शॉपिंगप्रेमी लोकांना खरेदीसाठी कोणत्याही कारणाची गरज नसते. पण सध्या नव्या वर्षांच्या स्वागताची जय्यत तयारी घराघरात सुरू झाली आहे. त्यामुळे त्यात शॉपिंग करणे पर्यायाने येणारच. या खरेदीचे औचित्य ‘लोकसत्ता’ने आपल्या वाचकांना उपलब्ध करून दिले आहे. खरेदीचा आनंद आणि त्याच्याबरोबर येणाऱ्या ‘सरप्राइज’ भरघोस बक्षिसांची लयलूट अशी सुवर्णसंधी ‘लोकसत्ता’ने १९ डिसेंबर ते ४ जानेवारी दरम्यान आयोजित केलेल्या ‘मुंबई शॉपिंग फेस्टिव्हल’च्या निमित्ताने वाचकांना मिळाली आहे. गेल्या काही दिवसांपासून रसिकांचे लाडके कलाकार या ‘शॉपिंग फेस्टिव्हल’निमित्त दुकानांना भेटी देत आहेत. रविवारी या फेस्टिव्हलला भेट देण्यासाठी आणि बक्षीस वितरण सोहळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी मराठीतील प्रसिद्ध अभिनेता अनिकेत विश्वासराव याने अंधेरी आणि गोरेगावमधील दुकानांना भेट दिली.
अंधेरीमधील ‘द रेमण्ड्स’ आणि गोरेगावमधील ‘एस.एम.ऑटो’मध्ये रविवार दुपारी गर्दी जमली होती, ती लाडका अभिनेता अनिकेत विश्वासराव याच्या स्वागतासाठी. इथे मुंबई शॉपिंग फेस्टिव्हलचे विजेतेसुद्धा अनिकेतची आतुरतेने वाट पाहत होते. २३, २४, २५ डिसेंबरच्या विजेत्यांना अनिकेतच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली.
‘रिजन्सी ग्रुप’ हे या मुंबई शॉपिंग फेस्टिव्हलचे मुख्य प्रायोजक आहेत. त्याशिवाय ‘जनकल्याण सहकारी बँक लिमिटेड’ हे या फेस्टिव्हलचे सहप्रायोजक आहेत. ‘रेमंड शॉप’ हे ‘स्टायलिंग पार्टनर’, अंजली मुखर्जी यांचे हेल्थ टोटल हे ‘हेल्थ पार्टनर’, लागूबंधू आणि वामन हरी पेठे ‘प्लॅटिनम पार्टनर’ असतील. अपना बाजार, पितांबरी आणि दादर येथील पानेरी यांच्या सहकार्याने हा महोत्सव होत आहे. वीणा वर्ल्ड हे ‘ट्रॅव्हल पार्टनर’ आहेत. स्लीम अ‍ॅण्ड स्लेंडर ‘वेल बीइंग पार्टनर’ म्हणून आहेत. त्याशिवाय टोटल स्पोर्ट्स, केम्ब्रिज रेडीमेड्स – कुलाबा, राणेज् पर्सेस, रेन्बो गारमेंट्स, रोनाल्ड फूड प्रोसेसर, विधी ज्वेलर्स, अतुल इलेक्ट्रॉनिक्स, सारी पॅलेस, परफेक्ट ऑप्टिक्स हे ‘गिफ्ट पार्टनर्स’ आहेत. या सर्वासोबतच ‘महिंद्रा गस्टो’ची टेस्ट राइड करणाऱ्यांनाही बक्षिसे मिळवण्याच्या सुवर्णसंधीचा लाभ मिळवता येईल. ‘महिंद्रा गस्टो’ हे या फेस्टिव्हलचे ‘टेस्ट राइड पार्टनर’ आहेत.
तरुणांची लाडकी नायिका स्पृहा जोशी हिची हजेरी
‘एका लग्नाची तिसरी गोष्ट’, ‘उंच माझा झोका’ अशा मालिकांमधून घराघरांत पोहोचलेली प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री स्पृहा जोशी ‘मुंबई शॉपिंग फेस्टिव्हल’निमित्त मंगळवार ३० डिसेंबर रोजी माहीमच्या ‘वीणा वर्ल्ड’, ‘राणेज पर्सेस’ आणि ‘आर्ट व्हय़ू’ या दुकानांना भेट देणार आहे. तिच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिके देऊन गौरवण्यात येईल.
‘मुंबई शॉपिंग फेस्टिव्हल’च्या २६ डिसेंबरच्या विजेत्यांची नावे
विद्या पंडित(विलेपार्ले), विनायक कर्णिक(दादर), गौतमी भाटे (दादर), नारायण शिंदे (दादर), तुकाराम पवार (परेल), साक्षी शेट्टी (दादर), धनश्री परब (अंधेरी), मानसी भाटे.