परीक्षा, अभ्यास, रिलेशनशिप, मैत्री, करिअर, लुक्स.. तरुणाईच्या आयुष्यात यातलं काहीही हल्ली तणाव निर्माण करतं. असुरक्षितता, घाई, धावपळ, स्पर्धा आणि तणाव.. यातून सुटका नाही का? हे सगळं नसेल तर आयुष्यात मजा काय? यातली खुमारी तर राहिली पाहिजे पण तोलही जायला नको. करता येईल असंस्ट्रेस मॅनेजमेंटच्या टिप्स देणाऱ्या गोष्टी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पेपरच्या पुरवणीमध्ये मोठय़ा अक्षरात ती बातमी आली होती. खूप सारे फोटोही होते त्यात. पुण्यात नुकत्याच झालेल्या ‘गे’ परेडची बातमी होती ती. काय वाट्टेल त्या बातम्या छापतात  बुवा, बाबा म्हणाले. ‘हो ना!’ आईची पुस्ती. ‘काहीतरी ट्रीटमेंट घ्यायची सोडून मागण्या कसले करतात? किती ओशाळवाणं होत असेल त्यांचा घरच्यांना! एक एक नवीनच फॅड’.  आईबाबांचा प्रत्येक शब्द निखिलला निखाऱ्यासारखे चटके देत होता. ‘अगं फॅड काय? असू शकतात असे लोक. आपल्यासारखी माणसंच असतात तीसुद्धा’, निखिलनं समजवायचा प्रयत्न केला. आई बाबांना ते अर्थातच पटलं नाही.

त्यांच्या मताचा त्रास निखिलला व्हायला कारणही तसंच होतं. तो आता पंचवीस वर्षांचा होता. चांगली भरपूर पगाराची नोकरी होती. पण लग्न मात्र करायला तयार नव्हता. आणि आपण मागच्या दोन लेखात लग्न न करण्याची जी कारणं पहिली त्यातलं कोणतंही कारण नव्हतं त्यासाठी.  तो लग्न करत नव्हता कारण तो ‘गे’ होता.  दिसायला एकदम हँडसम होता निखील. कॉलेजमध्ये असताना एक-दोन मुलींनी त्याला प्रपोजही केलं होतं. पण आत्तापर्यंत कधीच त्याला मुलींविषयी आकर्षण वाटलं नाही. सुरुवातीला तो गोंधळला, घाबरला.  सगळ्यात मोठी भीती ही होती की आईबाबांना कसं सांगायचं? त्याला माहिती होतं त्यांची काय प्रतिक्रिया असणार. ते गडबडतील, स्वत:ला दोष देतील, अविश्वास दाखवतील, उपचारांसाठी डॉक्टरकडे जाण्याचा हट्ट धरतील. त्यांची चूक नव्हती. तो स्वत:सुद्धा नव्हता का गेला याच भावनांमधून? मग हळूहळू त्यानं याविषयी माहिती काढायला सुरुवात केली.

मुळात लैंगिकता ही अतिशय कॉम्प्लेक्स आणि कळायला अवघड गोष्ट आहे. लैंगिकता म्हणजे फक्त जननेंद्रिय किंवा रीप्रॉडक्टीव सिस्टीम किंवा शरीरसंबंध नव्हे तर सेक्स बद्दलच्या भावना, विचार, संस्कार, पूर्वग्रह, वागणूक, िलगभेद वगरे अनेक गोष्टी.  तुमचे जीन्स काय आहेत  यावर तुम्ही आईच्या पोटात वाढत असताना मुलगा म्हणून वाढणार की मुलगी हे ठरतं.   रंगसूत्रं असतील तर मुलगी आणि   रंगसूत्रं असतील तर मुलगा. त्यानंतर हॉर्मोन्स ठरवतात तुमची रीप्रॉडक्टीव सिस्टीम कशी बनणार ते. मेंदूमधल्या किचकट घडामोडी तुम्हाला मनातून स्त्रीसारखं वाटावं की पुरुषासारखं ते ठरवतात. आणि शेवटी तुम्हाला प्रत्यक्षात स्त्री आवडते की पुरुष हेही ठरवतात ते मेंदूमधली केमिकल्स. म्हणजे यातल्या कुठल्याच गोष्टीवर आपलं तसं नियंत्रण नसतं.

आधीच साधा फॉर्म भरताना सेक्स हा शब्द आला तरी दचकतो आपण. एक वेळ यावर भलते जोक्स करू.  पोर्नोग्राफीलाही आपली हरकत नसते. अगदी शाळकरी मुलांपासून ते मध्यमवयीन स्त्री-पुरुषांपर्यंत लोक पोर्नोग्राफी बघत असतात. शिवाय प्राण्यांपासून ते माणसांपर्यंत ही सजीवांची मूलभूत गरज आहे हेही सर्वाना मान्य आहे. असं म्हणतात की सेक्स हा इंटरनेट वरचा सगळ्यात जास्त सर्च केलेला शब्द आहे. पण तरीही त्याची शास्त्रीय माहिती द्यायची म्हटलं की टेन्शन येतं आपल्याला. मग गे, तृतीयपंथी अशांविषयी तर आपण बोलूच धजत नाही. कारण ते बाकी आपल्यासारखेच असले तरी नेमके लंगिक बाबतीत वेगळे असतात.

एखाद्याला जेव्हा ‘गे’ म्हटलं जातं तेव्हा त्यातून अनेक अर्थ निघतात. इंग्लिश मध्ये याला एकच नाव न देता छॅइळद (लेस्बियन, गे, बायसेक्शुअल , ट्रान्सजेन्डर, क्वीअर ) असा नावांचा समूह दिलेला आहे. समलंगिकता हा काही आजार नाही.  त्यामुळे यावर उपचार नाहीत.  पण समुपदेशनानं त्याच्याशी डील करायला सोपं जातं. जगातल्या काही देशांनी आता  समिलगी संबंधांना कायद्यानं मान्यता दिलीय. आपल्या भारतात मात्र अजून हे झालेलं नाही. पण कोंबडी झाकली म्हणून सूर्य उगवायचा रहात नाही. कायदा मानत नाही म्हणून हे संबंध नष्ट झालेले नाहीत. फक्त ते चोरीछुपे करायला लागतायत. त्यामुळे त्यांच्यात एड्स सारख्या आजारांचं प्रमाण जास्त आहे. काही वेळा समाजाच्या, घरच्यांच्या दबावाखाली लग्न करावं लागतं. अर्थातच ही लग्नं म्हणजे एक क्रूर देखावा असतो. नशिबानं हळूहळू का होईना, लोक या गोष्टींचा स्वीकार करताना दिसतायेत, याविषयीचं त्यांचं ज्ञान वाढतंय. नुकतीच आर्यलडचे पंतप्रधान म्हणून एका भारतीय वंशाच्या गे व्यक्तीची निवड झालीय. ग्लोबलायझेशनचा असाही एक फायदा! नवीन येणारे चित्रपट या विषयाची खिल्ली न उडवता त्यावर गंभीरपणे मतं मांडतायेत.

निखिलला काहीतरी निर्णय घ्यायला लागणार आहे आता. लग्न करून एका मुलीचं आणि स्वत:चंही आयुष्य बरबाद करायचं की आईबाबांशी आणि इतरांशी सगळं शेअर करायचं. खूप धाडस गोळा करायला लागेल त्याला, मनानं कणखर व्हायला लागेल. त्याचबरोबर मित्र-मत्रिणींचा, सहकाऱ्यांचा सपोर्टही लागेल. पण मला खात्री आहे की हा सपोर्ट त्याला नक्की मिळेल आणि ते धाडस तो नक्की गोळा करू शकेल.

viva@expressindia.com

मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Youngsters stress issue stress management
First published on: 30-06-2017 at 05:10 IST