News Flash

दारूस पैसे न दिल्याने मित्राचा खून

दारूपिण्यास पसे दिले नाहीत म्हणून रागापोटी मित्राचा कुऱ्हाडीने वार करुन खून करण्याचा प्रकार मंगळवारी पहाटे मिरजेच्या संजयनगर झोडपपट्टीत घडला.

| October 1, 2013 01:52 am

दारू पिण्यास पैसे दिले नाहीत म्हणून रागापोटी मित्राचा कुऱ्हाडीने वार करून खून करण्याचा प्रकार मंगळवारी पहाटे मिरजेच्या संजयनगर झोडपपट्टीत घडला.
परशुराम रोहिदास कट्टीमनी (वय २१) हा दुर्गामाता विसर्जन मिरवणूक पाहून घरी परतत असताना नवजीवन कॉलनीत दबा धरुन बसलेल्या जितेंद्र ऊर्फ प्रदीप दिलीप तायडे (वय २१) याने डोक्यात व गळ्यावर कुऱ्हाडीने वार केले. त्यात तो जागीच ठार झाला. ही घटना रात्री १ वाजता घडली.
घटना समजताच पोलिसांनी तत्काळ हालचाली करुन आरोपी जितेंद्र तायडे याला हत्यारासह पहाटे ५ वाजता ईदगाह माळ येथे अटक केली. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 1, 2013 1:52 am

Web Title: friends murder to not giving money for virgin
टॅग : Money
Next Stories
1 लोकप्रतिनिधींचा जिल्हा विभाजनाला पाठिंबा
2 संजीवनी कारखान्यास शंकरराव कोल्हे यांचे नाव
3 गोशाळेत पकडलेला अजगर निसर्गात मुक्त
Just Now!
X