कळवण व देवळा भागात अलीकडेच वादळ व गारांसह झालेल्या पावसामुळे शेतमालाचे नुकसान झाले असले तरी प्रशासकीय यंत्रणेकडे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची आकडेवारी उपलब्ध नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. भरपाई त्वरित मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांनी तापी पाटबंधारे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष आ. ए. टी. पवार, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा जयश्री पवार यांच्याकडे केली आहे.
कळवण तालुक्यातील पिळकोस, बगडू, मादवण तर, देवळा तालुक्यातील खामखेडा परिसरात झालेल्या पावसामुळे शेतातच असलेला शेतीमाल भिजून त्यांचे नुकसान झाले.  नुकसानग्रस्त शेतकऱ्यांमध्ये पोल्ट्री व्यावसायिक, ग्रीन हाऊस आदींचाही समावेश आहे.