मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागावर प्रवाशांच्या सुविधांसाठी सिकंदराबाद-लोकमान्य टिळक टर्मिनस साप्ताहिक सुपरफास्ट विशेष गाडी येत्या ३ फेब्रुवारीपासून धावणार आहे.
सिकंदराबाद-लोकमान्य टिळक टर्मिनस सुपरफास्ट विशेष गाडी (क्र. ०२७७०१) ३ फेब्रुवारी ते २४ फेब्रुवारीपर्यंत प्रत्येक रविवारी सिकंदराबाद येथून रात्री दहा वाजता सुटणार आहे. बेगमपेठ, सेरम, वाडीमार्गे सोलापूरला रात्री १२.४५ वाजता पोहोचेल व नंतर पुणेमार्गे लोकमान्य टिळक टर्मिनसला दुसऱ्या सकाळी ११.०५ वाजता पोहोचणार आहे. तर दि. ४ ते २५ फेब्रुवारीपर्यंत परतीच्या प्रवासात ही गाडी (क्र. ०२७७०२) लोकमान्य टिळक टर्मिनसवरून प्रत्येक सोमवारी रात्री ११.०५ वाजता सुटणार असून पुणेमार्गे सोलापुरात दुसऱ्या दिवशी पहाटे ५.५६ वाजता येऊन नंतर वाडी, सेरम, बेगमपेठमार्गे सिकंदराबादला सकाळी ११.०५ वाजता पोहोचणार आहे. या गाडीला १४ कोचेस राहणार आहेत.