नफा मिळवणे हाच ‘एसआरए’ योजनेचा पाया असून मुंबईच्या तुलनेत पुण्यात जागांचा भाव कमी आहे. त्यामुळे या ठिकाणी अशा प्रकल्पांसाठी ‘बिल्डर लॉबी’ फारशी उत्सुक नाही, अशी टिप्पणी काँग्रेसचे प्रदेश झोपडपट्टी सेल सरचिटणीस अिजक्य जगताप यांनी चिंचवड येथे पत्रकारांशी बोलताना केली.
जगताप म्हणाले, ‘एसआरए’ मध्ये फायदा होत नसल्याने या योजनेसाठी बिल्डर इच्छुक नाहीत. सरकारने अडीच वाढीव चटई निर्देशांक दिला. मात्र, बिल्डरांची ३.३ चटई निर्देशांकाची मागणी आहे. देशातील प्रत्येक नागरिकाला घर मिळाले पाहिजे, अशी काँग्रेस पक्षाची भूमिका आहे. त्यासाठी देशभरात ७० लाख घरे बांधण्यात येणार आहेत. या कामासाठी हजारो कोटींची तरतूद सरकाकडून करण्यात आली आहे. िपपरीतही राजीव गांधी आवाज योजनेत असे प्रकल्प राबवण्यात येणार आहे. राज्यात २० टक्के नागरिक झोपडपट्टीत राहतात. त्यासाठी १६ कलमी कार्यक्रम काँग्रेसने आखला आहे. ३० रुपयात ३० हजाराचा विमा काढण्यात येणार आहे. या योजनांमध्ये महिला व युवकांना जादा प्राधान्य मिळणार आहे, असे ते म्हणाले.