News Flash

हॉटेल्स, कॅटरिंग व्यवसायात जळाऊ लाकडांचा सर्रास वापर

केंद्र सरकारने गॅस सिलिंडरची सबसिडी कमी करून वापरावर मर्यादा आणल्यानंतर कमर्शियल गॅस सिलिंडरचे भाव गगनाला पोहोचल्याने कॅटरिंग व्यावसायिकांना आता जळाऊ लाकडांचा वापर सुरू केला आहे.

| January 22, 2013 03:48 am

केंद्र सरकारने गॅस सिलिंडरची सबसिडी कमी करून वापरावर मर्यादा आणल्यानंतर कमर्शियल गॅस सिलिंडरचे भाव गगनाला पोहोचल्याने कॅटरिंग व्यावसायिकांना आता जळाऊ लाकडांचा वापर सुरू केला आहे. नागपुरातील बहुतांश मंगल कार्यालये, हॉटेल्स आणि रेस्टारंटमध्ये आणि खाजगी कार्यक्रमांसाठीचे कंत्राट घेणारे कॅटर्स १९५० रुपयांचे महागडे कमर्शियल सिलिंडर खरेदी करणे परवडत नसल्याने स्वस्तात मिळणाऱ्या जळाऊ लाकडांचा वापर करीत आहेत. यावर पर्यावरणवाद्यांनी अत्यंत तीव्र चिंता व्यक्त केली आहे. लाकडांचा वापर वाढल्यास जंगलतोडीचे प्रमाण वाढेल, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी जंगलतोड रोखणे आवश्यक असताना सिलिंडरच्या किंमती अचानक वाढविण्यात आल्याने कॅटरिंग आणि हॉटेल व्यावसायिकांची पंचाईत झाली आहे. कमर्शियल गॅस सिलिंडरवर कोणतीही मर्यादा घालण्यात आली नसली तरी त्याची किंमत तब्बल १९५० रुपये करण्यात आली आहे. एवढी रक्कम मोजून व्यावसायिक स्पर्धेत नफा मिळवणे अत्यंत कठीण झाले आहे. त्यामुळे
ज्येष्ठ हॉटेल व्यावसायिक धनंजय देवधर म्हणाले, सिलिंडरच्या किंमती वाढविण्याचा निर्णय घेण्यापूर्वी त्याचे दूरगामी परिणाम तपासून पाहण्याची आवश्यकता होती. कॅटरिंग आणि हॉटेल व्यवसायात तर पुन्हा जळाऊ लाकडांचा वापर वाढला तर जंगलतोड मोठय़ा प्रमाणावर होण्याची भीती आहे. लाकडांची चोरटी आयातही वाढण्याची शक्यता आहे. महागडे कमर्शियल सिलिंडर छोटय़ा व्यावसायिकांना परवडत नाही. त्यामुळे त्यांनी लाकडांचा वापर सुरू केला आहे. त्यामुळे गॅस सिलिंडरच्या वाढीव किंमतीची किंमत पर्यावरणाच्या रुपात चुकविण्याची वेळ येऊ शकते.   नागपुरातील जगदंबा कॅटर्सचे संचालक बंडू राऊत म्हणाले, मंगल कार्यालयात धुरामुळे भिंती काळ्या होत असल्याने लाकडे वापरण्याची परवानगी मिळत नाही त्यामुळे कमर्शियल सिलिंडरचा वापर करण्याशिवाय पर्याय नाही. स्वयंपाक बाहेर करायचा असेल तर लाकडे वापरली जातात. सिलिंडर महागल्याने हॉटेल आणि कॅटरिंग व्यवसायात लाकडांचा वापर सुरू झाला आहे, एवढे मात्र खरे.
ज्योती कांडीकोल इंडस्ट्रीचे संचालक राहुल जयस्वाल म्हणाले, कॅटरिंग व्यावसायिक जळाऊ लाकडे घेऊन जात आहेत. यात छोटय़ा व्यावसायिकांचे प्रमाण अधिक आहे. सिलिंडर महागल्याने कॅटरिंग आणि हॉटेल व्यावसायिकांच्या नफ्यावर मर्यादा आल्याने जळाऊ लाकडांचा जुना जमाना पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे. सध्या जळाऊ लाकूड २५० रुपये मण आणि ठोकमध्ये टनाला एका ट्रकमागे ४ हजार रुपये असा भाव आहे. महागडय़ा कमर्शियल सिलिंडरपेक्षा जळाऊ लाकडांचा वापर स्वस्तात पडतो.
परंतु, यापेक्षाही कारखान्यांच्या बॉयलरमध्ये दगडी कोळशाच्या किंमती वाढल्याने सर्रास जळाऊ लाकडे वापरली जात आहेत. यावर बंधने आणणे अनिवार्य झाले आहे. बाजारगावातील कारखान्यांमध्ये असा वापर वाढला आहे.
ज्येष्ठ पर्यावरणवादी व सातपुडा फाऊंडेशनचे किशोर रिठे यांनी व्यावसायिक सिलिंडर महागल्याचे निमित्त करून जळाऊ लाकडे वापरणाऱ्या हॉटेल आणि कॅटरिंग व्यावसायिकांवर तीव्र टीका केली. ज्यावेळी गॅस सिलिंडर स्वस्त होते त्यावेळी या व्यावसायिकांनी कमर्शियल सिलिंडरचा वापर करण्याऐवजी घरगुती सिलिंडर्स चोरून वापरले त्याचे काय, असा सवाल करून किशोर रिठे म्हणाले, परतवाडय़ाचेच उदाहरण घेतले तर १०० मोळ्या दररोज येतात. जंगल परिसरातील हॉटेले आणि रेस्टारंटमध्ये तर या मोळ्या सर्रास खरेदी केल्या जातात. पर्यावरणला असलेला धोकाच यातून ध्वनित होत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 22, 2013 3:48 am

Web Title: hotelcatering businessman using wood for cooking
टॅग : Cooking
Next Stories
1 चंद्रपूर जिल्ह्य़ातील ४५० गावात उन्हाळ्यात तीव्र पाणी टंचाई
2 यवतमाळ भाजप जिल्हाध्यक्षपदाचा कोणताच वाद नाही -आ. मुनगंटीवार
3 वर्धेत अपघातात ३ जागीच ठार, २ गंभीर जखमी
Just Now!
X