जिल्ह्य़ाच्या नागरी भागात (शहरी) कुपोषित बालकांचे सर्वाधिक प्रमाण राहुरी, राहाता व संगमनेर शहरात आढळले आहे. नगर शहरातही कुपोषित बालकांची संख्या लक्षणीय आहे. शहरी भागात एकूण कमी वजनांच्या बालकांची २४.३२ टक्क्य़ांवर, तर तीव्र कमी वजनांच्या बालकांची संख्या दीड टक्यांवर गेली आहे.
राज्य सरकारच्या बाल विकास प्रकल्प विभागाने शहरी भागातील अंगणवाडय़ांतून केलेल्या तपासणीत कमी वजनांच्या बालकांची (कुपोषित) ही संख्या आढळली. नागरी भागात नगर महापालिकेसह भिंगार छावणी मंडळ व ८ पालिका क्षेत्रांचा समावेश आहे. नगर शहरात तुलनेने कुपोषणग्रस्त मुलांची संख्या अधिक आहे. नगर शहरात कमी वजनाची १ हजार ८४४ (१२.९६ टक्के), तीव्र कमी वजनाची ७१ (०.४९ टक्के) बालके आढळली.  १४ हजार ४८२ पैकी १४ हजार २२४ बालकांची वजने घेण्यात आली होती. त्यातील १२ हजार २८९ (८६.३९ टक्के) बालके सर्वसाधारण वजनाची होती.
जिल्हा परिषदेकडील ग्रामीण भागातील अंगणवाडय़ांतून ३ लाख ७५ हजार ३३५ बालके आहेत. त्यातील ३ लाख ६९ हजार ९२९ (९८.५६ टक्के) बालकांची वजने घेण्यात आली. त्यात सर्वसाधारण वजनातील बालकांची संख्या ३ लाख ३४ हजार ७३५ (९३.४६ टक्के), कमी वजनांच्या बालकांची संख्या २१ हजार २०० (५.७३ टक्के), तीव्र कमी वजनांच्या बालकांची संख्या २ हजार ९९४ (०.८१ टक्के), सॅम गटातील बालके १ हजार २९६ (०.३५ टक्के) व मॅम गटातील बालके १९६ (०.०५टक्के) आहेत.
नागरी भागातील अंगणवाडय़ा व बालकांच्या आरोग्य नियंत्रणासाठी दोन स्वतंत्र प्रकल्प कार्यरत आहेत. या प्रकल्पांच्या अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार भिंगार- १ हजार ३९६ बालकांपैकी सर्वसाधारण वजन गटातील ९९० (७९ टक्के), कमी वजनाची २३७ (१९ टक्के), तीव्र कमी वजनाची २७ (२.८५ टक्के). कोपरगाव- ३ हजार ९६५ पैकी २ हजार ८५२ सर्वसाधारण (७९ टक्के), कमी वजनाची ६७१ (१९ टक्के), तीव्र कमी वजनाची (२.१९ टक्के), राहुरी- ३३१ पैकी ११५ सर्वसाधारण (४६ टक्के), कमी वजनाची १५३ (५१ टक्के), तीव्र कमी वजनाची १० (३ टक्के). राहाता- ३८५ पैकी २३७ सर्वसाधारण (६२ टक्के), कमी वजनाची १४२ (३७ टक्के), तीव्र कमीची ६ (१.५५ टक्के). संगमनेर-७११पैकी सर्वसाधारणची ४१४ (६६ टक्के), कमी वजनाची २०६ (३३ टक्के), तीव्र कमीची ८ (१.२७ टक्के).
श्रीरामपूर- ३ हजार १९१ पैकी सर्वसाधारणची २ हजार ५०४ (८३ टक्के), कमी वजनाची ४७४ (१५.८ टक्के), तीव्र कमीची २२ (०.७३). देवळाली प्रवरा- ६०५ पैकी सर्वसाधारणची ४९८ (८५.२७ टक्के), तीव्र कमीची ६ (१.०२ टक्के). पाथर्डी-२०१ पैकी सर्वसाधारणची १४३ (७६ टक्के), कमी वजनाची ४५ (२३.९३ टक्के), तीव्र कमीचे एकही नाही. श्रीगोंदे-४१४ पैकी सर्वसाधारणची ३२१ (८१.२६ टक्के), कमी वजनाची ६० (१५.१८ टक्के), तीव्र कमीचे ४ (१.०१ टक्के).