आंध्र प्रदेशातील साईभक्त व एसव्हीआर या प्रवासी यात्रा कंपनीचे मालक सुभाषचंद्र बोस यांनी आज २३ लाख रुपये किमतीचा ७०० ग्रॅम वजनाचा सोन्याचा मुकुट साईबाबांच्या चरणी अर्पण केला.
गेल्या वीस वर्षांपासून आंध्र प्रदेश ते शिर्डी अशी प्रवासी बससेवा ते देतात. व्यवसायाच्या या द्वीदशकपूर्तीबद्दल त्यांनी हा मुकुट अर्पण केला. त्यांच्यासमवेत पत्नी लक्ष्मी व अन्य कुटुंबीय होते. या वेळी राजेंद्र विखे, माजी नगराध्यक्ष कैलास कोते, विजय जगताप उपस्थित होते.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on June 12, 2013 1:30 am