‘जागतिक पर्यावरण दिन’ ५ जूनला सगळीकडे साजरा झाला. पर्यावरणाशी संबंधित अनेक गोष्टींवर त्यादिवशी चर्चा झाली. पर्यावरणाचा आाणि फॅशनचा वरवर पाहता काही संबंध असेल हे जाणवतही नाही. मात्र समाजाच्या सगळ्याच स्तरावरून पर्यावरणाचा समतोल राखण्याविषयी प्रयत्न होत असताना त्याचे पडसाद फॅशनच्या क्षेत्रातही उमटू लागले आहेत. गेल्या दोन-तीन वर्षांपासून इकोफ्रेंडली फॅ शन, इकोफ्रेंडली फॅ ब्रिक आणि कलर्स याची चर्चा होऊ लागली आहे. या ग्रीन फॅशनच्या विश्वाबद्दल थोडेसे जाणून घेऊ..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

फॅशन इंडस्ट्रीला लागणारी मूलभूत गोष्ट म्हणजे कापड. पण ते बनवण्याच्या प्रक्रियेतही मोठय़ा प्रमाणात प्रदूषण होते. त्यामुळे अनेक डिझायनर हल्ली त्यांच्या कलेक्शनसाठी हातमागावरचे किंवा इकोफ्रेंडली फॅ ब्रिक वापरताना दिसतात. याच फॅब्रिकचा वापर करून ज्वेलरीही बनवली जाते आणि त्याचाही वापर सातत्याने वाढताना दिसतो आहे. इकोफ्रेंडली फॅब्रिक म्हणजे ज्यामुळे पर्यावरणाची कोणत्याही प्रकारची हानी होत नाही. या धाग्यावर कोणतीही औषध फवारणी केली जात नाही. केमिकल वापरले जात नाही. तसेच हे कापड तयार झाल्यावर त्यावर नैसर्गिक रंगकाम केले जाते. भाज्या, फळे, फुले, झाडांची मुळे, लाकूड अशा निसर्गात सहज उपलब्ध असलेल्या गोष्टींपासून यावर डाइंग केले जाते. डायमध्येही कोणते केमिकल वापरले जात नाही. अर्थात या सगळ्यामुळे त्याची किंमत थोडीजास्त असते. शिवाय हे कापड आपल्या शरीरासाठीही उपयुक्त असते. पण ते विकत घेताना मात्र इकोफ्रेंडली फॅब्रिक, ‘शंभर टक्के ऑरगॅनिक’, ‘नॅचरल प्रॉडक्ट’ असे लिहिलेले आहे ना, याची खातरजमा करून घ्यायला हवी. हे फॅ ब्रिक नेमके कुठल्या प्रकारचे असतात?

इकोफ्रेंडली रंग

  • व्हेजिटेबल व फ्रूट डाइज –
  • डाळिंब, बीट, लाल कोबीची पानं, कांद्याची साले यांपासून लाल रंग तयार केला जातो.
  • पालक, हिरडा यापासून हिरवा रंग तयार होतो.
  • संत्र्याचे साल, लिंबाचे साल, हळद यापासून पिवळा रंग तयार होतो.
  • गाजर, भोपळा आणि अ‍ॅप्रिकॉटपासून नारंगी रंग तयार होतो.

झाडांपासून तयार होणारे रंग

  • इंडिगोपासून निळा रंग तयार होतो.
  • झाडांच्या बुंधापासून राखाडी रंग तयार होतो.
  • रुबिया झाडाच्या मुळापासून लाल, नारंगी, गुलाबी रंग तयार होतो.

काही इकोफ्रेंडली फॅब्रिक

  • ऑरगॅनिक कॉटन
  • लेनिन
  • हेम्प
  • सिल्क
  • खादी
  • लोकर

viva@expressindia.com

मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Eco friendly fashion
First published on: 09-06-2017 at 00:25 IST