25 September 2020

News Flash

बनावट जात प्रमाणपत्र प्रकरण ; भाजप नगरसेविकेविरोधात गुन्हा

ठाणे महापालिका सार्वत्रिक निवडणुकीत कोपरी येथील प्रभाग क्रमांक ५१ मधून भाजपच्या तिकीटावर निवडून आलेल्या नगरसेविका चांदणी भरत दुराणी यांनी बनावट जात प्रमाणपत्र सादर केल्याप्रकरणी ठाणे

| December 19, 2012 03:20 am

ठाणे महापालिका सार्वत्रिक निवडणुकीत कोपरी येथील प्रभाग क्रमांक ५१ मधून भाजपच्या तिकीटावर निवडून आलेल्या नगरसेविका चांदणी भरत दुराणी यांनी बनावट जात प्रमाणपत्र सादर केल्याप्रकरणी ठाणे नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत चांदणी दुराणी यांच्याविरोधात काँग्रेसच्या तिकीटावर अ‍ॅड अरुणा भुजबळ यांनी निवडणूक लढविली होती. निवडणुकीनंतर भुजबळ यांनी दुराणी यांच्या जात प्रमाणपत्राला उच्च न्यायालयात आव्हान दिले होते.  दरम्यान, न्यायालयाने व कोकण विभागीय जात पडताळणी समितीने दुराणी यांचे जात प्रमाणपत्र नुकतेच अवैध ठरविले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 19, 2012 3:20 am

Web Title: bogus cast certificate matter crime against bjp corporator
टॅग Bjp,Corporator
Next Stories
1 विनयभंगातील आरोपींचे चोचले पुरविले तर शिवसेना स्टाईलने आंदोलन
2 डोंबिवलीतील पाणीटंचाईवर अतिरिक्त पंपाचा उतारा
3 रुक्मिणीबाई रुग्णालयावर शिवसेनेचा मोर्चा
Just Now!
X