पुनर्वसनात गेलेली दोन एकर जमीन पुन्हा खरेदी करून नांगरण्याच्या कारणावरून भावकीत वाद झाला. या वादाचे पर्यवसान एकाच्या हत्येत झाले. मोहोळ तालुक्यातील गोटेवाडी येथे ही घटना घडली. याप्रकरणी दोन महिलांसह सातजणांविरुद्ध मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
मारुती भुजंग शेळके (वय ५०) असे खून झालेल्या शेतक-याचे नाव आहे. याप्रकरणी त्यांचा चुलत भाऊ नागनाथ शिवा शेळके याच्यासह त्याचा मुले तानाजी नागनाथ शेळके, दाजी सत्यवान शेळके, त्याचा भाऊ रवि शेळके, त्याचे वडील सत्यवान शेळके, वंदना तानाजी शेळके व अनिता शेळके यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. गोटेवाडी येथे शेळके कुटुंबीयांची दोन एकर जमीन पुनर्वसनासाठी शासनाने संपादित करून दुस-याला दिली होती. परंतु सदर जमीन मृत मारुती शेळके यांनी पुन्हा खरेदी करून त्यात नांगरणी सुरू होती. परंतु ही जमीन कोणाला विचारून खरेदी केली, असा जाब विचारत त्यांचा चुलत भाऊ तानाजी शेळके व इतरांनी सुरा, काठय़ांनी केलेल्या हल्ल्यात मारुती शेळके याचा मृत्यू झाला, तर रामचंद्र मितप्पा शेळके व एकनाथ शेळके हे जखमी झाले.
पिस्तूल व काडतुसे जप्त
जुळे सोलापुरात आर्यचाणक्य नगरात राहणा-या बाबूराव ऊर्फ गणेश भीमराव सिन्नूर (वय २२) याच्याकडून शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी एक गावठी पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे हस्तगत केली. सिन्नूर हा मूळचा कर्नाटकातील मादनहळ्ळी (ता. सिंदगी, जि. विजापूर)येथील रहिवासी आहे. त्याने हे पिस्तूल व काडतुसे कोणाकडून व कशासाठी आणले, याचा तपास गुन्हे शाखेचे पोलीस करीत आहेत.

chhota rajan marathi news, 213 burglary marathi news
कुख्यात डॉन छोटा राजनच्या घरासह, २१३ घरफोड्या करणाऱ्यास अटक
Smuggling of liquor from Goa by vehicle stuff of worth 61 lakh seized
वाहनातून गोव्यातील मद्यसाठ्याची तस्करी, ६१ लाखाचा मुद्देमाल जप्त
Loksatta chavdi happening in Maharashtra politics news on Maharashtra political crisis
चावडी: नाना अन् तात्याचे पारावर उपोषण!
three workers died due to electric shock
अंबरनाथ: विजेच्या धक्क्याने तीन कामगारांचा मृत्यू, जांभूळ जल शुद्धीकरण केंद्रातील घटना