राष्ट्रीय रोजगार हमी कायद्याने मागेल त्या शेतक ऱ्याला त्वरित शेततळे मंजूर करण्याचे निर्देश कृषिमंत्री राधाकृष्ण विखे यांनी दिले. मराठवाडा महसूल प्रशिक्षण प्रबोधिनीत खरीप हंगाम पूर्वतयारी चर्चासत्राच्या उद्घाटनप्रसंगी विखे बोलत होते. आमदार अब्दुल सत्तार, कृषी आयुक्त उमाकांत दांगट, विभागीय आयुक्त संजीव जयस्वाल, जिल्हाधिकारी विक्रम कुमार आदींची उपस्थिती होती. राज्याच्या अनेक भागात टंचाई स्थिती आहे. हवामान बदलाचे परिणाम शेतीच्या विविध घटकांवर होत आहेत. पीकपद्धतीही बदलते आहे, या पाश्र्वभूमीवर कृषी विभागाने अधिक दर्जेदार काम करावे. बियाणे वाटपाची माहिती पारदर्शकपणे शेतक ऱ्यांना द्यावी. तसेच खते कमी वापरावीत हा संदेश शेतक ऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचे गरज असल्याचे सांगत, राष्ट्रीय रोजगार हमी योजनेतून तातडीने शेततळी मंजूर करा, असे विखे यांनी सांगितले. खरीप हंगामासाठी सुमारे २४९ कोटी रुपये पीककर्जाचे नियोजन केले असल्याचे सांगण्यात आले. बांधावर खतवाटपाचे नियोजन असून ४६ हजार ३५० मेट्रीक टन खतवाटप केले जाणार आहे.