News Flash

लक्ष्मण पांढरे यांना आदर्श सचिव पुरस्कार

लक्ष्मण भीमराव पांढरे यांना नुकताच कोल्हापूर येथील ए. एस. प्रतिष्ठानच्या राज्यस्तरीय सचिव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

| April 21, 2013 01:48 am

पंढरपूर येथील कर्मयोगी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित पंढरपूर या संस्थेचे सचिव लक्ष्मण भीमराव पांढरे यांना नुकताच कोल्हापूर येथील ए. एस. प्रतिष्ठानच्या राज्यस्तरीय सचिव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
सहकार चळवळीत महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या संस्थाचे सचिव यांना पुढील काळात अधिकाधिक प्रोत्साहन मिळावे व सहकार चळवळीस बळकटीकरण प्राप्त व्हावे, या उद्देशाने ए. एस. प्रतिष्ठान कोल्हापूर यांच्या वतीने नुकतेच कोल्हापूर येथे ‘राज्यस्तरीय आदर्श सचिव’ पुरस्कार सोहळा संपन्न झाला असून त्यामध्ये पंढरपूर येथील संस्थापक उमेशराव परिचारक यांच्या कर्मयोगी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित पंढरपूर या पतसंस्थेचे सचिव लक्ष्मण भीमराव पांढरे यांना सन्मानपूर्वक राज्यस्तरीय ‘आदर्श सचिव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.
लक्ष्मण पांढरे हे मूळचे वाखरी, ता. पंढरपूर येथील असून ते कर्मयोगी पतसंस्थेत ५ मे २००४ पासून कार्यरत आहेत व एप्रिल २००९ पासून ते सचिव या पदी कार्यरत असून त्यांच्या कार्यकालात संस्थेने उल्लेखनीय प्रगती केली असून संस्थेस स्थापनेपासून मिळणाऱ्या ऑडीट वर्ग ‘अ’ ची परंपरा कायम राखली असून ‘आंतरराष्ट्रीय सहकार वर्षे २०१२’ निमित्ताने महाराष्ट्र शासनाच्या सहकार व पणन विभागाच्या वतीने दिला जाणारा मानाचा ‘सहकारनिष्ठ पुरस्कार’  कर्मयोगी पतसंस्थेस प्राप्त झाला असून नुकतेच सोलापूर जिल्हा सहकार बोर्ड व कर्मयोगी पतसंस्था यांच्या संयुक्त विद्यमाने पंढरपूर तालुक्यातील नागरी/ ग्रामीण बिगशेती/ सेवकांच्या सहकारी पतसंस्थाचे कर्मचारी यांच्याकरीता शासनाच्या ९७ व्या घटना दुरुस्तीस अनुसरून दि. पंढरपूर अर्बन बँकेच्या ‘कर्मयोगी सभागृहात’ प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 21, 2013 1:48 am

Web Title: aadarsha sachiv reward to laxman pandhare
Next Stories
1 युनियन बँकेत माहिती अधिकाराचे तीनतेरा
2 सांगोला तालुक्यातील यंदाचा दुष्काळ शेवटचा ठरावा- आर. आर.
3 जावयाच्या अंत्यविधीसाठी जाताना जीपला अपघात; सासू-सासऱ्यासह चार ठार
Just Now!
X