News Flash

यशासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा हवी -बाबासाहेब जाधव

होमगार्डचे कार्य खूप मोठे आहे. अडचणी, समस्यांना तोंड देण्याची क्षमता त्यांच्यात आहे. जीवनात यशस्वी होण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणे जरुरी आहे, असे प्रतिपादन वीज वितरण कंपनीचे

| April 12, 2013 03:56 am

होमगार्डचे कार्य खूप मोठे आहे. अडचणी, समस्यांना तोंड देण्याची क्षमता त्यांच्यात आहे. जीवनात यशस्वी होण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणे जरुरी आहे, असे प्रतिपादन वीज वितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता बाबासाहेब जाधव यांनी केले.
जिल्हा प्रशिक्षण केंद्र वडगाव रोड येथे शहरी होमगार्ड प्राथमिक प्रशिक्षण शिबिराच्या समारोपीय कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा समादेशक डॉ. सुशील बत्तलवार होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून शिबीर प्रमुख प्रदीपसिंग नन्नरे, समापदेशक अधिकारी ज्ञानेश्वर खासरे, पलटण नायक रमेश वानखडे, सामुग्री प्रबंधक अविनाश यादव उपस्थित होते. बाबासाहेब जाधव म्हणाले की, या संपूर्ण परिसराची आपण पाहणी केली आहे. शिबिरातील शिस्त पाहून भारावून गेलो. जीवनातील अनुभव कथन करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे उदाहरण त्यांनी दिले. प्रशिक्षणातून जे मिळाले ती शिदोरी सोबत ठेवून इतरांना घडवण्याचे आवाहन त्यांनी याप्रसंगी केले. डॉ. सुशील बत्तलवार यांनी जिल्हाभर राबवलेल्या उपक्रमांची माहिती यावेळी दिली. कार्यक्रमाचे संचालन समादेशक अधिकारी ज्ञानेश्वर खासरे यांनी, तर आभार अविनाश यादव यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिवशंकर बेमारकर, जितेंद्र गिरी, निरंजन मलकापुरे आदींनी पुढाकार घेतला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 12, 2013 3:56 am

Web Title: excess try needed for success babasaheb jadhav
Next Stories
1 गुढीपाडव्याच्या निमित्ताने बाजारपेठा ‘हाऊसफुल्ल’
2 वृंदावन टाऊनशिपमध्ये बुकिंगवर आकर्षक सूट
3 प्रदेशाध्यक्षपदाच्या शर्यतीत देवेंद्र फडणवीस आघाडीवर?
Just Now!
X