भारतीय पारंपरिक सौंदर्यवती

हिंदी चित्रपटांतील नायिका आणि भारतीय रॅम्पवरील मॉडेल्स यांनी स्त्री सौंदर्याबाबत एक प्रतिमा

आजच्या हिंदी चित्रपटांतील नायिका आणि भारतीय रॅम्पवरील मॉडेल्स यांनी स्त्री सौंदर्याबाबत एक प्रतिमा निर्माण केली आहे. आजच्या काळातली सौंदर्याची विशिष्ट परिमाणं ही आपल्याला पुराणातून, पुरातन शिल्पांतून- भित्तिचित्रांमधून भेटणाऱ्या भारतीय स्त्रीपेक्षा काहीशी वेगळी आहेत. आज मॉडेलिंग विश्वात सौंदर्याचे निकष उंच, शिडशिडीत बांधा, गोरा वर्ण आदी निकष लावले जातात. बॉलीवूडमध्येही थोडय़ा फार फरकाने याच परिमाणांना आदर्श मानलं जाऊ लागलं आहे. पण मुळात ही परिमाणं भारतीय नसून ग्रीको-रोमन स्त्रीप्रतिमेची असल्याचे मुंबई विद्यापीठातील इतिहास अभ्यासक डॉ. प्राची मोघे सांगतात. ‘आपल्याकडे विविध ग्रंथांमधून भारतीय स्त्रीचे वर्णन केलेले आहे.

त्यानुसार सुंदर स्त्री म्हणजे ती मृगनयनी किंवा मीनाक्षी असते. तिचा बांधा सुडौल असतो. उन्नत वक्षस्थळ (आम्रफलासारखी), सिंहकटी, गोलाकार मोठे नितंब ही तिच्या सौंदर्याची लक्षणं सांगितली जातात. संस्कृत साहित्यामध्ये स्त्रीचे वर्णन तत्कालीन भारतीय स्त्रीच्या शरीरयष्टीनुसार केलेले आढळते. त्यामुळे भारतातील विविध प्रांतानुसार बदलत गेलेली शरीरयष्टीची चित्रणे या साहित्यात सापडतात,’ असे प्राची मोघे सांगतात. सौंदर्याच्या व्याख्येत गोरेपणाचा अट्टहास आपल्याकडे अगदी अलीकडच्या काळात आला आहे. भारतीय स्त्रीचा मूळ रंग सावळा, गव्हाळ असल्याचे संदर्भ आपल्याला साहित्यात सापडतात. आपल्याकडील प्राचीन शिल्पचित्रे, भित्तिचित्रे यामधून अशीच स्त्रीप्रतिमा दिसून येते. उत्तरेकडील स्त्री गोरी, उंच, नाजूक बांध्याची, पश्चिमेकडे तुलनेने थोडय़ा ठेंगण्या आणि स्थूल, दक्षिणेकडे मध्यम उंचीच्या आणि लांब केस असणाऱ्या, पूर्वेकडील स्त्रिया मध्यम बांध्याच्या अशी प्रांतागणिक विविधताही त्यात आढळते.

संस्कृत साहित्यातील ‘अष्टनायिका’ संकल्पनेत विविध वयोगटातील स्त्रीच्या सौंदर्याची वर्णने आली आहेत. इतकेच काय तर मधुबालापासून हेमामालिनीपर्यंत आणि अगदी नव्वदीच्या दशकातल्या रविना टंडन, श्रीदेवी, माधुरी दीक्षितपर्यंत सर्व नायिकांची वर्णनेसुद्धा या वर्णनाशी मिळतीजुळती होती. पण सध्या मात्र ग्लोबलायझेशन आणि त्या ओघात आलेल्या मार्केटिंगच्या चक्रात स्त्रीच्या सौंदर्याची पश्चिमेकडून आलेली एक ठोकळेबाज प्रतिमा बनून राहिली आहे आणि भारतातसुद्धा तीच परिमाणं आपण ग्राह्य़ धरू लागलोय. पारंपरिक भारतीय स्त्रीला प्रजननक्षम असणे महत्त्वाचे मानले जायचे आणि त्यासाठी ती हेल्दी असणं गरजेचं असे, अशी माहिती डॉ. मोघे यांनी दिली.उंच, नाजूक बांध्याची, पश्चिमेकडे तुलनेने थोडय़ा ठेंगण्या आणि स्थूल, दक्षिणेकडे मध्यम उंचीच्या आणि लांब केस असणाऱ्या, पूर्वेकडील स्त्रिया मध्यम बांध्याच्या अशी प्रांतागणिक विविधताही त्यात आढळते. संस्कृत साहित्यातील ‘अष्टनायिका’ संकल्पनेत विविध वयोगटातील स्त्रीच्या सौंदर्याची वर्णने आली आहेत. इतकेच काय तर मधुबालापासून हेमामालिनीपर्यंत आणि अगदी नव्वदीच्या दशकातल्या रविना टंडन, श्रीदेवी, माधुरी दीक्षितपर्यंत सर्व नायिकांची वर्णनेसुद्धा या वर्णनाशी मिळतीजुळती होती. पण सध्या मात्र ग्लोबलायझेशन आणि त्या ओघात आलेल्या मार्केटिंगच्या चक्रात स्त्रीच्या सौंदर्याची पश्चिमेकडून आलेली एक ठोकळेबाज प्रतिमा बनून राहिली आहे आणि भारतातसुद्धा तीच परिमाणं आपण ग्राह्य़ धरू लागलोय. पारंपरिक भारतीय स्त्रीला प्रजननक्षम असणे महत्त्वाचे मानले जायचे आणि त्यासाठी ती हेल्दी असणं गरजेचं असे, अशी माहिती डॉ. मोघे यांनी दिली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: The traditional indian beauty