News Flash

महात्मा गांधी विद्यामंदिरतर्फे व्यंकटराव हिरे यांना अभिवादन

महात्मा गांधी विद्यामंदिर संचालित महाविद्यालयांमध्ये लोकनेते व्यंकटराव हिरे यांना ८४ व्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांद्वारे अभिवादन करण्यात आले. व्यंकटरावांच्या जीवनकार्याविषयी मान्यवरांनी माहिती देऊन त्यांचा आदर्श घ्यावा

| April 26, 2013 02:45 am

महात्मा गांधी विद्यामंदिर संचालित महाविद्यालयांमध्ये लोकनेते व्यंकटराव हिरे यांना ८४ व्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांद्वारे अभिवादन करण्यात आले. व्यंकटरावांच्या जीवनकार्याविषयी मान्यवरांनी माहिती देऊन त्यांचा आदर्श घ्यावा असे आवाहन केले.
पंचवटी महाविद्यालय
पंचवटीतील महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेच्या प्रांगणात व्यंकटरावांच्या समाधीस्थळी पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली. संस्थेचे विश्वस्त प्राचार्य डॉ. व्ही. एस. मोरे यांनी मार्गदर्शन केले. व्यंकटराव हिरे यांनी सर्वसामान्यांना नेहमीच न्याय देण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले.
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. एस. जगदाळे, उपप्राचार्य डॉ. आर. पी. भामरे, उपप्राचार्य डॉ. नंदू पवार, डॉ. ए. व्ही. पाटील आदी उपस्थित होते.
हॉटेल मॅनेजमेंट महाविद्यालय
पंचवटीतील हॉटेल मॅनेजमेंट अ‍ॅण्ड केटरिंग टेक्नॉलॉजी महाविद्यालयात प्राचार्य वैकुंठ चोपडे यांच्या हस्ते व्यंकटरावांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. हिरे यांनी अतिशय कमी कालावधीत सर्वसामान्यांच्या उत्थानासाठी कार्य केल्याचे प्राचार्य चोपडे यांनी नमूद केले.
यावेळी उपप्राचार्य चेतन बागूल, प्रा. नितीन बागूल, प्रा. अंजली पावगी, प्रा. प्रवीण शेगावकर आदी उपस्थित होते.
औषधनिर्माण शास्त्र महाविद्यालय
महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेच्या औषधनिर्माण शास्त्र महाविद्यालयात प्राचार्य डॉ. आर. एस. भांबर यांच्या हस्ते व्यंकटरावांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.
महात्मा गांधी विद्यामंदिर तसेच आदिवासी सेवा समिती या दोन्ही संस्थांचे कार्य वाढविण्यासाठी व्यंकटरावांनी अविरत प्रयत्न केले. त्यामुळेच सर्वसामान्यांना शिक्षण घेता आले, असे प्राचार्य डॉ. भांबर यांनी नमूद केले.
 याप्रसंगी उपप्राचार्य प्रा. एस. के. महाजन, प्रा. ए. आर. रोटे, कार्यालयीन अधीक्षकांसह शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
हिरे महाविद्यालय
लोकनेते व्यंकटराव हिरे महाविद्यालयात प्राचार्य डॉ. बी. एस. जगदाळे यांच्या उपस्थितीत श्रद्धांजली वाहण्यात आली. लोकनेत्यांचे जीवन अतिशय साधे होते. शेतकरी आणि पददलितांच्या कल्याणासाठी त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण ठरले, असे मत प्राचार्य जगदाळे यांनी व्यक्त केले.
उपप्राचार्य डॉ. आर. पी. भामरे यांनी हिरे यांच्या स्मृतींना उजाळा देत त्यांच्या कार्याविषयी माहिती दिली. यावेळी उपप्राचार्य डॉ. ए. व्ही. पाटील, उपप्राचार्य डॉ. नंदू पवार आदी उपस्थित होते.
दंत महाविद्यालय
महात्मा गांधी विद्यामंदिरच्या दंत महाविद्यालय सभागृहात प्राचार्य डॉ. संजय भावसार यांच्या हस्ते व्यंकटरावांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
व्यंकटराव हिरे यांनी लोकप्रतिनिधी म्हणून केलेले कार्य विसरता न येण्यासारखे आहे, असे डॉ. भावसार यांनी सांगितले.
यावेळी डॉ. जी. एल. प्रदीप, कुलसचिव मिलिंद पाटील आदी उपस्थित होते.
व्यवस्थापन व संशोधन महाविद्यालय
व्यवस्थापन व संशोधन (एमबीए) महाविद्यालयात संचालक डॉ. व्ही. एस. मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम झाला.
लोकनेते व्यंकटराव हिरे यांनी सहकार, शैक्षणिक, सामाजिक आदी क्षेत्रात मोलाचे कार्य केलेले असल्यामुळे असा नेता होणे नाही, अशा शब्दांत डॉ. मोरे यांनी श्रद्धांजली वाहिली. यावेळी प्रा. प्रशांत सूर्यवंशी, डॉ. रुपाली खैरे, डॉ. जे. व्ही. भालेराव, डॉ. आशुतोष मोरे आदी उपस्थित होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 26, 2013 2:45 am

Web Title: grat bow to vyankatrao hire by mahatma gandhi vidyamandir
Next Stories
1 मनसे शिक्षक आघाडीची आज सहविचार सभा
2 उड्डाण पुलालगतच्या रस्त्यावर ‘सिग्नल’ची मागणी
3 सूर हरविलेल्या शिवसेनेसाठी संवाद दौरा
Just Now!
X