News Flash

आरोपींना अटक करण्याची मागणी

हेमंत गायकवाड खूनप्रकरणातील आरोपींना अटक करावी अशी मागणी बुधवारी नगरसेवक राजाराम गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली सुमारे शंभराहून अधिक समर्थकांनी पोलीस अधीक्षक डॉ. विजयसिंह जाधव यांच्याकडे केली.

| May 30, 2013 02:00 am

आरोपींना अटक करण्याची मागणी

हेमंत गायकवाड खूनप्रकरणातील आरोपींना अटक करावी अशी मागणी बुधवारी नगरसेवक राजाराम गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली सुमारे शंभराहून अधिक समर्थकांनी पोलीस अधीक्षक डॉ. विजयसिंह जाधव यांच्याकडे केली. खून होऊन आठवडा लोटला तरी आरोपींना पकडले जात नाही, पोलिसांचा तपास गांभीर्यपूर्वक सुरू नाही असा आरोप शिष्टमंडळाने केला. त्यावर डॉ. जाधव यांनी पोलीस पथके रवाना झाली असून तपास रीतसर सुरू असल्याचे सांगितले. मात्र त्यावर समाधान न झालेल्या कार्यकर्त्यांनी तपास सुरू आहे तर आरोपी हाती का लागले नाहीत असा उलटा सवाल केला. गायकवाड यांच्या समर्थकांनी तपासावरून संतप्त भावना व्यक्त केल्या. शिष्टमंडळात संगीता सोनुले, रोहिणी गायकवाड, कांचन माले, सुनीता काळे, आक्काताई मोरे, रेखा सोनुले आदींचा समावेश होता.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 30, 2013 2:00 am

Web Title: demand arrest of accused
टॅग : Arrest,Demand
Next Stories
1 सोलापुरात माकपच्या जेलभरो आंदोलनात आडम मास्तरांसह पाचशे कार्यकर्ते अटकेत
2 पालकमंत्री पाटील यांच्यातर्फे अनेक प्रश्न मार्गी- हसन मुश्रीफ
3 खूनप्रकरणी आरोपींना जन्मठेपेची शिक्षा
Just Now!
X