चौदा वर्षे वयाच्या विद्यार्थिनीला शाळा सुटल्यानंतर उचलून नेऊन उसाच्या शेतात अत्याचार केल्याची घटना घोगरगाव शिवारात घडली. अत्याचार करणाऱ्या गणेश दिलीप घोगरे या नराधमास पोलिसांनी अटक केली असून, त्याला दि. ४ डिसेंबपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
बाजारठाण (ता. वैजापूर) येथील १४ वर्षे वयाची मुलगी दररोज कमालपूर येथे शाळेत येते. शनिवारी शाळा सुटल्यानंतर गणेश घोगरे हा दुचाकीवर आला. त्याने या मुलीला मला श्रीरामपुरात नोकरी आहे. बँकेत पैसे आहेत, साडेसात एकर जमीन आहे, तू माझ्या बरोबर चल, मी तुझ्याबरोबर लग्न करीन असे म्हणत तिला बळजबरीने दुचाकीवर उचलून बसविले. नंतर घोगरगाव शिवारात उसाच्या शेतात नेऊन तिच्यावर अत्याचार केले.
भेदरलेल्या या तरुणीने आपल्या आईला घटनेची माहिती दिली. बेअब्रू नको म्हणून फिर्याद देण्यास विलंब झाला. पण नातेवाइकांना घटना कळताच त्यांनी फिर्याद देण्यास राजी केले. अत्याचारित मुलीच्या आईने गुरुवारी तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी गणेश घोगरे याच्या विरुद्ध बलात्कार, अपहरण, बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायदा आदी कलमान्वये गुन्हा नोंदविला. घोगरे यास अटक करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक कैलास फुंडकर हे करत आहेत.
कारेगाव येथे २५ वर्षे वयाच्या विवाहित तरुणीचा विनयभंग केल्याच्या आरोपावरून पोलिसांनी भैरवनाथ देवराव पवार, सतीश बबन आसने, देवराव सूर्यभान पवार यांच्या विरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on November 29, 2013 1:58 am