबेरंगी आणि वेगवेगळ्या पध्दतीचे ब्रा घालून मिरवणं हा टॅबू राहिलेला नाही. आऊटर गारमेंटसमध्ये जसजसे बदल होत आहेत तसेच बदल अंतर्वस्त्रांमध्येही होतायेत. आणि हे टेंड तुम्ही चांगल्या पध्दतीने कॅरी करण्यासारखे असल्यानेच ते आऊट ऑफ द बॉक्स असले तरी लोकप्रिय ठरले आहेत’, असे मत रानवडे यांनी व्यक्त केले. तर अंतर्वस्त्रांची ही फॅशनसुध्दा या इंडस्ट्रीच्या नियमाप्रमाणे इतिहासातून फिरूनच आली आहे, याकडे स्टायलिस्ट अमित दिवेकर याने लक्ष वेधले.

‘फॅशनही नेहमीच चक्राकार फिरत असते हे सगळ्यांनाच माहिती आहे. अंतर्वस्त्रांची ही फॅशनसुध्दाअगदी नवीन नाही, (पान ४ वर) (पान १ वरून) पण ती आउट ऑफ द बॉक्स नक्कीच आहे. १८ व्या शतकातील ही फॅशनपरत आली आहे. मॅडोनाच्या तरुणपणी लोकप्रिय ठरलेली ही फॅशनहोती. तिनेच या ट्रेंडची सुरुवात केली. ती टी-शर्टच्या आतमध्ये किंवा वरती कलरफुल रंगाची ब्रा घालायची, आतून ब्रा घालून त्यावरून ट्रान्सपरन्ट टॉप, नेट किंवा जाळीचा टॉप घालण्याचा प्रकार तिने सुरू केला होता. तोच ट्रेंड आता परत आला आहे, फक्त नेहमी प्रमाणे त्यामध्ये आजच्या काळाशी सुसंगत असे बदलही झाले आहेत’, असे दिवेकर यांनी सांगितले. वुमेन्स फॅशनपेक्षाही मेन्स फॅशनमध्ये झालेला बदल हा फक्त आऊट ऑफ द बॉक्स आहे असं नाही तर तो अनपेक्षितपणे आणि अगदी कधीही न अनुभवेलला असा असल्याचे मत दिवेकर यांनी व्यक्त केले. मेन्स फॅशन ही अनेक वर्ष शर्ट-पॅंटपुरतीच मर्यादित होती. मात्र तिचा फ्लोरल प्रिंटपर्यंत झालेला प्रवास हा खरोखरच अनोखा आहे, असं ते सांगतात.

सध्या मेन्स शर्ट, टी-शर्ट , ट्रॅडिशनल कपडय़ांमध्ये शेरवानी, कुर्ता यावरही फ्लोरल प्रिंट दिसू लागल्या आहेत. फ्लोरल प्रिंट्ससारखाच अजून एक मोठा बदल मेन्स फॅशनमध्ये झाला आहे. नेहमीच एका रेषेत असणारी मेन्स गारमेंटची हेमलाइन आता मुलींच्या गारमेंटप्रमाणे अनइव्हन दिसू लागली आहे. याशिवाय, मुलांच्या फॅशनमध्ये कधीही नसणारे स्कर्ट्स, पटियाला पॅन्ट्स असे बॉटम्स ट्रेंडमध्ये आले आहेत. अनारकली, प्लीट्स, लेअरिंग आणि मल्टीडाय कलर असं सगळं मेन्स फॅशनमध्ये कधीही पहायला न मिळालेल्या गोष्टी अशा बंद खोक्यातून बाहेर पडाव्यात तशा ट्रेंडमध्ये आल्या आहेत. ‘मला वैयक्तिकरित्या मेन्स फॅशनमधले ट्रेंड खूप आवडले. मेन्स फॅशनकुठेतरी फेमिनाइन लूकक डे वळली आहे हे जाणवतं आहे. मेन्स फॅशनसध्यान्युट्रल, युनिसेक्स होताना दिसते आहे. मेन्स फॅशनमध्ये ड्रेप हा प्रकार गेल्या एक दोन वर्षांत आला आहे. या सगळ्या ट्रेंडमागे अनाम, चोला असे काही डिझायनर सतत कामही करतायेत. इंटरनॅशनल डिझायनर्सही मेन्स फॅशनमध्ये अनेक प्रयोग करतायेत. त्यामुळेच आता आलेला हा ट्रेंड ग्लोबल ते लोकल सगळीकडेच वाढणार यात शंका नाही’, असा विश्वास दिवेकर यांनी व्यक्त केला.

मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Article about fashionable innerwear for girls
First published on: 27-07-2018 at 01:09 IST