१ चमचा बदाम, १चमचा ऑलिव्ह ऑइल, १ चमचा मध हे सर्व एकत्र वाटून घ्यावे. अंघोळीच्या आधी पाच ते सात मिनीटे चेहऱ्याला हे मिश्रण लावून ठेवावे. त्यानंतर कोमट पाण्याने चेहरा धुवावा.
केळ्याचे मास्क
अध्र्या केळ्यामध्ये १ चमचा मध घालावे. हे मिश्रण व्यवस्थित एकजीव करून त्याची पेस्ट बनवावी. हे मास्क किमान १५ मिनिटे चेहऱ्यावर ठेवावे. त्यानंतर कोमट पाण्याने चेहरा धुवावा.
पपईचे मास्कएक वाटी पपईचा गर, एक चमचा ऑलिव्ह ऑइल घ्यावे. पपईचा गर व ऑलिव्ह ऑइल यांचे व्यवस्थित मिश्रण करावे. मिश्रण एकजीव झाल्यावर हे मास्क चेहऱ्यावर लावावे. रात्री झोपताना हे मास्क लावून किमान पंधरा मिनिटं ठेवावे. त्यानंतर चेहरा कोमट पाण्याने धुवावा.
केसांचा मास्क१ अंडे घ्यावे. यामध्ये जोजोबा तेल एक चमचा घालावे. तसेच पाच थेंब इसेन्शिअल सेज तेल घालावे. नंतर रोजमेरी तेल, कोरफड जेल घालून सर्व मिश्रण एकत्रित करावे. त्यानंतर सर्वात शेवटी एक चमचा मधाचा घालावा. वरील सर्व तेल कोमट करूनच घालावीत म्हणजे त्याचा परिणाम अधिक उत्तम होईल. हे मिश्रण एकत्र करून किमान ३ तास केसांना लावून ठेवावे. केसांना उत्तम चकाकी येईल.
हायड्रेटिंग बॉडी स्क्रब३ चमचे ब्राऊन शुगर, ३ चमचे बदाम पावडर, ४०० मिली द्राक्षाच्या बियांचे तेल, १५ थेंब इसेंन्शिअल गुलाब तेल. वरील सर्व मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घ्यावे. हे मिश्रण जाडसर वाटावे. हे बॉडी स्क्रब आपण पूर्ण शरीरावर लावू शकतो. हे आठवडय़ातून एकदा किंवा दोनदा लावावे. अंघोळीच्या आधी लावल्यास अधिक उत्तम. किमान २० मिनिटे शरीरावर ठेवावे.
फायदे- यामुळे त्वचा मऊ होते तसेच शरीर ताजेतवाने राहते. कोरडय़ा त्वचेसाठी हे स्क्रब सर्वात उत्तम आहे.