जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना राज्य आणि केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांकडे वळावे या उद्देशाने महाविद्यालयांनी पुढाकार घेऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी कार्यशाळा आणि सराव परीक्षांचे आयोजन करा, असे आदेश मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण विभागाने केले आहे.
मुंबई विद्यापीठामध्ये स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनासाठी स्वतंत्र केंद्र उभारण्यात आले आहे. या केंद्राच्या माध्यमातून लोकसवा आयोगाच्या परीक्षांना बसणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जाते. पण ज्या विद्यार्थ्यांना या परीक्षा द्यायच्या आहेत. तेच विद्यार्थी या संस्थेत येतात आणि मार्गदर्शन घेतात. पण अनेक विद्यार्थ्यांना इच्छा असते पण मार्ग दिसत नाही अशा विद्यार्थ्यांपर्यंत आपण पोहोचून त्यांना स्पर्धा परीक्षांसाठी तयार करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम हाती घेण्यात आल्याचे विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक डॉ. मृदुल निळे यांनी स्पष्ट केले. विद्यापीठाने प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकानुसार महाविद्यालयांनी फेब्रुवारी ते मार्च या महिन्यांमध्ये किमान एक मार्गदर्शन कार्यशाळा याचबरोबर एक सराव परीक्षा आयोजित करावी. याहीपेक्षा जास्त कार्यक्रमांचे आयोजन महाविद्यालयात करता येऊ शकतात असेही परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच हे कार्यक्रम आयोजित करण्यासाठी विद्यापीठातील केंद्रासोबतच इतर कोणत्या संस्थांची मदत घेता येऊ शकेल याचा तपशीलही विद्यापीठाने परिपत्रकात दिला आहे. विद्यापीठाच्या या परिपत्रकाचे काही महाविद्यालयांनी स्वागत केले आहे तर काहींना प्रात्यक्षिक, मौखिक परीक्षांच्या धकाधकीत कार्यक्रमाचे हे आयोजन करणे अवघड असल्याने याबाबत नाराजी व्यक्त केली आहे.
विद्यापीठ अनुदान
आयोगाची मदत घ्या
विद्यापीठ अनुदान आयोगातर्फे स्पर्धा परीक्षांना मार्गदर्शन करण्यासाठी विशेष निधी उपलब्ध